मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND Vs WI T20 : टीम इंडियाचं टी-20 मालिकेत पुनरागमन, सुर्यकुमार यादवच्या तुफानी ८३ धावा

IND Vs WI T20 : टीम इंडियाचं टी-20 मालिकेत पुनरागमन, सुर्यकुमार यादवच्या तुफानी ८३ धावा

Aug 08, 2023, 07:28 PM IST

    • IND Vs WI Scorecard : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 सामना आज (८ ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला.
IND Vs WI Live Score

IND Vs WI Scorecard : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 सामना आज (८ ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला.

    • IND Vs WI Scorecard : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा T20 सामना आज (८ ऑगस्ट) गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला.

Cricket Score, India vs West Indies (IND vs WI) 3rd T20 : भारतीय संघाने टी-20 मालिकेत पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ५ T20 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतरही वेस्ट इंडिज मालिकेत २-१ ने पुढे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

IND Vs WI  Score updates

भारताचा शानदार विजय

भारताने तिसरा T20 सामना जिंकला आहे. भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला आहे. भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा केल्या. भारताला केवळ १६० धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र हार्दिक पांड्याने षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. सूर्यकुमार यादवने ८३ धावांची खेळी केली. तिलक वर्मा ४९ धावा करून नाबाद राहिला. 

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५ विकेट्सवर १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने १७.५ षटकांत तीन गडी गमावून १६४ धावा करून सामना जिंकला. वेस्ट इंडिजकडून ब्रेंडन किंगने ४२ आणि रोव्हमन पॉवेलने ४० धावा केल्या. त्याच वेळी, अल्झारी जोसेफने चेंडूसह दोन बळी घेतले.

त्याचवेळी भारताकडून प्रथम कुलदीप यादवने तीन बळी घेतले, त्यानंतर फलंदाजी भारताकडून सूर्यकुमार यादवने ८३ आणि तिलक वर्माने नाबाद ४९ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

या विजयासह भारताने दमदार पुनरागमन केले असून, ५ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया अद्याप कायम आहे. वेस्ट इंडिजने दोन आणि भारताने एक सामना जिंकला आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. त्याचवेळी वेस्ट इंडिजला मालिका जिंकण्यासाठी एका विजयाची गरज आहे.

या मालिकेतील उर्वरित दोन सामने शनिवार आणि रविवारी होणार आहेत.

IND Vs WI T20 Live Score : सूर्यकुमार यादवचं शतक हुकलं

१२१ धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. सूर्यकुमार यादव ४४ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला आहे. त्याने आपल्या खेळीत १० चौकार आणि ४ षटकार मारले. त्याला अल्झारी जोसेफने ब्रेंडन किंगकरवी झेलबाद केले. आता कर्णधार हार्दिक पंड्या तिलक वर्मासोबत क्रीजवर आहे. भारताची धावसंख्या १३ षटकांनंतर ३ बाद १२३ अशी आहे.

IND Vs WI T20 Live Score : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक

सूर्यकुमार यादवने २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंत सात चौकार आणि दोन षटकार मारले आहेत. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघ चांगलाच सुस्थितीत आहे. तिसर्‍या विकेटसाठी सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन बाद ८४ अशी आहे.

IND Vs WI T20 Live Score : शुभमन गिल पुन्हा फ्लॉप

३४ धावांवर भारताची दुसरी विकेट पडली. शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्याने ११ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. अल्झारी जोसेफने त्याला जॉन्सन चार्ल्सकरवी झेलबाद केले. आता सूर्यकुमार यादवसोबत तिलक वर्मा क्रीझवर आहेत.

IND Vs WI T20 Live Score : भारताची खराब सुरुवात

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. सहा धावांवर भारताची पहिली विकेट पडली. यशस्वी जैस्वाल दोन चेंडूत एक धाव काढून बाद झाली. ओबेद मॅकॉयच्या संथ चेंडूवर जयस्वालने मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. आता सूर्यकुमार गिलसोबत क्रीजवर आहे. एका षटकानंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर १६ धावा आहे.

IND Vs WI T20 Live Score : वेस्ट इंडिजच्या १५९ धावा

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने ५ विकेट गमावत १५९ धावा केल्या आहेत. ब्रेंडन किंगने ४२ आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाबाद ४० धावा केल्या. या दोघांशिवाय मेयर्सने २५ आणि पूरणने २० धावांचे योगदान दिले. 

भारताकडून कुलदीप यादवने तीन बळी घेतले. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या मालिकेतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे.

वेस्ट इंडिजच्या डावात काय घडले?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजने संथ पण दमदार सुरुवात केली. हार्दिक आणि अर्शदीपने पहिल्या दोन षटकात केवळ नऊ धावा दिल्या. यानंतर किंग आणि मेयर्स यांनी फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आणि पॉवरप्लेमध्ये दोघांनी मिळून ३८ धावा केल्या. मेयर्स आणि किंग यांनी पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. २० चेंडूत २५ धावा करून मेयर्स अक्षर पटेलचा बळी ठरला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो आऊट झाला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला जॉन्सन चार्ल्स फिरकी गोलंदाजांसमोर संघर्ष करताना दिसला. त्याने एक षटकार आणि एक चौकार नक्कीच मारला, पण तो लयीत नव्हता. कुलदीपने त्याला १२  धावांवर बाद केले. 

उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या निकोलस पुरनने पुन्हा एकदा चांगली सुरुवात केली. मात्र, १२ चेंडूत २० धावा केल्यानंतर कुलदीपविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टीचीत झाला. त्याच षटकात कुलदीपने ब्रेंडन किंगलाही बाद केले आणि वेस्ट इंडिजची धावसंख्या १०६/४ झाली. किंगने ४२ धावा केल्या. येथून वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. आठ चेंडूंत नऊ धावा करून मुकेश कुमारविरुद्ध मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हेटमायरही बाद झाला.

१८ षटकांत वेस्ट इंडिजची धावसंख्या १३१/५ होती, पण अर्शदीपने १९व्या षटकात १७ धावा दिल्या. रोव्हमन पॉवेलने त्याची जोरदार धुलाई केली. मुकेश कुमारनेही २० व्या षटकात ११ धावा दिल्या. अशा प्रकारे वेस्ट इंडिजचा संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा करू शकला. कर्णधार पॉवेलने १९ चेंडूंत तीन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या.

या मालिकेतील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. भारताकडून कुलदीप यादवने तीन बळी घेतले. या सामन्यात, त्याने T20 मध्ये ५० विकेट्स देखील पूर्ण केल्या आणि सर्वात कमी चेंडू आणि सामन्यात ही कामगिरी करणारा तो भारतीय खेळाडू बनला. त्याच्याशिवाय अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

IND Vs WI T20 Live Score : १९व्या षटकात १७ धावा 

अर्शदीप सिंगने १९व्या षटकात १७ धावा दिल्या आणि वेस्ट इंडिजची धावसंख्या १५० धावांच्या जवळ पोहोचली. रोव्हमन पॉवेलने तुफानी फलंदाजी केली. आता वेस्ट इंडिज संघाने चांगली धावसंख्या गाठली आहे.

IND Vs WI T20 Live Score : जॉन्सन चार्ल्स बाद

७५ धावांच्या स्कोअरवर वेस्ट इंडिजची दुसरी विकेट पडली. जॉन्सन चार्ल्स १४ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला पायचीत केले. चार्ल्सने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. आता निकोलस पूरन ब्रेंडन किंगसोबत क्रीजवर आहे.

IND Vs WI T20 Live Score : काईल मेयर्स बाद

५५ धावांवर वेस्ट इंडिजची पहिली विकेट पडली. काइल मेयर्स २० चेंडूत २५ धावा करून बाद झाला. अक्षर पटेलने त्याला अर्शदीप सिंगकरवी झेलबाद केले. मेयर्सने आपल्या खेळीत तीन चौकार आणि एक षटकार लगावला. आता जॉन्सन चार्ल्स ब्रेंडन किंगसोबत क्रीजवर आहे. नऊ षटकांनंतर वेस्ट इंडिजची धावसंख्या एका विकेटवर ६७ आहे.

IND Vs WI T20 Live Score : पॉवरप्लेमध्ये ३८ धावा

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली. ब्रेंडन किंग आणि काइल मेयर्स ही जोडी समजूतदारपणे खेळत असून पॉवरप्लेमध्ये वेस्ट इंडिजने एकही विकेट न गमावता ३८ धावा केल्या आहेत.

IND Vs WI T20 Live Score : वेस्ट इंडिजची चांगली सुरुवात

पहिल्या दोन षटकांमध्ये शांत राहिल्यानंतर, कॅरेबियन फलंदाजांनी आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले. हार्दिक आणि अर्शदीपने पहिल्या दोन षटकांत फारशा धावा दिल्या नाहीत, मात्र चहल आणि अक्षर पटेलने पुढच्या दोन षटकांत धावा दिल्या. वेस्ट इंडिजच्या चार षटकांनंतर बिनबाद ३० धावा.

IND Vs WI T20 Live Score : वेस्ट इंडिजची संथ सुरुवात

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने अतिशय संथ सुरुवात केली. ब्रेंडन किंग आणि काइल मेयर्स क्रीजवर आहेत. मात्र, आतापर्यंत भारताने दोघांनाही बांधून ठेवले असून, त्यांना हात उघडू दिलेले नाहीत. दोन षटकांनंतर वेस्ट इंडिज बिनबाद ९ आहे.

IND Vs WI T20 Live Score : दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत: शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार.

वेस्ट इंडिज: ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (सी), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, रोस्टन चेस, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

IND vs WI 3rd T20 Live : वेस्ट इंडिजचा फलंदाजीचा निर्णय 

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विंडीजचा संघ एका बदलासह मैदानात उतरला आहे. जेसन होल्डर बाहेर आहे, त्याच्या जागी रोस्ट चेस सामना खेळत आहे. त्याचवेळी भारतीय संघ दोन बदलांसह मैदानात उतरला आहे. इशान किशनच्या जागी यशस्वी जैस्वाल आणि रवी बिश्नोईच्या जागी कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs WI 3rd T20 Live : यशस्वी जैस्वालचे पदार्पण

सामना सुरू होण्यापूर्वी यशस्वी जैस्वालला भारतीय टी-२० संघाची कॅप देण्यात आली. आज तो भारतासाठी पहिला टी-२० सामना खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेस्ट इंडिजच्या या दौऱ्यावर यशस्वीने आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली आणि पहिल्या डावातच १७१ धावांची शानदार खेळी केली. आता त्याच्याकडून टी-२० मध्येही मोठ्या अपेक्षा असतील.

भारताने पहिले दोन सामने गमावले 

या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतासमोर १५० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, पण टीम इंडिया १४५ धावांवर गारद झाली आणि सामना ४ ने गमावला.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावा केल्या होत्या. यानंतर वेस्ट इंडिजने ८ गडी गमावून १५५ धावा केल्या आणि सात चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. यासह कॅरेबियन संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन -

भारत:

शुभमन गिल, इशान किशन/यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

वेस्ट इंडिज:

काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स/रोस्टन चेस, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय

पुढील बातम्या