मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA 3rd ODI: निर्णायक सामन्यात आफ्रिकेचा पराभव, टीम इंडियाने वनडे मालिका जिंकली

IND vs SA 3rd ODI: निर्णायक सामन्यात आफ्रिकेचा पराभव, टीम इंडियाने वनडे मालिका जिंकली

Oct 11, 2022, 06:42 PM IST

    • India Vs South Africa ODI Match highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ७ विकेट्सच्या फरकाने जिंकून मालिका आपल्या नावे केली.
India Vs South Africa

India Vs South Africa ODI Match highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ७ विकेट्सच्या फरकाने जिंकून मालिका आपल्या नावे केली.

    • India Vs South Africa ODI Match highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ७ विकेट्सच्या फरकाने जिंकून मालिका आपल्या नावे केली.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाने हा सामना ८ विकेटने जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली. गोलंदाजीत कुलदीप यादव आणि फलंदाजीत शुभमन गिल हे भारताच्या विजयाचे हिरो ठरले. कुलदीपने ४ बळी घेतले, तर गिलने ४९ धावांची खेळी खेळली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघ २७.१ षटकांत अवघ्या ९९ धावांवर गारद झाला. ही दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्धची वनडेतील सर्वात कमी धावसंख्या आहे. तर एकूणच दक्षिण आफ्रिकेची ही चौथी नीचांकी धावसंख्या ठरली आहे.

कुलदीप यादव शिवाय भारताकडून मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

९९ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने शुभमन गिलच्या ४९ धावांच्या जोरावर सात गडी राखून सामना जिंकला. भारताने १९.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. श्रेयस अय्यरने षटकार मारून सामना संपवला. श्रेयस अय्यरने नाबाद २८ धावा केल्या. यासह भारताने वनडे मालिका २-१ ने जिंकली. भारताने १२ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकली आहे.

आफ्रिकेचा डाव

निर्णायक सामन्यात आफ्रिकेच्या फलंदाजांनी आज प्रचंड निराशा केली. त्यांचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. आफ्रिकेकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक ३४ धावा केल्या. त्याच्याशिवाय यानेमन मलान (१५ धावा) आणि मार्को जॅन्सन (१४ धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. याशिवाय शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

पुढील बातम्या