मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs SA Playing 11: भारतासाठी ‘करो या मरो'चा सामना, संघात आज होणार ‘हे’ मोठे बदल

IND vs SA Playing 11: भारतासाठी ‘करो या मरो'चा सामना, संघात आज होणार ‘हे’ मोठे बदल

Oct 09, 2022, 10:34 AM IST

    • IND vs SA 2nd ODI Playing 11 Prediction Team Preview: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल.
IND vs SA Playing 11

IND vs SA 2nd ODI Playing 11 Prediction Team Preview: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल.

    • IND vs SA 2nd ODI Playing 11 Prediction Team Preview: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रविवारी रांची येथे होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरणार आहे. सामना दुपारी १:३० वाजता सुरु होईल.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज (९ ऑक्टोबर) रांचीमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जाणार आहे. मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेली टीम इंडिया आज प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकते. दीपक चहरच्या दुखापतीनंतर वॉशिंग्टन सुंदरने भारतीय संघात प्रवेश केला असून रांची वनडेत प्लेइंग इलेव्हनमध्ये सुंदरला स्थान मिळू शकते, असे मानले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वॉशिंग्टन सुंदर प्लेईंग ११ मध्ये खेळू शकतो

लखनौ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत ५ गोलंदाजी पर्यायांसह मैदानात उतरला होता. ज्यामध्ये एकही फिंगर स्पिनर नव्हता. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजीत कमाल करु शकतो.

वॉशिंग्टन सुंदर कोणाची जागा घेणार

पण आता प्लेइंग इलेव्हनमध्ये वॉशिंग्टन सुंदर कोणत्या खेळाडूची जागा घेणार हा प्रश्न आहे. गेल्या सामन्यातील गोलंदाजांची आकडेवारी पाहिली तर रवी बिश्नोई हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. ४० षटकांच्या सामन्यात त्याला ८ षटके टाकायची होती, ज्यामध्ये त्याने ६९ धावा देऊन फक्त एक विकेट घेतली. संघात आणखी एक फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आहे, पण कुलदीपची लखनऊमध्ये कामगिरी चांगली होती, त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची शक्यता कमी आहे.

इशान-ऋतुराजला चांगली संधी

याशिवाय फलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर वगळता एकाही फलंदाजाला पहिल्या वनडेत आपली छाप सोडता आली नाही. हवेत डोलणाऱ्या चेंडूसमोर सलामीवीर शुभमन गिल आणि शिखर धवन अपयशी ठरले. त्याचवेळी इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनाही विकेट वाचवण्याच्या प्रयत्नात आपला नैसर्गिक खेळ दाखवता आला नाही. या सर्व फलंदाजांना रांचीमध्ये धावा करण्याची उत्तम संधी असेल.

भारताची संभाव्य प्लेइंग ११- शिखर धवन, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर/रवी बिश्नोई, आवेश खान, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज

पुढील बातम्या