मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs SL 2nd ODI: दुसऱ्या वनडेतून केएल राहुल बाहेर? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Ind vs SL 2nd ODI: दुसऱ्या वनडेतून केएल राहुल बाहेर? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Jan 12, 2023, 10:37 AM IST

  • India vs Sri Lanka Playing-11: भारत-श्रीलंका मालिकेतील दुसरा वनडे सामना आज (१२ जानेवारी) कोलकात्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

Indian cricket player K L Rahul during a practice session on the eve of the first one day international cricket match between India and Sri Lanka in Guwahati, India, Monday, Jan. 9, 2023. (AP Photo/Anupam Nath) (AP)

India vs Sri Lanka Playing-11: भारत-श्रीलंका मालिकेतील दुसरा वनडे सामना आज (१२ जानेवारी) कोलकात्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

  • India vs Sri Lanka Playing-11: भारत-श्रीलंका मालिकेतील दुसरा वनडे सामना आज (१२ जानेवारी) कोलकात्यात होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

K L Rahul : सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. ज्यांचा दुसरा सामना आज (१२ जानेवारी) कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल, तर नाणेफेक अर्धा तास आधी होईल.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने ६७ धावांनी जिंकला होता. अशा परिस्थितीत त्यांनी हा दुसरा सामनाही जिंकला तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ही मालिका २-० ने जिंकेल. तर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाकडून अंतिम ११ खेळाडूमध्ये कुठलाही बदल केला जाण्याची शक्यता कमी आहे. केएल राहुल याला विश्रांती देऊन या सामन्यात इशान किशनला संधी दिली जाऊ शकते, अशी एक चर्चा आहे. मात्र, ती शक्यता फारच कमी आहे.

श्रीलंकेच्या संघात एक बदल होण्याची शक्यता

लंकेचा कर्णधार दासून शनाका त्याच्या संघात बदल करण्याची शक्यता आहे. दिलशान मधुशंका उपलब्ध नसेल तर त्याच्या जागी लाहिरू कुमाराला संधी दिली जाऊ शकते. श्रीलंका संघानं मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. असं असलं तरी लगेच तातडीनं संघात मोठा बदल व्हावा अशी परिस्थिती नसल्याचं जाणकारांचं मत आहे.

दोन्ही संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी उमरान मलिक और युजवेंद्र चहल.

श्रीलंका: पथुम निसंका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, धनंजय डि सिल्वा, चरिथ असलंका, दासुन शनाका (कर्णधा), वानिंदु हसारंगा, चमिका करुणारत्ने, डुनिथ वेलालागे, कासुन राजिता, दिलशान मधुशंका/लाहिरू कुमारा.

पुढील बातम्या