मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs PAK T20 Live: वर्ल्डकपचा मंच, कोहली सरपंच... शेवटच्या चेंडूवर भारतानं मेलबर्न जिंकलं
IND vs PAK T20

IND vs PAK T20 Live: वर्ल्डकपचा मंच, कोहली सरपंच... शेवटच्या चेंडूवर भारतानं मेलबर्न जिंकलं

Oct 23, 2022, 05:50 PMIST

Live Cricket Score India vs Pakistan T20 World Cup: T20 विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगला. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदानावर दोन्ही संघ सुमारे एक लाख प्रेक्षकांसमोर खेळत होते. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत आठ गडी गमावून १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने अखेरच्या चेंडूवर सामना जिंकला.

Oct 23, 2022, 05:50 PMIST

IND vs PAK Live: विराटनं दिली भारतीयांना दिवाळीची भेट, शेवटच्या चेंडूवर टीम इंडिया विजयी

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे की, तोच मॉडर्न क्रिकेटचा सर्वात मोठा मॅचविनर आहे. विराटने टी-20 विश्वचषकातील भारताच्या पहिल्याच सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. सोबत त्याने देशवासीयांनी दिवाळीचे गोड भेट देखील दिली.

विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध ५३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे भारताने पाकिस्तानचा ४ विकेट्सने पराभव केला आणि गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकातील पराभवाचा बदला पूर्ण केला. T20 विश्वचषक २०२१ च्या साखळी सामन्यात पाकिस्तान संघाने दुबईच्या मैदानावर भारताचा १० गडी राखून पराभव केला होता.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघाने ८ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या, त्यात इफ्तिखार अहमद आणि शान मसूद यांनी अर्धशतके झळकावली. त्याचवेळी भारताकडून हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगने ३-३ विकेट घेतल्या.

१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताचा संघ मैदानात उतरला तेव्हा टीम इंडियाने अवघ्या ३१ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर विराट कोहलीने हार्दिक पांड्यासोबत ११३ धावांची भागीदारी केली आणि संघाला सामना जिंकवून दिला. मात्र, विजयी शॉट अश्विनच्या बॅटमधून आला, त्याने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.

Oct 23, 2022, 05:27 PMIST

IND vs PAK Live: विराटनं दिली भारतीयांना दिवाळीची भेट, शेवटच्या चेंडूवर टीम इंडिया विजयी

सुपर-१२ च्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने भारतीय चाहत्यांना दिवाळी भेट दिली आहे. या सामन्यात त्याने ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी खेळली.

Oct 23, 2022, 05:10 PMIST

IND vs PAK Live: टीम इंडियाला विजयासाठी ६ चेंडूत १६ धावांची गरज

हार्दिक आणि विराट यांनी ७५ चेंडूत १०० धावांची भागिदारी केली आहे. विराट कोहलीने १९ व्या षटकात हारीस रौफच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार ठोकले. टीम इंडियाला विजयासाठी आता ६ चेंडूत १६ धावांची गरज आहे. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या मैदानात आहेत. तर फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाज शेवटचे षटक टाकणार आहे. 

Oct 23, 2022, 05:05 PMIST

IND vs PAK Live: भारताला विजयासाठी १२ चेंडूत ३१ धावांची आवश्यकता

भारताला १२ चेंडूत ३१ धावांची आवश्यकता. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या मैदानात आहेत. विराट ४७ चेंडूत ६१ धावांवर खेळत आहे. 

Oct 23, 2022, 05:02 PMIST

IND vs PAK Live: भारताला विजयासाठी १८ चेंडूत ४८ धावांची आवश्यकता

भारताला १८ चेंडूत ४८ धावांची आवश्यकता. विराट कोहली आणि हार्दिक पांड्या मैदानात आहेत. 

Oct 23, 2022, 05:00 PMIST

IND vs PAK Live: भारताला विजयासाठी आणखी ३० चेंडूत ६० धावांची गरज, हार्दिक विराट मैदानात

१५ षटकांनंतर भारताच्या १०० धावा झाल्या आहेत. विराट कोहली ४२ धावांवर तर हार्दिक पांड्या ३२ धावांवर खेळत आहेत. भारताला विजयासाठी आणखी ३० चेंडूत ६० धावांची गरज आहे.

Oct 23, 2022, 04:38 PMIST

IND vs PAK Live: टीम इंडियाला ४८ चेंडूत ८६ धावांची गरज, विराट कोहली क्रीझवर

भारताने १२ षटकांत ४ गडी गमावून ७४ धावा केल्या आहेत. सध्या हार्दिक पांड्या १८ चेंडूत २६ धावा आणि विराट कोहली २६चेंडूत २२ धावा करुन खेळत आहेत. टीम इंडियाला ४८ चेंडूत ८६ धावांची गरज आहे.

Oct 23, 2022, 04:10 PMIST

IND vs PAK Live: भारताची पॉवरप्लेमध्ये खराब फलंदाजी, भारताच्या ६ षटकात ३ बाद ३१ धावा

पॉवरप्लेमध्ये भारताने तीन सर्वोत्तम फलदाज गमावले आहेत. भारताचे रोहित-राहुल आणि सुर्या स्वस्तात तंबूत परतले आहे. ६ षटकानंतर भारताच्या ३ बाद ३१ धावा झाल्या आहेत. सध्या अक्षर पटेल आणि विराट कोहली मैदानात आहेत.

Oct 23, 2022, 04:10 PMIST

IND vs PAK Live: भारताला तिसरा धक्का, सुर्यकुमार यादव बाद

भारताला सर्वात मोठा झटका बसला आहे. फॉर्मात असलेला सुर्यकुमार यादव स्वस्ता तंबूत परतला. त्याला हारीस रौफने विकेटकीपर मोहम्मद रिझवानकरवी झेलबाद केले. सुर्याने १० चेंडूत १५ धावा केल्या. आता भारतीयांच्या सर्व आशा विराट कोहलीकडून आहेत.

Oct 23, 2022, 04:06 PMIST

IND vs PAK Live: रोहित शर्मा बाद, भारतीय संघाला दुसरा धक्का

भारतीय संघाला दुसरा धक्का कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने बसला आहे. रोहित शर्माला इफ्तिखार अहमदने हारिस रौफच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद केले. आता सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. सूर्यकुमारने पहिल्याच चेंडूवर जबरदस्त चौकार ठोकला.

Oct 23, 2022, 04:06 PMIST

IND vs PAK Live: भारताला पहिला झटका, केएल राहुल बोल्ड; नसीम शाहनं केली शिकार

१६० धावांचा पाठलाग करताना भारताला पहिला झटका बसला आहे. दुसऱ्याच षटकात केएल राहुल बोल्ड झाला. त्याला १९ वर्षीय नसीम शाहने बाद केले. राहुलने ८ चेंडूत ४ धावा केल्या. 

Oct 23, 2022, 03:29 PMIST

IND vs PAK Live: भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे आव्हान

पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत आठ गडी गमावून १५९ धावा केल्या. पाकिस्तानकडून शान मसूदने ४२ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी इफ्तिखार अहमदने ३४ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याचवेळी भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

Oct 23, 2022, 03:12 PMIST

IND vs PAK Live: अर्शदीप सिंगने पाकिस्तानला दिला ७ वा धक्का, आसिफ अली बाद

अर्शदीप सिंगने भारताला ७ वे यश मिळवून दिले. त्याच्या चेंडूवर आसिफ अलीने ३ धावा करून दिनेश कार्तिककडे विकेटच्या मागे झेल दिला. आता शाहीन शाह आफ्रिदी फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

Oct 23, 2022, 02:53 PMIST

IND vs PAK Live: १५ षटकानंतर पाकिस्तान ५ बाद १०६ धावा

इफ्तिखार आणि मसूद यांनी ५० चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली. मात्र, इफ्तिकार बाद झाल्यानंतर पाकिस्तान डाव पुन्हा गडगडला आहे. १४ व्या षटकांत पाकिस्तान दोन धक्के बसले. हार्दिकने त्या षटकात शादाब खान आणि हैदर अली यांना सुर्यकुमार यादव करवी झेलबाद केले. आता १५ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात १०६ धावा आहे. सध्या शान मसूद आणि मोहम्मद नवाज क्रीजवर आहेत.

Oct 23, 2022, 02:53 PMIST

IND vs PAK Live: हैदर अली बाद, पाकिस्तानचे ५ फलंदाज बाद

हैदर अली ४ चेंडूत २ धावा करुन बाद झाला. त्याला हार्दिक पांड्याने सुर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. पाकिस्तानच्या सध्या १४.४ षटकात ५ बाद १०३ धावा झाल्या आहेत. 

Oct 23, 2022, 02:48 PMIST

IND vs PAK Live: हार्दिक पांड्याने पाकिस्तानला दिला चौथा झटका, शादाब खान बाद

शादाब खानच्या रूपाने पाकिस्तानला चौथा धक्का बसला आहे. शादाब ५ धावा करून हार्दिक पांड्याच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद झाला. आता हैदर अली फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

Oct 23, 2022, 02:48 PMIST

IND vs PAK Live: मोहम्मद शमीने काढली इफ्तिखार अहमदची विकेट

मोहम्मद शमीने भारताला तिसरे यश मिळवून दिले आहे. इफ्तिखार अहमद ५१ धावा करून एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याला शमीने बाद केले. आता शादाब खान फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.

Oct 23, 2022, 01:58 PMIST

IND vs PAK Live Score: पाकिस्तानला दुसरा धक्का, अर्शदीपचा कहर

अर्शदीप सिंगने पाकिस्तानच्या डावातील चौथ्या षटकात दुसरी विकेट घेतली. त्याने मोहम्मद रिझवानलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रिझवानला १२ चेंडूत ४ धावा करता आल्या. अर्शदीपने यापूर्वी बाबर आझमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. त्याला खातेही उघडता आले नाही. चार षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या दोन बाद १५ धावा आहे. शान मसूद आणि इफ्तिखार अहमद सध्या क्रीजवर आहेत.

Oct 23, 2022, 01:44 PMIST

IND vs PAK Live Score: अर्शदीप सिंगने दिला पहिला धक्का, बाबर आझम शुन्यावर बाद

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्याच चेंडूवर बाद झाला. अर्शदीप सिंगने पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानच्या कर्णधाराला एलबीडब्ल्यू आऊट केले. आता शान मसूद फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. पाकिस्तानचा स्कोअर १ बाद २ धावा असा आहे

Oct 23, 2022, 01:15 PMIST

IND vs PAK Live Score: दोन्ही संघ खालीलप्रमाणे

Oct 23, 2022, 01:15 PMIST

IND vs PAK Live Score: दोन्ही संघ खालीलप्रमाणे 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

Oct 23, 2022, 01:14 PMIST

IND vs PAK T20 Live: भारताने नाणेफेक जिंकली, गोलंदाजीचा निर्णय

टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सुपर १२ फेरीतील सामना होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 23, 2022, 12:47 PMIST

IND vs PAK T20 Live: थोड्याच वेळात टॉस 

भारत आणि पाकिस्तान सामन्यात नाणेफेक थोड्या वेळाने होईल. हजारो प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले आहेत. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. नाणेफेक दुपारी १ वाजता होईल आणि त्यानंतर १:३० वाजता सामना सुरू होईल.

Oct 23, 2022, 12:45 PMIST

Melbourne Weather Forecast IND vs PAK T20 Live: सामन्याच्या वेळी हवामान कसे असेल?

 मेलबर्नमधील हवामान पावसाची शक्यता
 सायंकाळी ७ वाजता २ टक्के
 रात्री ८ वाजता ४ टक्के
 रात्री ९ वाजता ४ टक्के
 रात्री १० वाजता ५ टक्के
 रात्री ११  वाजता ७ टक्के

Oct 23, 2022, 12:22 PMIST

IND vs PAK T20 Live: गुड न्यूज! मेलबर्नमध्ये हवामान स्वच्छ

भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेलबर्नमध्ये हवामान स्वच्छ झाले आहे. आकाशातून ढग गायब झाले आहेत. मेलबर्नमध्ये स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. त्यावेळी भारतात दुपारचे दीड वाजलेले असतील. मेलबर्नमध्ये रात्री ११ वाजेपर्यंत सर्वाधिक ७ टक्के पावसाची शक्यता आहे.

Oct 23, 2022, 11:48 AMIST

IND vs PAK T20 Live: भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने शेअर केला व्हिडिओ

बीसीसीआयने भारत-पाक सामन्यापूर्वीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये भारतीय खेळाडू सराव करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मेलबर्नमधील हवामान साफ दिसत आहे.

Oct 23, 2022, 11:28 AMIST

IND vs PAK T20 Live- Playing 11 : भारताची संभाव्य प्लेईंग-११

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन/युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल/मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

Oct 23, 2022, 11:28 AMIST

IND vs PAK T20 Live- Playing 11 : पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग-११

बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), शान मसूद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.

Oct 23, 2022, 10:43 AMIST

IND vs PAK T20 Live: मेलबर्न स्टेडियमजवळ प्रेक्षकांची गर्दी

मेलबर्नमध्‍ये सामना सुरू होण्‍यासाठी अजून तीन तासांचा अवधी बाकी आहे, पण प्रेक्षक स्टेडियमजवळ जमू लागले आहेत. भारतीय चाहते हातात तिरंगा घेऊन पोहोचत आहेत. मेलबर्नच्या बाजारपेठांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Oct 23, 2022, 09:54 AMIST

IND vs PAK T20 Live: मेलबर्नमध्ये हवामान कसे असेल

मेलबर्नमध्ये शनिवारी रात्री ढगाळ वातावरण होते, पण पाऊस पडला नाही. रविवारीही वातावरण ढगाळ आहे. पण अजून पाऊस झालेला नाही. ही दोन्ही देशांसाठी आनंदाची बाब आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यताही कमीच आहे.

Oct 23, 2022, 09:50 AMIST

IND vs PAK T20 Live: मेलबर्नमध्‍ये भारतीय खेळाडूंची पेंटिंग

मेलबर्नच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मेलबर्नच्या रस्त्यावर भारतीय खेळाडूंची पेंटिंग्ज बनवण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या हे प्रमुख आहेत.

Oct 23, 2022, 09:43 AMIST

IND vs PAK T20 Live: भारत विरुद्ध पाकिस्तान हेड टू हेड

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ११ टी-20 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारताने आठ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने केवळ तीन सामने जिंकले आहेत. T20 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर दोघांमध्ये ६ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५ विजय मिळवले आहेत. तर पाकिस्तानने एक सामना जिंकला आहे.

    शेअर करा