मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG T20: मायकल वॉनचं ट्वीट खटकलं, जाफरची पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडं 'ही' मागणी

IND vs ENG T20: मायकल वॉनचं ट्वीट खटकलं, जाफरची पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याकडं 'ही' मागणी

Nov 10, 2022, 02:43 PM IST

    • ind vs eng wasim jaffer michael vaughan tweet: सेमी फानयल सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. मार्क वुड दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही. अशा स्थितीत वॉनने एक ट्वीट केले आहे. यात त्याने भारत फेव्हरेट असल्याचे लिहिले आहे.
wasim jaffer vs Michael Vaughan

ind vs eng wasim jaffer michael vaughan tweet: सेमी फानयल सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. मार्क वुड दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही. अशा स्थितीत वॉनने एक ट्वीट केले आहे. यात त्याने भारत फेव्हरेट असल्याचे लिहिले आहे.

    • ind vs eng wasim jaffer michael vaughan tweet: सेमी फानयल सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. मार्क वुड दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही. अशा स्थितीत वॉनने एक ट्वीट केले आहे. यात त्याने भारत फेव्हरेट असल्याचे लिहिले आहे.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वसीम जाफर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यांच्यातले ट्वीटयुद्ध हे काही नवीन नाही. टी-20 विश्वचषकाचा दुसऱ्या सेमी फायनलचा सामना आज (१० नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. या दरम्यान, ट्विटरवर वॉन आणि जाफर पुन्हा आमने सामने आले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सेमी फानयल सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. मार्क वुड दुखापतीमुळे या सामन्यात खेळत नाही. अशा स्थितीत वॉनने एक ट्वीट केले आहे. यात त्याने भारत फेव्हरेट असल्याचे लिहिले आहे.

ट्वीटरवर नेमकं काय घडलं

वॉनने ट्विटरवर लिहिले की, 'इंग्लंडला मोठा धक्का... वुड फिट नाही. भारत आता फेव्हरेट आहे….’ यावर जाफरने क्षणाचाही विलंब न करता कमेंट करत लिहिले, ‘हॅलो ऋषी सुनक! पुढील काही तासांसाठी यॉर्कशायरमध्ये मोबाईल सिग्नल जॅमर बसवले जावेत, मला वाटते भारताकडून या गोष्टीला गुडविल जेस्चर म्हणून पाहिले जाईल". धन्यवाद.'

दरम्यान, सेमी फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात मार्क वुड आणि डेव्हिड मलान दुखापतींमुळे बाहेर आहेत. या दोघांच्या जागी ख्रिस जॉर्डन आणि फिलिप सॉल्टची निवड करण्यात आली आहे. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आजच्या सामन्यातील विजेता संघ १३ नोव्हेंबरला जेकेपदासाठी पाकिस्तानशी लढेल. पाकिस्तानने न्यूझीलंडला हरवून फायनल गाठली आहे.

पुढील बातम्या