मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG : विराटचं पुनरागमन? दुसऱ्या वन-डेसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG : विराटचं पुनरागमन? दुसऱ्या वन-डेसाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Jul 13, 2022, 07:35 PM IST

    • पहिल्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने ६ तर मोहम्मद शमीने इंग्लंडचे तीन फलंदाज बाद केले. तर फलंदाजीत रोहित शर्माने आक्रमक ७६ धावांची खेळी केली.
virat and rohit

पहिल्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने ६ तर मोहम्मद शमीने इंग्लंडचे तीन फलंदाज बाद केले. तर फलंदाजीत रोहित शर्माने आक्रमक ७६ धावांची खेळी केली.

    • पहिल्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने ६ तर मोहम्मद शमीने इंग्लंडचे तीन फलंदाज बाद केले. तर फलंदाजीत रोहित शर्माने आक्रमक ७६ धावांची खेळी केली.

टीम इंडियाने पहिलया सामन्यात इंग्लंडवर शानदार विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या गुरुवारी लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकून मालिका  खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होईल.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पहिल्या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने ६ तर मोहम्मद शमीने इंग्लंडचे तीन फलंदाज बाद केले. तर फलंदाजीत रोहित शर्माने आक्रमक ७६ धावांची खेळी केली. 

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे पहिल्या वनडेत खेळला नाही. दुसऱ्या सामन्यातही त्याची खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात जो संघ मैदानात उतरला होता, तोच संघ लॉर्ड्सवरील सामन्यासाठीही उतरवाला जाण्याची शक्यता आहे.  

इंग्लंडविरुद्ध भारताचे शानदार रेकॉर्ड-

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण १०३ सामने झाले आहेत. यापैकी ५५ भारताने तर ४३ इंग्लंडने जिंकले आहेत. तीन सामने अनिर्णित राहिले आणि दोन सामने अनिर्णित राहिले.

तसेच, भारताने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत १० एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत, परंतु इंग्लिश भूमीवर टीम इंडियाला केवळ तीनच मालिका जिंकता आल्या आहेत. भारताने इंग्लंडमध्ये आपला शेवटचा मालिका विजय ८ वर्षांपूर्वी मिळवला होता. टीम इंडियाने २०१४ मध्ये इंग्लंडला ३-१ असे पराभूत केले होते. तर, इंग्लंडने भारताविरुद्ध आतापर्यंत ८ मालिका जिंकल्या आहेत.

पहिल्या वनडेत शानदार विजय-

दरम्यान, भारताने पहिला वनडे अगदी सहज जिंकला होता. इंग्लंडचा संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ ११० धावा केल्या होत्या.  त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने अवघ्या५८ चेंडूत ७६ धावांची नाबाद खेळी करत टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला. याआधी गोलंदाजीत बुमराहने ६ आणि शमीने ३ विकेट घेतल्या होत्या.

संभाव्य टीम इंडिया: 

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.

 

पुढील बातम्या