मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG Highlights: इंग्लंड ऐटीत फायनलमध्ये, टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर
IND vs ENG T20 Live

IND vs ENG Highlights: इंग्लंड ऐटीत फायनलमध्ये, टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर

Nov 10, 2022, 07:06 PMIST

India vs England T20 World Cup 2nd Semi Final Highlights: टी -20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला. या पराभवामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा उपांत्य फेरीतून बाहेर पडली आहे. हा सामना अॅडलेडमध्ये खेळला गेला. आता १३ नोव्हेंबरला जेतेपदाच्या लढतीत इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा सामना करणार आहे. फायनल सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे.

Nov 10, 2022, 07:01 PMIST

IND vs ENG T20 Live: इंग्लंड ऐटीत फायनलमध्ये, टीम इंडिया वर्ल्डकपमधून बाहेर

सेमीफायनलमध्ये इंग्लंडने भारताचा १० विकेट्सने धुव्वा उडवला. इंग्लंडने १६९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १६ षटकात एकही विकेट न गमावता १७० धावा करत सामना जिंकला. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. तर कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत ८० धावा केल्या. 

भारताच्या सहापैकी ४ गोलंदाजांनी आज १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. एकालाही विकेट मिळाला नाही.

भारताचा डाव

टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात न

व्हानात्मक लक्ष्य मिळाले आहे. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकार मारले. हार्दिक शेवटच्या चेंडूवर हिट विकेटद्वारे बाद झाला. त्याच्याशिवाय विराट कोहलीने ४० चेंडूत ५० धावांची खेळी खेळली.

हार्दिक आणि कोहली वगळता एकाही फलंदाजाला भारतासाठी मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार रोहित शर्मा २७ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने १४ धावा केल्या. ऋषभ पंत ६ आणि केएल राहुलने ५ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन एकही चेंडू न खेळता शून्यावर नाबाद राहिला.

तर इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने ४ षटकांत ४३ धावा देत ३ बळी घेतले. ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवला.

Nov 10, 2022, 04:25 PMIST

IND vs ENG T20 Live: इंग्लंडने १३ षटकात १४० धावा

इंग्लंडने १३ षटकात १४० धावा केल्या आहेत. इंग्लंडला विजयासाठी ४२ चेंडूत २९ धावा करायच्या आहेत. बटलर ३७ चेंडूत ५६ आणि अॅलेक्स हेल्स ४१ चेंडूत ८० धावांवर खेळत आहेत.

Nov 10, 2022, 04:03 PMIST

IND vs ENG T20 Live: १० षटकांनंतर इंग्लंडच्या बिनबाद ९१ धावा

१० षटकांनंतर इंग्लंडच्या बिनबाद ९१ धावा झाल्या आहेत. हेल्स २९ चेंडूत ५१ तर बटलर २५ चेंडूत ३६ धावा करून खेळत आहेत.

Nov 10, 2022, 03:45 PMIST

IND vs ENG T20 Live: पॉवरप्लेमध्ये इंग्लंडच्या बिनबाद ६३ धावा

६ षटकानंतर इंग्लंडच्या बिनबाद ६३ धावा झाल्या आहेत. हेल्स १९ चेंडूत ३३ धावांवर तर बटलर १७ चेंडूत २८ धावांवर खेळत आहेत. 

Nov 10, 2022, 03:42 PMIST

IND vs ENG T20 Live: इंग्लंडच्या ४ षटकांत ४१ धावा

१६९ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने शानदार सुरुवात केली आहे. ४ षटकांत इंग्लंडने ४१ धावा चोपल्या आहेत. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी इंग्लंडला वेगवान सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत इंग्लंडसाठी सामना सोपा करत आहेत. इंग्लंडच्या सलामीच्या जोडीने पहिल्या षटकात १३, दुसऱ्या षटकात ८, तिसऱ्या षटकात १२ आणि चौथ्या षटकात ८ धावा केल्या. बटलर १४ चेंडूत २४ तर हेल्स १० चेंडूत १५ धावा करुन खेळत आहेत.

Nov 10, 2022, 03:25 PMIST

IND vs ENG T20 Live: इंग्लंडचा डाव सुरू

इंग्लंडचा डाव सुरू झाला आहे. कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स क्रीजवर आहेत. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात बटलरने ३ चौकार मारले. इंग्लंडने एका षटकात बिनबाद १३ धावा केल्या आहेत.

Nov 10, 2022, 03:17 PMIST

IND vs ENG T20 Live: इंग्लंडसमोर १६९ धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडविरुद्ध २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या आहेत. इंग्लिश संघाला १६९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य मिळाले आहे. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकार मारले. हार्दिक शेवटच्या चेंडूवर हिट विकेटद्वारे बाद झाला. त्याच्याशिवाय विराट कोहलीने ४० चेंडूत ५० धावांची खेळी खेळली.

हार्दिक आणि कोहली वगळता एकाही फलंदाजाला भारतासाठी मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार रोहित शर्मा २७ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने १४ धावा केल्या. ऋषभ पंत ६ आणि केएल राहुलने ५ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन एकही चेंडू न खेळता शून्यावर नाबाद राहिला. 

तर इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने ४ षटकांत ४३ धावा देत ३ बळी घेतले. ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवला.

Nov 10, 2022, 03:00 PMIST

IND vs ENG T20 Live: हार्दिक पंड्याचं अर्धशतक 

हार्दिक पांड्याने १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने १९षटकांत ४ बाद १५६ धावा केल्या आहेत. दुसऱ्या टोकाला ऋषभ पंत आहे.

Nov 10, 2022, 02:54 PMIST

ND vs ENG T20 Live: विराट कोहली बाद

१८ व्या षटकात विराट कोहली बाद झाला. त्याला ख्रिस जॉर्डनने आदिल रशिदकरवी झेलबाद केले. विराटने ४० चेंडूत ५० धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि १ षटकार मारला. १८ षटकांनंतर भारताच्या १३५ धावा झाल्या आहेत. हार्दिक पाडंया २६ चेंडूत ३८ धावांवर खेळत आहे.

Nov 10, 2022, 02:22 PMIST

ND vs ENG T20 Live: भारताला तिसरा धक्का, सुर्या बाद

१२व्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला. चांगल्या लयीत असलेला सुर्यकुमार यादव आदिल रशीदला षटकार खेचण्याच्या नादात झेलबाद झाला. फिल लॉल्टने त्याचा झेल घेतला. सुर्याने १० चेंडूत १४ धावा केल्या. भारताच्या १२ षटकानंतर ३ बाद ७७ धावा झाल्या आहेत.

Nov 10, 2022, 02:22 PMIST

ND vs ENG T20 Live: भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा बाद

९ व्या षटकात भारताला मोठा धक्का बसला. चांगल्या लयीत दिसणारा रोहित शर्मा ख्रिस जॉर्डनला षटकार खेचण्याच्या नादात झेलबाद झाला. सॅम करनने त्याचा झेल घेतला. रोहितने २८ चेंडूत २७ धावा केल्या. भारताच्या ९ षटकानंतर २ बाद ५६ धावा झाल्या आहेत.

Nov 10, 2022, 01:57 PMIST

ND vs ENG T20 Live: पॉवरप्लेमध्ये भारताच्या १ बाद ३७

६ षटकांनंतर भारताच्या १ बाद ३७ धावा झाल्या आहेत. रोहित आणि विराट कोहली खेळत आहेत. रोहित १८ चेंडूत २० तर कोहली १३ चेंडूत १२ धावांवर खेळत आहेत. 

Nov 10, 2022, 01:40 PMIST

ND vs ENG T20 Live: भारताला पहिला धक्का, केएल राहुल बाद

दुसऱ्याच षटकात भारताला मोठा धक्का बसला. भारताला पहिला धक्का, केएल राहुल ५ धावा करुन बाद झाला. त्याला ख्रिस वोक्सने विकेटकीपर जोस बटलरकरवी झेलबाद केले. भारताच्या २ षटकानंतर १ बाद १० धावा झाल्या आहेत.

Nov 10, 2022, 01:30 PMIST

IND vs ENG T20 Live: भारतीय सलामीवीर क्रीजवर 

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल क्रीझवर उतरले आहेत. या दोघे संघाला चांगली सुरुवात करून देतील अशी अपेक्षा आहे. रोहित आणि राहुल यांनी आतापर्यंत या स्पर्धेत अर्धशतकी भागीदारी केली नाही. बेन स्टोक्स इंग्लंडकडून गोलंदाजी करत ​​आहे.

Nov 10, 2022, 01:08 PMIST

IND vs ENG T20 Live: दोन्ही संघांची प्लेईंग-11

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार आणि विकेटकीपर), अॅलेक्स हेल्स, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद.

Nov 10, 2022, 01:07 PMIST

T20 WC Ind Vs Eng Live: नाणेफेक जिंकून इंग्लंडना घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय

विश्वचषकातील उपांत्य फेरीतील दुसरा सामना आज भारत आणि इंग्लंडमध्ये होत आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.

Nov 10, 2022, 12:12 PMIST

IND vs ENG T20 Live: पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ जिंकतो

अॅडलेडमध्ये आतापर्यंत एकूण ११ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. एकूण ७ सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ ४ सामन्यांत विजय मिळाला आहे.

Nov 10, 2022, 12:09 PMIST

IND vs ENG T20 Live: T20 वर्ल्डकपमधील इंग्लंडचा प्रवास

या T20 विश्वचषकातील इंग्लंडच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडने त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. मात्र, त्यानंतर त्यांना आयर्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. पण नंतर इंग्लंडने दमदार पुनरागगमन करत न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

Nov 10, 2022, 12:08 PMIST

IND vs ENG T20 Live: T20 वर्ल्डकपमधील भारताचा प्रवास

या T20 विश्वचषकातील भारतीय संघांच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धचे पहिले दोन सामने जिंकले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत बांगलादेश आणि झिम्बाब्वेचा पराभव केला.

Nov 10, 2022, 11:46 AMIST

IND vs ENG T20 Live: दोन्ही संघ खालीलप्रमाणे आहेत

भारत: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, दीपक हुडा.

इंग्लंड: जोस बटलर (w/c), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड विली, टायमल मिल्स, फिल मीठ.

Nov 10, 2022, 11:46 AMIST

IND vs ENG T20 Live: T20 विश्वचषकात इंग्लंड-भारत तीनदा आमने-सामने

२००७ च्या T20 विश्वचषकात भारताने इंग्लंडचा १८ धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी २००९ मध्ये इंग्लंडने ३ धावांनी विजय मिळवला होता. यानंतर २०१२ मध्ये भारताने इंग्लंडवर ९० धावांनी विजय मिळवला होता. अशा प्रकारे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात भारत इंग्लंडविरुद्ध २-१ ने पुढे आहे.

Nov 10, 2022, 10:29 AMIST

IND vs ENG Adelaide Weather:: असं असेल अॅडलेडचं हवामान?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान पावसाची शक्यता फारच कमी आहे. ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानुसार, गुरुवारी सकाळी अॅडलेडमध्ये पावसाची ४० टक्के शक्यता आहे. तर सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होईल. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. वाऱ्याचा वेगही सामान्य राहील. अशा स्थितीत पूर्ण सामना गुरुवारी होण्याची शक्यता आहे.

    शेअर करा