मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND VS NZ : वर्ल्डकपसाठी रोहितसेना पूर्णपणे तयार, हे आकडे पाहून पुन्हा टीम इंडियाच्या प्रेमात पडाल!

IND VS NZ : वर्ल्डकपसाठी रोहितसेना पूर्णपणे तयार, हे आकडे पाहून पुन्हा टीम इंडियाच्या प्रेमात पडाल!

Aug 04, 2023, 07:09 PM IST

  • Team India, ODI World Cup : भारतीय संघ २०२३ च्या विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडिया कमालीची कामगिरी करताना दिसली आहे.

Team India, ODI World Cup

Team India, ODI World Cup : भारतीय संघ २०२३ च्या विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडिया कमालीची कामगिरी करताना दिसली आहे.

  • Team India, ODI World Cup : भारतीय संघ २०२३ च्या विश्वचषकासाठी पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडिया कमालीची कामगिरी करताना दिसली आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ भारता होणार आहे. यापूर्वी २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळला गेला होता. त्या वर्षी भारतीय संघाने दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. आता पुन्हा एकदा भारतात विश्वचषक होत असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. या विश्वचषकासाठी टीम इंडिया पूर्णपणे तयार असल्याचे दिसत आहे. गेल्या ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ उत्कृष्ट लयीत दिसला आहे. यामध्ये संघाने एकदा ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे तर तीन वेळा ३५० हून अधिक धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना आक्रमक फॉर्ममध्ये दिसला आहे. १० डिसेंबर २०२२ रोजी बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने ४०९ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात टीम इंडियाने २२७ धावांनी मोठा विजय नोंदवला होता.

यानंतर भारतीय संघाने गुवाहाटी येथे २०२३ मधला पहिला एकदिवसीय सामना खेळला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने ५० षटकात ७ बाद ३७३ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारतीय संघाने ६७ धावांची विजय मिळवला.

त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेतीलट तिसऱ्या सामन्यात भारताने ५० षटकांत ५ गडी गमावून ३९० धावा केल्या होत्या. यामध्ये भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा ३१७ धावांनी विजय नोंदवला होता.

आता आज (२४ जानेवारी) न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या वनडे सामन्यातही भारताने धावांचा डोंगर उभारला होता. भारताने आज ५० षटकात ९ बाद ३८५ धावा केल्या होत्या. तर या मालिकेतील पहिल्या सामन्यातही भारताने ३४९ धावांचा डोंगर उभारला होता.

गेल्या ५ सामन्यातील टीम इंडियाची धावसंख्या (प्रथम फलंदाजी करताना)

गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघा प्रथम फलंदाजी करत आहे

४०९/८ बांगलादेशविरुध (चितगाव)

३७३/७ श्रीलंकेविरुद्ध (गुवाहाटी)

३९०/५ श्रीलंकेविरुद्ध (तिरुवनंतपुरम)

३४९/८ न्यूझीलंडविरुद्ध (हैदराबाद)

३८५/९ न्यूझीलंडविरुद्ध (इंदूर)

पुढील बातम्या