मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधात भारताचा दुसऱ्या सामन्यासह मालिका विजय

IND vs WI: वेस्ट इंडिजविरोधात भारताचा दुसऱ्या सामन्यासह मालिका विजय

Jul 25, 2022, 07:35 AM IST

    • वेस्ट इंडिजने शाय होपच्या शतकाच्या जोरावर ५० षटकात ६ बाद ३११ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने २ चेंडू आणि २ गडी राखून सामना जिंकला.
india vs west indies

वेस्ट इंडिजने शाय होपच्या शतकाच्या जोरावर ५० षटकात ६ बाद ३११ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने २ चेंडू आणि २ गडी राखून सामना जिंकला.

    • वेस्ट इंडिजने शाय होपच्या शतकाच्या जोरावर ५० षटकात ६ बाद ३११ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने २ चेंडू आणि २ गडी राखून सामना जिंकला.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने २-० अशी जिंकली आहे. त्रिनिदादमधील क्वीन्स पार्क ओवल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने शाय होपच्या शतकाच्या जोरावर ५० षटकात ६ बाद ३११ धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने २ चेंडू आणि २ गडी राखून सामना जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताच्या श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल यांनी अर्धशतकी खेळी केली. अक्षर पटेलला सामनावीर पुरस्कार मिळाला. त्यानं अर्धशतकासह एक विकेटही घेतली होती. भारताने दुसऱ्या सामन्यासह मालिका खिशात टाकली आहे.

तत्पूर्वी, विंडीजकडून शाई होपने शतकीय खेळी केली. त्याने ११५ धावा केल्या. होपचा हा १०० वा वनडे सामना आहे. आपल्या कारकिर्दितील १०० व्या सामन्यात शतक झळकवणारा होप वेस्ट इंडिजचा चौथा आणि जगातील १० वा फलंदाज ठरला आहे. होपने १३५ चेंडूंच्या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार ठोकले. त्याच्याशिवाय कर्णधार निकोलस पूरनने ७४ धावांची खेळी खेळली. 

तत्पूर्वी, वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय विंडीजच्या शाई होप आणि काइल मेयर्सने या सलामी जोडीने सार्थ ठरवत ६५ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी विंडीजला लागोपाठ धक्के देत विंडीजची अवस्था ३ बाद १३० धावा अशी केली. मायेर्स ३९ तर ब्रुक्स ३५ आणि किंग शुन्यावर बाद झाला. पण त्यानंतर शाई होप आणि कर्णधार निकोलस पूरन यांनी चौथ्या विकेटसाठी ११७ धावांची शतकी भागीदारी रचत संघाला २५० चा टप्पा पार करून दिला. या दरम्यान, होपने आपले १३ वे वनडे शतक पर्ण केले.

त्यानंतर मात्र, शार्दुल ठाकूरने पूरनला ७४ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. शेवटी रोमारियो शेफर्ड १५ धावांवर नाबाद राहिला. तर भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ बळी घेतले. दीपक हुडा, अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

पुढील बातम्या