मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IND vs ENG: भारतीय खेळाडूंनी साजरी केली बकरी ईद, उमरान-सिराजचा स्टाईलीश अंदाज

IND vs ENG: भारतीय खेळाडूंनी साजरी केली बकरी ईद, उमरान-सिराजचा स्टाईलीश अंदाज

Jul 09, 2022, 06:41 PM IST

    • उमरान मलिक, आवेश खान आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनी ईद-उल-अजहानिमित्त नमाज अदा केली. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. उमरान मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
umran malik (photo- social media)

उमरान मलिक, आवेश खान आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनी ईद-उल-अजहानिमित्त नमाज अदा केली. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. उमरान मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    • उमरान मलिक, आवेश खान आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंनी ईद-उल-अजहानिमित्त नमाज अदा केली. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. उमरान मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील कसोटी सामना गमावल्यानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात शानदार विजय मिळवला होता. आज मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. मात्र, त्यापूर्वी टीम इंडियाचे उमरान मलिक, आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांनी बकरीदचा सण साजरा केला आहे. या खेळाडूंचे याबाबतचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या फोटोत तिघेही पारंपारिक वेशात दिसत आहेत. हे तिन्ही खेळाडू देखील भारतीय संघासोबत इंग्लंडमध्येच आहेत. या खेळाडूंनी ईद-उल-अजहानिमित्त नमाज अदा केली. त्यांनी सोशल मीडियावर याबाबतचे फोटो शेअर केले आहेत. उमरान मलिकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उमरान मलिकला आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली होती. पण त्याला इंग्लंडविरुद्ध टी-२० मध्ये संधी मिळाली नाही. सिराज भारताच्या कसोटी संघासोबत होता. त्यालाही इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी सामन्यात संधी मिळाली नाही. मात्र, मोहम्मद सिराजची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. 

टीम इंडिया या महिन्याच्या अखेरीस वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध २२ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिजमध्ये आणि अमेरिकेत तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

पुढील बातम्या