मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Akash Chopra: हार्दिक पांड्याचा 'हा' निर्णय आकाश चोप्राला खटकला; अक्षर पटेलचं नाव घेत म्हणाला...

Akash Chopra: हार्दिक पांड्याचा 'हा' निर्णय आकाश चोप्राला खटकला; अक्षर पटेलचं नाव घेत म्हणाला...

Aug 07, 2023, 12:53 PM IST

  • Akash Chopra On Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Hardik Pandya (AP)

Akash Chopra On Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

  • Akash Chopra On Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वावर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

India tour of West Indies: भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियमवर रविवारी दुसरा टी-२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारताला दोन विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह वेस्ट इंडीजच्या संघाने पाच सामन्याच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी हार्दिक पांड्यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोईला या तीन फिरकीपटूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. मात्र, संपूर्ण सामन्यात अक्षर पटेलला एकही षटक टाकण्याची संधी मिळाली नाही. हार्दिक पांड्याचा हा निर्णय आकाश चोप्रा यांना खटकला आहे. अक्षरला गोलंदाजी द्यायची नव्हती तर, त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये का स्थान दिले? असा प्रश्न आकाश चोप्राने उपस्थित केला आहे.

आकाश चोप्राने त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला की, "अक्षर पटेलने एकही षटक टाकले नाही. माझा असा प्रश्न आहे की, या सामन्यात अक्षर पटेलला गोलंदाजी दिली गेली नाही. कारण, वेस्ट इंडीजच्या संघात डावखुरे फलंदाज होते. कायल मेयर्स, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमायर आणि शेवटच्या षटकात अकील हुसैन फलंदाजी करण्यासाठी आल्यामुळे त्याला गोलंदाजी देण्यात आली नाही. तो गोलंदाजी करणार नव्हता, तर त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान का दिले. तुम्ही तुमच्या सहाव्या गोलंदाजाचा अजिबात वापर करत नाही. या निर्यामुळे मी आश्चर्यचकीत झालो. हाव्या हाताचा गोलंदाज डावखुऱ्या फलंदाजाविरुद्ध गोलंदाजी करू शकतो. वेस्ट इंडीजचा अकील हुसैनने तिलक वर्माविरुद्ध गोलंदाजी केली आणि त्याला आऊटही केले. पण हार्दिकने अक्षर पटेलला गोलंदाजी दिली नाही."

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, "पहिल्या टी-२० सामन्यात अक्षर पटेलला दोन षटके गोलंदाजी देण्यात आली आणि दुसऱ्या टी-२० सामन्यात एकही षटक नाही. एकदिवसीय सामन्यातही दोन षटके दिली होती. अक्षर पटेल फलंदाज म्हणून खेळत असेल तर हे चुकीचे आहे."

पुढील बातम्या