मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Rohit Sharma Video : रोहित शर्मानं फॅनला केलं प्रपोज, गुलाब देऊन विचारलं विल यू मॅरी मी?

Rohit Sharma Video : रोहित शर्मानं फॅनला केलं प्रपोज, गुलाब देऊन विचारलं विल यू मॅरी मी?

Mar 20, 2023, 12:35 PM IST

    • Rohit Sharma Proposed A Fan vizag airport : रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर रोहित टीमसोबत विशाखापट्टणमला पोहोचल्यावर विमानतळावर त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या दरम्यान रोहितने एका चाहत्याला गुलाब देऊन प्रपोज केलं.
Rohit Sharma Proposed A Fan

Rohit Sharma Proposed A Fan vizag airport : रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर रोहित टीमसोबत विशाखापट्टणमला पोहोचल्यावर विमानतळावर त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या दरम्यान रोहितने एका चाहत्याला गुलाब देऊन प्रपोज केलं.

    • Rohit Sharma Proposed A Fan vizag airport : रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर रोहित टीमसोबत विशाखापट्टणमला पोहोचल्यावर विमानतळावर त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या दरम्यान रोहितने एका चाहत्याला गुलाब देऊन प्रपोज केलं.

भारतीय संघाला रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत पराभवाला सामोरे जावे लागले. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यातूनच रोहित शर्माने वनडे संघात पुनरागमन केले. कौटुंबिक कारणांमुळे रोहित पहिला वनडे खेळू शकला नाही. मात्र, त्याचे पुनरागमन काही विशेष झाले नाही. तो १३ धावा करून बाद झाला. टीम इंडिया आता बुधवारी (२२ मार्च) चेन्नईत तिसरा आणि निर्णायक सामना खेळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

व्हिडीओत काय आहे?

मात्र, याआधीचा रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर रोहित टीमसोबत विशाखापट्टणमला पोहोचल्यावर विमानतळावर त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या दरम्यान, टीम इंडियाच्या एका चाहत्याला भारतीय कर्णधार रोहितने एक मजेशीर पद्धतीने प्रपोज केलं. हा चाहता टीम इंडियाच्या विमानतळावरील एन्ट्रीचा व्हिडिओ सेल्फी कॅमेराने रेकॉर्ड करत होता.

त्यावेळी रोहित मागून आला आणि त्या चाहत्याला गुलाब देऊन म्हणाला, "हे घे तुझ्यासाठी. चाहता रोहितला थँक्यू म्हणेल इतक्यात रोहित गंमतीने त्याला म्हणाला - लिव यू मॅरी मी? यावर तो चाहता हसायला लागतो आणि रेकॉर्डिंग थांबवतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सामन्यात काय घडलं?

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कांगारू संघाने भारतीय डाव २६ षटकांत ११७ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात त्यांनी ११ षटकांत १२१ धावा करत सामना आपल्या नावावर केला. ५०-५० षटकांचा हा सामना एकूण ३७ षटकांत संपला.

हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत पुनरागमन केले. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून २२ मार्च रोजी चेन्नई येथे होणारा तिसरा सामना एकप्रकारे फायनल असेल.

पुढील बातम्या