मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG : भारताने वन-डे मालिका जिंकली, रिषभ-हार्दिक तिसऱ्या सामन्याचे हिरो

IND vs ENG : भारताने वन-डे मालिका जिंकली, रिषभ-हार्दिक तिसऱ्या सामन्याचे हिरो

Jul 17, 2022, 11:06 PM IST

    • भारतीय संघाने तिसरा एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला आहे. तसेच, एकदिवसीय मालिका २-१ ने खिशात घातली आहे. इंग्लंडचे २६० धावांचे लक्ष्य भारताने ४२.१ षटकांत लक्ष्य गाठले.
IND vs ENG

भारतीय संघाने तिसरा एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला आहे. तसेच, एकदिवसीय मालिका २-१ ने खिशात घातली आहे. इंग्लंडचे २६० धावांचे लक्ष्य भारताने ४२.१ षटकांत लक्ष्य गाठले.

    • भारतीय संघाने तिसरा एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला आहे. तसेच, एकदिवसीय मालिका २-१ ने खिशात घातली आहे. इंग्लंडचे २६० धावांचे लक्ष्य भारताने ४२.१ षटकांत लक्ष्य गाठले.

भारताने इंग्लंडविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात इंग्लंडचा ५ विकेट्सनी पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य ५ गड्यांच्या मोबदल्यात ४२.१ षटकात पूर्ण केले. भारताकडून रिषभ पंतने शानदार शतक ठोकले त्याने ११३ चेंडूत १२५ धावांची खेळी केली. त्याने १६ चौकार आणि २ षटकार ठोकले. तसेच, हार्दिक पांड्यानेही दमदार ७१ धावा ठोकल्या.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, २६० धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. डावाच्या तिसऱ्या षटकात १३ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. रीस टोपलीने शिखर धवनला जेसन रॉयकरवी झेलबाद केले. धवन १ धाव करुन बाद झाला. त्यानंतर पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रीस टोपलीने कर्णधार रोहित शर्मालाही स्लिपमध्ये जो रुटकरवी झेलबाद केले. रोहितने १७ चेंडूत १७ धावा केल्या. 

या सामन्यात विराट कोहली चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, भारताला नवव्या षटकात ३८ धावांवर तिसरा धक्का बसला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड केल्याने विराट कोहली पुन्हा एकदा पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहलीला टोपलीने यष्टिरक्षक बटलरच्या हाती झेलबाद केले. कोहली २२ चेंडूत १७ धावा काढून बाद झाला.

त्यानंतर भारत अडचणीत सापडला. मात्र, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने शानदार शतकीय भागीदारी रचली. हार्दिक पांड्या ५५ चेंडूत ७१ धावा काढून बाद झाला. हार्दिकने आपल्या खेळीत १० चौकार मारले. त्याने रिषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी ११५ चेंडूत १३३ धावांची भागीदारी केली आणि भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

इंग्लंडचा डाव-

इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मोहम्मद सिराजने जसप्रीत बुमराहची उणीव भासू दिली नाही. त्याने डावाच्या दुसऱ्याच षटकात १२ धावांवर इंग्लंडला दोन धक्के दिले. सिराजने प्रथम जॉनी बेअरस्टोला श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. यानंतर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर जो रुटला स्लिपमध्ये रोहित शर्माने झेलबाद केले. रूट आणि बेअरस्टो दोघेही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतले.

यानंतर बेन स्टोक्सने जेसन रॉयसह इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी केली. रॉय ३१ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने रॉयला पंतकरवी झेलबाद केले. यानंतर हार्दिकने बेन स्टोक्सलाही बाद केले. स्टोक्स २९ चेंडूत २७ धावा काढून बाद झाला. हार्दिकने त्याच्याच चेंडूवर त्याचा झेल टिपला.

४ विकेट पडल्यानंतर मोईन अलीसह कर्णधार जोस बटलरने पाचव्या विकेटसाठी ८४ चेंडूत ७५ धावांची भागीदारी केली. मोईन ४४ चेंडूत ३४ धावा काढून बाद झाला. दरम्यान, बटलरने एकदिवसीय कारकिर्दीतील २२ वे अर्धशतक झळकावले. मात्र, अर्धशतक झळकावल्यानंतर तो फार काळ मैदानावर टिकू शकला नाही.

३७ व्या षटकात हार्दिकने इंग्लंडला दोन धक्के दिले. त्याने लियाम लिव्हिंगस्टोन आणि बटलर यांच्यातील ४९ धावांची भागीदारी मोडली. पंड्याने लिव्हिंगस्टोनला रवींद्र जडेजाने बाऊंड्रीवर झेलबाद केले. याआधीच्या दोन चेंडूंवर लिव्हिंगस्टोनने षटकार ठोकले होते. पुन्हा षटकार मारण्याच्या प्रयत्नात लिव्हिंगस्टोनने आपली विकेट गमावली. लिव्हिंगस्टोनने 27 धावा केल्या. यानंतर हार्दिकने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर बटलरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ८९ चेंडूत ६० धावा करून तो बाद झाला. जडेजाने बटलरचा अप्रतिम झेल घेतला. बटलरने आपल्या खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले.

यानंतर डेव्हिड विली आणि क्रेग ओव्हरटन यांनी डाव सांभाळत ४८ धावांची भागीदारी केली. युझवेंद्र चहलने ही भागीदारी तोडली. ओव्हरटनने ३२ धावा केल्या. इंग्लंडचा डाव ४५.५ षटकात २५९ धावांत आटोपला. भारताकडून हार्दिक पांड्याने ४ तर चहलने ३ विकेट्स घेतल्या.

पुढील बातम्या