मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India beat Sri Lanka: शेवटच्या चेंडूवर भारत जिंकला! पदार्पणाच्या सामन्यात मावीची तुफानी गोलंदाजी

India beat Sri Lanka: शेवटच्या चेंडूवर भारत जिंकला! पदार्पणाच्या सामन्यात मावीची तुफानी गोलंदाजी

Jan 03, 2023, 10:47 PM IST

    • India vs Sri Lanka 1st t20 highlights: टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवरील टी-20 सामना २ धावांनी जिंकला आहे. भारताने श्रीलंकेला १६३ धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र श्रीलंकेचे फलंदाज लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले. नवोदित शिवम मावीच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ हतबल दिसत होता. टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
India vs Sri Lanka 1st t20 highlights

India vs Sri Lanka 1st t20 highlights: टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवरील टी-20 सामना २ धावांनी जिंकला आहे. भारताने श्रीलंकेला १६३ धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र श्रीलंकेचे फलंदाज लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले. नवोदित शिवम मावीच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ हतबल दिसत होता. टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

    • India vs Sri Lanka 1st t20 highlights: टीम इंडियाने वानखेडे स्टेडियमवरील टी-20 सामना २ धावांनी जिंकला आहे. भारताने श्रीलंकेला १६३ धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र श्रीलंकेचे फलंदाज लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले. नवोदित शिवम मावीच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा संघ हतबल दिसत होता. टीम इंडियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

India vs Sri Lanka (IND vs SL) 1st t20: भारताने पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा दोन धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ १६० धावा करू शकला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी १३ धावांची गरज होती, कर्णधार हार्दिक पंड्याने अक्षर पटेलकडे चेंडू सोपवून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र अक्षरने टीम इंडियाचा सामना जिंकवून दिला.

शेवटच्या षटकात काय घडलं?

१९.१ - वाइड बॉल

१९.२ - एक धाव

१९.२ - डॉट बॉल (वाईड समजून चेंडू सोडून दिला)

१९.३ - करुणारत्नेने षटकार ठोकला.

१९.४ - डॉट बॉल (वाईड समजून चेंडू सोडून दिला)

१९.५ -कसून रजिथा धावबाद

१९.६ - मधूशंका  धावबाद

शनाकाची झुंजार खेळी व्यर्थ

दरम्यान, भारताच्या लक्ष्याचा पाठलाग करताना करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे सलामीवीर स्वस्ता तंबूत परतले. त्यानंतर श्रीलंकेचा संघ सावरु शकला नाही. श्रीलंकेचे ५ फलदाज अगदी स्वस्ता तंबूत परतले होते. मात्र, त्यानंतर कर्णधार दासून शनाका आणि वनिंदू हसरंगा यांनी लंकेचा डाव सावरला. दोघांनी श्रीलंकेला विजयाच्या जवळ नेले होते. 

पण मोक्याच्या क्षणी हसरंगा आणि शनाका बाद झाले. श्रीलंकेकडून शनाकाने सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याने २७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार ठोकले. तर हसरंगाने १० चेंडूत २१ धावा केल्या. हसरंगाने १ चौकार आणि १ षटकार मारला.  शेवटी चमिका करुणारत्नेने संघर्ष केला. त्याने १६ चेंडूत २ षटकारांसह २३ धावा केल्या.

भारताचा डाव

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीस आलेल्या भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. शुभमन गिल आणि इशान किशन या जोडीने पहिल्या षटकात १७ धावा जोडल्या. २७ धावांवर भारताची पहिली विकेट पडली. शुभमन गिल पदार्पणाच्या सामन्यात ७ धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवलाही काही खास करता आले नाही. तोदेखील ७ धावा करून बाद झाला. संजू सॅमसनही ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

त्यानंतर ईशान किशन ३७ आणि हार्दिक पांड्या २९ धावा करून बाद झाले. ९४ धावांत ५ विकेट्स गमावल्यानंतर टीम इंडियाचा संघर्ष सुरू होता. यानंतर दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी ६८ धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या १५० च्या पुढे नेली. दीपक हुडा ४१ आणि अक्षर पटेलने ३१ धावा करून नाबाद राहिले. श्रीलंकेसाठी कसून राजिता वगळता सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

पुढील बातम्या