मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA T20: आफ्रिकेनं रोखला विजयरथ, टीम इंडियाचा शेवटच्या षटकात पराभव
IND vs SA T20

IND vs SA T20: आफ्रिकेनं रोखला विजयरथ, टीम इंडियाचा शेवटच्या षटकात पराभव

Oct 30, 2022, 07:37 PMIST

India vs South Africa (IND vs SA) T20 World Cup 2022 highlights: T20 विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिकेसोबत होता. या सामन्यातून आफ्रिकेने भारताचा विजय रथ रोखला आहे. पर्थच्या उसळत्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कहर केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात आफ्रिकन संघाने १९.४ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले.

Oct 30, 2022, 08:53 PMIST

IND vs SA T20 आफ्रिकेनं रोखला विजयरथ, टीम इंडियाचा शेवटच्या षटकात पराभव

दक्षिण आफ्रिकेने भारताचा ५ गडी राखून पराभव केला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धावा केल्या होत्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४० चेंडूत ६८ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १९.४ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले.

या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी निराशा केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही अनेक संधी गमावल्या. मार्करामला अनेक जीवदान मिळाले. याचा फायदा घेत त्याने ४१ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी डेव्हिड मिलरने ४६ चेंडूत ५९ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. मार्करामने आपल्या खेळीत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचवेळी मिलरने ४ चौकार आणि ३ षटकार ठोकले.

दरम्यान, सुरुवातीला एका क्षणी दक्षिण आफ्रिकेने अवघ्या २४ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर मार्कराम आणि मिलरने ७६ धावांची भागीदारी करून सामना फिरवला. मार्कराम बाद झाल्यानंतर मिलरने दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. 

शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ६ धावांची गरज होती. भुवनेश्वरच्या षटकातील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर मिलरने सलग २ चौकार मारून आफ्रिकेला विजय मिळवून दिला. भारताकडून अर्शदीप सिंगने दोन बळी घेतले.

आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या स्थानावर

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने गट २ च्या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेचे ३ सामन्यांत २ विजयांसह ५ गुण झाले आहेत. आफ्रिकेचा एक सामना पावसाने वाहून गेला. त्याचबरोबर भारताचे तीन सामन्यांतून दोन विजय आणि एक पराभवासह चार गुण आहेत. बांगलादेशचा संघही चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. तीन सामन्यांत दोन पराभव आणि एक विजयासह त्यांचे दोन गुण आहेत. अशाप्रकारे पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. भारताचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध २ ऑक्टोबरला आहे.

Oct 30, 2022, 07:37 PMIST

IND vs SA T20 Live: आफ्रिकेची सामन्यावर पकड, मार्करमचं अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एडन मार्करामने ३९ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या आहेत. आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूत ३९ धावांची गरज आहे.

Oct 30, 2022, 07:34 PMIST

IND vs SA Live: भारताची खराब क्षेत्ररक्षण, कोहली-रोहितने एक-एक चान्स सोडला

१३व्या षटकात थोडासा ड्रामा पाहायला मिळाला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने एक सोपा रनआऊटचा चान्स सोडला. स्टंपच्या अगदी जवळ पोहोचूनही रोहित थ्रो स्टम्पवर मारु शकला नाही. मार्करामला मिळालेली हे दुसरे जीवदान होते. याआधी कोहलीने १२व्या षटकात मार्करामचा सोपा झेल सोडला होता. मार्कराम आणि मिलरने १४व्या षटकात १७ धावा केल्या. या षटकात दोघांनी प्रत्येकी एक षटकार ठोकला. १४ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ८५ धावा आहे. आफ्रिकेला ३६ चेंडूत ४९ धावा हव्या आहेत.

Oct 30, 2022, 06:55 PMIST

IND vs SA Live: दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का

पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात म्हणजेच सहाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला तिसरा धक्का बसला. मोहम्मद शमीने कर्णधार टेंबा बावुमाला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे झेलबाद केले. बावुमा १५ चेंडूत १० धावा करू शकला. पॉवरप्लेअखेर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३ बाद २४ अशी आहे. डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम सध्या क्रीजवर आहेत. याआधी अर्शदीप सिंगने क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांना एकाच षटकात बाद केले होते.

Oct 30, 2022, 06:31 PMIST

IND vs SA Live: अर्शदीपनं ३ चेंडूत दोघांना तंबूत पाठवलं, डी कॉक, रोसो

अर्शदीपनं ३ चेंडूत दोघांना तंबूत पाठवलं आहे. त्याने आधी डी कॉकला झेलबाद केले. डीकॉकने एक धाव केली. त्यानंतर गेल्या सामन्यातील शतकवीर रिली रोसोला पायचीत केले. रोसो शुन्यावर बाद झाला. २ षटकांनंतर आफ्रिकेच्या २ बाद ७ धावा झाल्या आहेत.

Oct 30, 2022, 06:30 PMIST

IND vs SA Live: अर्शदीपने दिला आफ्रिकेला पहिला धक्का, क्विंटन डी कॉक एका धावेवर बाद

दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला आहे. क्विंटन डी कॉक झेलबाद झाला. त्याने १ धाव केली. डीकॉकला अर्शदीपने बाद केले. 

Oct 30, 2022, 06:27 PMIST

IND vs SA Live: भारताचं आफ्रिकेसमोर १३४ धावांचं लक्ष्य, सुर्याच्या ४० चेंडूत ६८ धावा

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धावा केल्या. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाला २३ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर एकामागोमाग विकेट्स पडत राहिल्या.

केएल राहुल ९ धावा तर विराट कोहली १२ धावा काढून बाद. तिघांनाही लुंगी एनगिडीने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर अक्षर पटेलच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला दीपक हुडाही अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. हुडा नॉर्खियाच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. हार्दिक पंड्या २ धावा करून बाद झाला. एनगिडीने हार्दिकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

भारताच्या ४९ धावांवर ५ विकेट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने दिनेश कार्तिकसह टीम इंडियाचा डाव सांभाळला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४० चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३० चेंडूंत अर्धशतक ठोकले. या दोघांनी मिळून भारताला १०० धावांच्या पुढे नेले. कार्तिक १६व्या षटकात वेन पारनेलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचा झेल रिली रोसोने घेतला. कार्तिकने १५ चेंडूत ६ धावा केल्या.

त्यानंतर भारताला १९व्या षटकात दोन धक्के बसले. या षटकात वेन पारनेलने रविचंद्रन अश्विन आणि सूर्यकुमार यादव यांना बाद केले. पारनेलने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनला रबाडाकरवी झेलबाद केले. अश्विनला ११ चेंडूत ७ धावा करता आल्या. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पारनेलने सूर्यकुमारला महाराजकरवी झेलबाद केले. पर्थच्या अवघड खेळपट्टीवर सूर्यकुमारने शानदार खेळी केली. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या.

Oct 30, 2022, 06:19 PMIST

IND vs SA Live: भारताचं आफ्रिकेसमोर १३४ धावांचं लक्ष्य, सुर्याच्या ४० चेंडूत ६८ धावा

भारताच्या निर्धारित २० षटकात ९ बाद १३३ धावा झाल्या आहेत. भारताकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक ६८ धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. तर आफ्रिकन गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली.  त्यांच्याकडून वायने पार्नेलने १५ धावांत ३ तर लुंगी एनगिडीने २९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.

Oct 30, 2022, 06:10 PMIST

IND vs SA Live: १९ व्या षटकात भारताला दोन धक्के

१९ व्या षटकात भारताला दोन धक्के बसले. आधी अश्विन मोठा फटका खेळण्याच्या नादात झेल बाद झाला. त्यानंतर सुर्यकुमार यादवदेखील त्याच शैलीत बाद झाला. दोघांना वायने पार्नेलने बाद केले. अश्विनने सात धावा केल्या. तर सुर्याने ४० चेंडूत ६८ धावांची खेळी केली. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले.

Oct 30, 2022, 05:47 PMIST

IND vs SA Live: दिनेश कार्तिक बाद

दिनेश कार्तिक बाद झाला आहे. कार्तिकने मोठा फटका खेळण्याच्या नादात रीली रौसोकडे झेल दिला. त्याला वायने पार्नेलने बाद केले. कार्तिकने १५ चेंडूत ६ धावा केल्या. मात्र, त्याने सुर्यकुमार यादवला चांगली साथ दिली. सुर्या आणि डीकेने ५० धावांची भागिदारी रचली.

Oct 30, 2022, 05:47 PMIST

IND vs SA Live: सुर्याचं अर्धशतक

सूर्यकुमार यादवने ३०  चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने स्पर्धेतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. त्याने डीकेच्या मदतीने भारताचा डाव सावरला आहे. १५ षटकानंतर भारताच्या ५ बाद १०१ धावा झाल्या आहेत. सुर्या ३१ चेंडूत ५१ तर दिनेश कार्तिक ६ धावांवर खेळत आहेत.

Oct 30, 2022, 05:44 PMIST

IND vs SA Live: सूर्या-कार्तिकने डाव सावरला

१३ षटकांनंतर भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात ८४ धावा केल्या. सध्या दिनेश कार्तिक ३ तर सूर्यकुमार यादव ३७ धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये आतापर्यंत ३५ धावांची भागीदारी झाली आहे. आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने धुमाकूळ घातला. त्याने विराट कोहली (१२), रोहित शर्मा (१५), केएल राहुल (९) आणि हार्दिक पंड्यासह ४ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी एनरिक नॉर्खियाला एक विकेट मिळाली. हार्दिकला दोन धावा करता आल्या.

Oct 30, 2022, 05:23 PMIST

IND vs SA T20 Live: १० षटकांनंतर भारताच्या ६० धावा, ५ फलंदाज बाद

१० षटकांनंतर भारताच्या ६० धावा झाल्या आहेत. तर ५ मोठे फलंदाज तंबूत परतले आहे. सध्या दिनेश कार्तिक आणि सुर्यकुमार यादव खेळत आहेत. सुर्याने १३ चेंडूत १७ धावा केल्या आहेत. तर आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने आतापर्यंत ३ षटकात १७ धावा देऊन ४ विकेट्स घेतले आहेत.

Oct 30, 2022, 05:20 PMIST

IND vs SA T20 Live: एनगिडीचे ४ विकेट्स, टीम इंडियाचे ५ फलंदाज तंबूत

भारताने ५० धावांत पाच विकेट गमावल्या आहेत. पर्थच्या मैदानावर भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. आफ्रिकन गोलंदाजांसमोर १० षटकांच्या आत भारताचा अर्धा संघ पव्हेलियनमध्ये परतला आहे. दीपक हुडा शुन्यावर तर हार्दिक पांड्या २ धावा करुन बाद झाला. हुडा नॉर्खियाने विकेटकीपर डी कॉकरवी झेलबाद केले. तर पांड्याला एनगिडीने रबाडाच्या हाती झेलबाद केले. एनगिडीचा हा चौथा विकेट ठरला.

Oct 30, 2022, 05:05 PMIST

IND vs SA T20 Live: भारताला सर्वात मोठा धक्का, विराट कोहली बाद

आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीने भारताला सर्वात मोठा धक्का दिला आहे. त्याने विराट कोहलीला बाद केले आहे. विराटने आजही चांगल्या लयीत दिसत होता. मात्र सीमारेषेवर तो झेलबाद झाला. विराटने ११ चेंडूत १२ धावा केल्या. त्याने २ चौकार मारले. लुंगी एनिगिडीटा हा तिसरा विकेट होता. त्याने आतापर्यत २ षटकात १३ धावा देत ३ मोठे विकेट्स घेतले आहेत.

Oct 30, 2022, 04:57 PMIST

IND vs SA T20 Live: भारताला एकाच षटकात दोन धक्के, रोहित-राहुल स्वस्तात तंबूत

भारताला एकाच षटकात दोन मोठे धक्के बसले आहेत. लुंगी एनगिडीच्या एकाच षटकात भारताचे दोन्ही सलामीवीर रोहित आणि राहुल बाद झाले आहेत. के एल राहुलला एनगिडीने स्लीपमध्ये झेलबाद केले. राहुलचा झेल एडन मार्करमने पकडला. राहुलने १४ चेंडूत केवळ ९ धावा केल्या.

Oct 30, 2022, 05:03 PMIST

IND vs SA T20 Live: भारताला पहिला धक्का, कर्णधार रोहित शर्मा १५ धावा करून बाद

भारताला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा १५ धावा करून बाद झाला. तो लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर कॉटन बोल्ड झाला. आता विराट कोहली मैदानात आला आहे. रोहितने १४ चेंडूंचा सामना करताना १ चौकार आणि १ षटकार मारला. भारताच्या ४.३ षटकात १ बाद २४ धावा झाल्या आहेत. 

Oct 30, 2022, 04:52 PMIST

IND vs SA T20 Live: भारताने चार षटकात २१ धावा 

चार षटके संपल्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या २१ धावा झाली आहे. भारताची सुरुवात संथ झाली आहे, पण चांगली गोष्ट म्हणजे टीम इंडियाने आतापर्यंत एकही विकेट गमावलेली नाही.

Oct 30, 2022, 04:44 PMIST

IND vs SA T20 Live: भारताची संथ सुरुवात

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने संथ सुरुवात केली. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद सहा धावा. दरम्यान, रोहित शर्मालाही संजीवनी मिळाली आहे. कागिसो रबाडाने रोहितचा त्याच्याच चेंडूवर सोपा झेल सोडला.

Oct 30, 2022, 04:15 PMIST

IND vs SA T20 Live: दोन्ही संघांची प्लेईंग 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिली रोसो, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वायने पार्नेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया.

Oct 30, 2022, 04:10 PMIST

IND vs SA T20 Live: भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात टीम इंडिया एका बदलासह उतरली आहे. या सामन्यात दीपक हुड्डाला संधी देण्यात आली आहे. तर अक्षर पटेल आजचा सामना खेळणार नाही. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघातही एक बदल करण्यात आला आहे. तबरेझ शम्सीच्या जागी लुंगी एनगिडीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Oct 30, 2022, 03:46 PMIST

IND vs SA T20 Live: पाकिस्तान करणार भारताच्या विजयासाठी प्रार्थना 

पाकिस्तानच्या संघाने पहिले दोन सामने गमावले असून त्यांना उपांत्य फेरी गाठण्यासाठी आता नशिबाची साथ लागणार आहे. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा अशी प्रार्थना पाकिस्तान संघ करेल. अशा स्थितीत पाकिस्तान आपले उर्वरित सामने जिंकून उपांत्य फेरीत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. कारण आज दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला तर आफ्रिकेचे केवळ ५ गुण असतील आणि पाकिस्तानचे ६ गुण होतील.

Oct 30, 2022, 03:12 PMIST

IND vs SA T20 Live: टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल/दीपक हुड्डा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

Oct 30, 2022, 03:04 PMIST

IND vs SA T20 Live: T20 विश्वचषकात आफ्रिकेविरुद्ध भारताचे पारडे जड

 T20 विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ ५ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने चार सामने जिंकले आणि एक सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला.

Oct 30, 2022, 03:03 PMIST

IND vs SA T20 Live: भारत - दक्षिण आफ्रिका हेड टू हेड

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमधील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर  टी-20 मध्ये हे दोन्ही संघ २३ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने १३ सामने जिंकले. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ९ सामन्यांत विजय मिळवला. एक सामना अनिर्णित आहे. 

Oct 30, 2022, 03:01 PMIST

IND vs SA T20 Live: रबाडा-कोहली थरार रंगणार

Oct 30, 2022, 02:17 PMIST

IND vs SA T20 Live: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कधी सुरू होईल?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता सुरु होणार आहे. नाणेफेक सायंकाळी ४ वाजता होईल.

    शेअर करा