मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA : सामन्यावेळी प्रेक्षकांचा स्टेडियममध्ये राडा, हाणामारीचा VIDEO VIRAL

IND vs SA : सामन्यावेळी प्रेक्षकांचा स्टेडियममध्ये राडा, हाणामारीचा VIDEO VIRAL

Jun 11, 2022, 02:39 PM IST

    • स्टेडियममध्ये प्रेक्षक एकमेकांशी भिडले आणि थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू झाली. याचा  व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यावेळी प्रेक्षकांनी घातला राडा

स्टेडियममध्ये प्रेक्षक एकमेकांशी भिडले आणि थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू झाली. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    • स्टेडियममध्ये प्रेक्षक एकमेकांशी भिडले आणि थेट लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू झाली. याचा  व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ind vs SA 1st T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी २० सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यातील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेनं ७ गडी राखून पराभव केला. दरम्यान, त्याचवेळी स्टेडियममध्ये एका ठिकाणी प्रेक्षकांची हाणामारी झाली. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

अरुण जेटली स्टेडियममध्ये इस्ट स्टँडमध्ये बसलेले काही प्रेक्षक एकमेकांशी भीडले. यावेळी दोन्ही बाजूने एकमेकांना लाथा, बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. वाद वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना अडवून वातावरण शांत केलं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसतं की, दोन चाहते एकाला मारहाण करत आहेत. त्यानतंर आणखी दोघे येतात आणि एका मुलाला लाथा, बुक्क्यांनी मारायला सुरुवात करतात. या भांडणाचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र एक प्रेक्षक अतिउत्साही होता. तो पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आला असावा. त्यानं भारताचा झेंडासुद्धा सोबत आणला होता. त्याच्यामुळे इतरांना अडचण होत होती. त्यानंतर झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे.

आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारताने आफ्रिकेला २१२ धावांचे आव्हान दिले होते . याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं डेव्हिड मिलर आणि रासी वन डुसेन यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर विजय मिळवला. दोघांनी १३५ धावांची भागिदारी केली. आफ्रिकेनं हा सामना ७ गडी राखून जिंकला.

पुढील बातम्या