मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा शानदार विजय, श्रेयस अय्यरची शतकी खेळी

IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा शानदार विजय, श्रेयस अय्यरची शतकी खेळी

Oct 09, 2022, 09:05 PM IST

    • India Vs South Africa 2nd ODI highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे आता ११ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत खेळवला जाईल.
IND vs SA 2nd ODI

India Vs South Africa 2nd ODI highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे आता ११ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत खेळवला जाईल.

    • India Vs South Africa 2nd ODI highlights: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक वनडे आता ११ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत खेळवला जाईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने ७ गडी राखून जिंकला आहे. आफ्रिकेने भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने तीन विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांनी शानदार खेळी केली. दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी १६१ धावांची शानदार भागीदारी केली. श्रेयस अय्यरने नाबाद ११३ धावा केल्या. तर इशान किशनने ९३ धावांचे योगदान दिले. श्रेयसने १११ चेंडूत १५ चौकारांसह नाबाद ११३ धावा केल्या. त्याचवेळी इशान किशनने ८४ चेंडूत ९३ धावा केल्या, ज्यात ७ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.

श्रेयस अय्यरने वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. त्याने १०३ चेंडूत शतक पूर्ण केले. श्रेयस वनडेमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या ६  डावांमध्ये त्याने पाचव्यांदा ५० हून अधिक धावा केल्या आहेत. 

आफ्रिकेचा डाव-

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकात मोहम्मद सिराजने स्टार फलंदाज क्विंटन डी कॉकला क्लीनबोल्ड  करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला ८ चेंडूत केवळ ५ धावा करता आल्या. यानंतर रीझा आणि जानेमन मलान यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र १०व्या षटकात २५ धावा करून जानेमन मलानही बाद झाला.

यानंतर रीझा हेंड्रिक्स आणि एडन मार्कराम यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी १२९ चेंडूत १२९ धावांची भागीदारी झाली. रिझा ७६ चेंडूत ७४ धावा करून बाद झाला. तर मार्कराम ८९ चेंडूत ७९ धावा करून बाद झाला. त्यानंतर हेन्रिक क्लासेनने २६ चेंडूत ३० धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेने ३० षटकात १५७ धावा केल्या होत्या. यामुळे आफ्रिका मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी धावगतीवर नियंत्रण ठेवले तसेच, वेळोवेळी विकेट्स घेतल्या. 

क्लासेन (३०) आणि वायने पार्नेल (१६) बाद झाल्यानंतर आफ्रिकेला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेण्याची जबाबदारी डेव्हिड मिलरवर होती. शार्दुल ठाकूरच्या ४९व्या षटकात मिलरने दोन चौकार मारले. पण सिराजने ५० व्या षटकात केवळ ३ धावा दिल्या आणि कर्णधार केशव महाराजला बाद केले. आफ्रिकेला शेवटच्या ८ षटकांत केवळ ४१ धावाच करता आल्या.

तर भारताकडून सिराजने १० षटकांत केवळ ३८ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय शार्दुल, शाहबाज, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

पुढील बातम्या