मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Virat Kohli Wicket : अम्पायर कोहलीला सपोर्ट करत नाहीत! वादग्रस्त निर्णायनंतर चाहते संतापले

Virat Kohli Wicket : अम्पायर कोहलीला सपोर्ट करत नाहीत! वादग्रस्त निर्णायनंतर चाहते संतापले

Feb 18, 2023, 03:26 PM IST

  • virat kohli wicket controversy : दिल्ली कसोटीत विराट कोहली ४४ धावा करून मॅथ्यू कुहनेमनचा बळी ठरला. त्याला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले. मात्र, रिप्ले (Virat Kohli LBW DRS) पाहिल्यानंतर हा निर्णय वादग्रस्त ठरणार असल्याचे दिसत आहे. आता या विकेटबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

virat kohli wicket controversy

virat kohli wicket controversy : दिल्ली कसोटीत विराट कोहली ४४ धावा करून मॅथ्यू कुहनेमनचा बळी ठरला. त्याला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले. मात्र, रिप्ले (Virat Kohli LBW DRS) पाहिल्यानंतर हा निर्णय वादग्रस्त ठरणार असल्याचे दिसत आहे. आता या विकेटबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

  • virat kohli wicket controversy : दिल्ली कसोटीत विराट कोहली ४४ धावा करून मॅथ्यू कुहनेमनचा बळी ठरला. त्याला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले. मात्र, रिप्ले (Virat Kohli LBW DRS) पाहिल्यानंतर हा निर्णय वादग्रस्त ठरणार असल्याचे दिसत आहे. आता या विकेटबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

India vs Australia (IND vs AUS) 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दिल्लीत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली बाद झाला आहे. पण त्याला बाद दिलेला निर्णय वादात सापडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

विराट कोहलीला दिल्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले आहेत आणि ही निराशा सोशल मीडियावर पसरली आहे. चाहते आपला राग पंचांवर काढत आहेत. पंच कधीच विराटला सपोर्ट करत नाहीत, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.

दिल्ली कसोटीत विराट कोहली चांगल्या लयीत दिसला. बऱ्याच दिवसांनंतर तो कसोटी क्रिकेटमध्ये बराच काळ खेळपट्टीवर स्थिरावलेला दिसला. तो ८३ चेंडूत ४४ धावा करून खेळत होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमनच्या एका चेंडूने वराटला चकवले. चेंडू विराटच्या पॅडला लागला. त्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले, यावर पंचांनी बाद दिले. मात्र, विराटने लगेचच डीआरएस घेतला. चेंडूने प्रथम बॅटची कड घेतली याची त्याला खात्री होती.

रिप्लेमध्ये असे दिसून आले की जेव्हा चेंडू बॅटजवळून गेला तेव्हा अल्ट्रा एजमध्ये स्पाइक दिसत होता, परंतु त्याच वेळी चेंडू पॅडवरही आदळत होता. बॅट आणि पॅडला चेंडू लागण्याच्या वेळेत काहीच फरक दिसत नव्हता. अशा स्थितीत टीव्ही अंपायरने या निर्णयाला अंपायरचा कॉल म्हटले, त्यामुळे विराटला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. विराट अशाप्रकारे बाद झाल्यानंतर आता चाहते पंचांवर राग काढत आहेत.

प्रतिक्रिया पहा...

चहापानापर्यंत भारत १७९/७

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात चहापानापर्यंत भारताची धावसंख्या १७९/७ आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा ८४ धावांनी मागे आहे. मात्र, अश्विन आणि अक्षर यांनी आठव्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली आहे.

पुढील बातम्या