मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Video: टॉयलेटमधून येताच युवराजने हरभजनला लावला रंग; भज्जी म्हणतोय, 'हात धुतले का?' व्हिडिओ व्हायरल!

Video: टॉयलेटमधून येताच युवराजने हरभजनला लावला रंग; भज्जी म्हणतोय, 'हात धुतले का?' व्हिडिओ व्हायरल!

Mar 08, 2023, 03:07 PM IST

  • Viral Video: युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Yuvraj Singh And Harbhajan Singh

Viral Video: युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

  • Viral Video: युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Yuvraj Singh And Harbhajan Singh: भारतासह जगभरात होळाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. अनेकजण आपपल्या अंदाजात होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंहनेही हटके अंदाजात त्याच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहसोबतचा फनी व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, जो सोशल मीडिायावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

युवराज सिंहने शेअर केलेल्या व्हिडिओत युवराज सिंह टॉयलेटमधून निघून हरभजन सिंहच्या जवळ येतो. त्यानंतर तो हरभजन सिंहला मिठी मारतो आणि जवळ असलेले रंग त्यांच्या चेहऱ्याला लावतो. मात्र, त्यानंतर हरभजर सिंह अॅक्टिंग करत त्याला विचारतो की, तू तर टॉयलेटमध्ये गेला होतास ना, हात धुतलेस की नाही? या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "बुरा ना मानो होली है, आमच्याकडून सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा!" असे लिहिण्यात आले आहे.

युवराज सिंह आणि हरभजन सिंह यांचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण त्यांच्या नात्याबद्दलही बोलत आहेत. एका युजर्स या दोघांच्या अभिनयाचे कौतूक करत म्हणातोय की, दोन्ही दोघेही उत्कृष्ट अभिनय करतात, तुम्हाला होळीच्या सुरक्षित आणि आनंदीत शुभेच्छा. तर, दुसऱ्या युजर्सने म्हटले आहे की, युवी पाजी आणि भज्जी पाजींना होळीच्या शुभेच्छा. तुमची खूप आठवण येत आहे.

विभाग

पुढील बातम्या