मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik: न्यूझीलंड दौऱ्यात उमरानला 'या' गोष्टी करू शकतात मदत, झहीरनं दिला गुरूमंत्र

Umran Malik: न्यूझीलंड दौऱ्यात उमरानला 'या' गोष्टी करू शकतात मदत, झहीरनं दिला गुरूमंत्र

Nov 19, 2022, 06:57 PM IST

    • zaheer khan on Umran Malik IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यावर उमरान मलिकचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. झहीर खानने उमरानबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उमरानला कोणत्या गोष्टी मदत करू शकतात हे त्याने सांगितले आहे.
Umran Malik

zaheer khan on Umran Malik IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यावर उमरान मलिकचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. झहीर खानने उमरानबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उमरानला कोणत्या गोष्टी मदत करू शकतात हे त्याने सांगितले आहे.

    • zaheer khan on Umran Malik IND vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यावर उमरान मलिकचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. झहीर खानने उमरानबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उमरानला कोणत्या गोष्टी मदत करू शकतात हे त्याने सांगितले आहे.

टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडिया सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी नियमित कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुलसह विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तर अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमरान पुन्हा एकदा सर्वांच्या नजरेत आला आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने उमरान मलिकबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यात उमरानला कोणत्या गोष्टी मदत करू शकतात हे झहीरने सांगितले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

झहीर खानने एका टीव्ही चॅनेलवर सांगितले की, “उमरान ही एक अतिशय रोमांचक प्रतिभा आहे. मात्र, आता पुढील गोष्टी त्याच्यावर राहणार आहेत. त्याला या स्थानावर खेळायचे असेल तर तो पुढील गोष्टी कशा पद्धतीने हाताळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याला लाईन आणि लेंन्थवर कंट्रोल ठेवून योग्य टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीत व्हेरिएशन आणावे लागेल" 

भारताच्या गोलंदाजीबाबत झहीर काय म्हणाला?

टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाबाबत झहीर खान म्हणाला की, संघाच्या वेगवान आक्रमणात विविधता खूप महत्त्वाची असते आणि तुम्ही या पद्धतीचे अनुसरण करणारे संघ पाहिले आहेत. तुम्हाला डाव्या हाताच्या गोलंदाजाची गरज आहे, तुम्हाला बॉल स्विंग करू शकेल अशा व्यक्तीची गरज आहे. तसेच, तुम्हाला अतिशय वेगाने चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाची आवश्यकता आहे'.

जर हे सर्व एकाच गोलंदाजामध्ये असेल तर त्याहून चांगले काय असेल? पण तसे नसेल, तर तुम्हाला गोलंदाजी लाइनअपमध्ये वैविध्य आणावे लागेल. वेगवेगळ्या परिस्थितींचा चांगला उपयोग करून घ्यावा लागेल."

आंतरराष्ट्रीय पदार्पण चांगले झाले नाही

उमरानने आतापर्यंत एकूण ३ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ २ विकेट घेतल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, उमरानने आयपीएल २०२२ च्या १४ सामन्यांमध्ये २२ विकेट घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. चांगली कामगिरी न केल्यामुळे त्याला पुढे जाता आले नाही. आता पुन्हा एकदा त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

पुढील बातम्या