मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Suryakumar Yadav: सुर्याला आता खेळवणार नाही... कॅप्टन रोहित शर्माचं वक्तव्य चर्चेत

Suryakumar Yadav: सुर्याला आता खेळवणार नाही... कॅप्टन रोहित शर्माचं वक्तव्य चर्चेत

Oct 03, 2022, 12:36 PM IST

    • Rohit Sharma on Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने एक मोठा विक्रम केला आहे. वास्तविक, तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात कमी चेंडूत १ हजार धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
Rohit Sharma - Suryakumar Yadav

Rohit Sharma on Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने एक मोठा विक्रम केला आहे. वास्तविक, तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात कमी चेंडूत १ हजार धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

    • Rohit Sharma on Suryakumar Yadav: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादवने एक मोठा विक्रम केला आहे. वास्तविक, तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात कमी चेंडूत १ हजार धावा करणारा खेळाडू ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली. सध्या तो या वर्षातील टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या सोबतच सुर्या आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद १ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाजही बनला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सुर्या सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. याबद्दलच हर्षा भोगले यांनी प्रेझेंटेशनमध्ये कर्णधार रोहित शर्माला प्रश्न विचारला. यावर भारतीय कर्णधाराने थोडेसे धक्कादायक उत्तर दिले. या उत्तराची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे.

हर्षा भोगले यांनी रोहित शर्माला विचारले की, “सूर्यकुमार यादव ज्या प्रकारे धावा करत आहे, तु त्याचा फॉर्म कसा राखून ठेवशील? यावर रोहित शर्मा म्हणाला, 'मी विचार करत आहे की त्याला आता खेळवू नये. थेट २३ तारखेलाच (पाकिस्तानविरुद्ध) मैदानात उतरवले पाहिजे".

सोबतच रोहित म्हणाला, "खरे सांगायचे तर तो ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे ते आश्चर्यकारक आहे. त्याला नेहमी खेळायचे असते. त्याला नेहमी काहीतरी चांगलं करायचं असतं. हेच त्यांला आनंदी ठेवते आणि त्याने कायम असेच आनंदी राहावे अशी आमची इच्छा आहे”.

सुर्याचा १७७+ चा जबरदस्त स्ट्राइक रेट

सूर्यकुमार यादवने गेल्या वर्षी मार्चमध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ३३ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३९.८८ च्या सरासरीने १०३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट चांगला राहिला. तो T20I मध्ये १७७.२६ च्या स्ट्राइक रेटने धावा करत आहे. या छोट्याशा कारकिर्दीत त्याने १ शतक आणि ९ अर्धशतकेही झळकावली आहेत.

पुढील बातम्या