मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs NZ 1st ODI: वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी; श्रेयसच्या ८० धावा, न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचं लक्ष्य

IND vs NZ 1st ODI: वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी; श्रेयसच्या ८० धावा, न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचं लक्ष्य

Nov 25, 2022, 10:58 AM IST

    • India Vs New Zealand ODI Match Scorecard: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आज (२५ नोव्हेंबर) ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया मैदानात उतरली आहे. त्याचबरोबर केन विल्यमसन न्यूझीलंडची कमान सांभाळत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी आज भारताकडून वनडे पदार्पण केले आहे.
India Vs New Zealand ODI Match

India Vs New Zealand ODI Match Scorecard: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आज (२५ नोव्हेंबर) ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया मैदानात उतरली आहे. त्याचबरोबर केन विल्यमसन न्यूझीलंडची कमान सांभाळत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी आज भारताकडून वनडे पदार्पण केले आहे.

    • India Vs New Zealand ODI Match Scorecard: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आज (२५ नोव्हेंबर) ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या मालिकेत शिखर धवनच्या नेतृत्वाखाली युवा टीम इंडिया मैदानात उतरली आहे. त्याचबरोबर केन विल्यमसन न्यूझीलंडची कमान सांभाळत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांनी आज भारताकडून वनडे पदार्पण केले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना आज (२५ नोव्हेंबर) ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने  प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर ३०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. शेवटच्या काही षटकात वॉशिंग्टन सुंदरने वेगाने धावा करत भारताची धावसंख्या ३०० च्या पुढे नेली. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ८० धावा केल्या. शिखर धवन आणि शुभमन गिल यांनीही अर्धशतकी खेळी केली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात संथ पण भक्कम झाली. कर्णधार शिखर धवन आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. यानंतर दोन्ही फलंदाज एकाच षटकात बाद झाले. येथून न्यूझीलंडला पुनरागमनाची संधी मिळाली. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी ३२ धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला, परंतु लॉकी फर्ग्युसनने पंत आणि सूर्यकुमार यांना एकाच षटकात बाद करून किवींना पुन्हा चांगल्या स्थितित आणले. यानंतर श्रेयसने सॅमसनसोबत ९४ धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या २५० धावांच्या पुढे नेली. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने वेगवान फलंदाजी करत भारताची धावसंख्या ३०० धावांच्या पुढे नेली.

भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक ८० धावा केल्या. शिखर धवन ७२ आणि शुभमन गिल ५० धावा करून बाद झाले. संजू सॅमसनने ३६ धावांची उपयुक्त खेळी केली. शेवटी वॉशिंग्टन सुंदरने १६ चेंडूत ३७ धावांची तुफानी खेळी केली. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार खेचले.

पुढील बातम्या