मराठी बातम्या  /  क्रीडा  /  India vs Spain Hockey WC: स्पेनला धुळ चारण्यास टीम इंडिया सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असतील नजरा

India vs Spain Hockey WC: स्पेनला धुळ चारण्यास टीम इंडिया सज्ज, ‘या’ खेळाडूंवर असतील नजरा

Jan 13, 2023, 11:06 AM IST

    • Hockey World Cup 2023 todays match: हॉकी विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना शुक्रवारी (१३ जानेवारी) स्पेनशी होणार आहे. मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि मनदीप सिंग यांच्यावर भारतीय संघाची मदार असेल.
India vs Spain Hockey World Cup

Hockey World Cup 2023 todays match: हॉकी विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना शुक्रवारी (१३ जानेवारी) स्पेनशी होणार आहे. मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि मनदीप सिंग यांच्यावर भारतीय संघाची मदार असेल.

    • Hockey World Cup 2023 todays match: हॉकी विश्वचषकात टीम इंडियाचा पहिला सामना शुक्रवारी (१३ जानेवारी) स्पेनशी होणार आहे. मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि मनदीप सिंग यांच्यावर भारतीय संघाची मदार असेल.

hockey world cup 2023 schedule: हॉकी विश्वचषक २०२३ च्या सामन्यांना आजपासून (१३ जानेवारी) सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. भारताचा सामना सामना स्पेनशी होईल. भारतीय संघ यावेळी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारत आणि स्पेन यांच्यातील सामना राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

भारताने ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्णपदके जिंकली आहेत. तर एकच हॉकी वर्ल्डकप जिंकण्यात भारताला यश आले आहे. भारताने १९७५ साली अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली एकमेव विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर टीम इंडिया सेमी फायनलही गाठू शकलेला नाही. तर १९७१ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात भारताने कांस्य आणि १९७३ मध्ये रौप्यपदक जिंकले होते.

त्यानंतर १९७८  ते २०१४ पर्यंत भारताला ग्रुप स्टेजच्या पुढे जाता आले नाही. गेल्या वेळी म्हणजेच २०१८च्या वर्ल्डकपमध्ये भारत क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला होता. हा हॉकी वर्ल्डकप भारताता होत असल्याने भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. जागतिक क्रमवारीत भारत सहाव्या क्रमांकावर आहे.

या खेळाडूंवर असतील नजरा

भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या रूपाने जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर संघात आहे. त्याच्याशिवाय अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग आणि मनदीप सिंग यांच्यावर भारतीय संघाची मदार असेल. डिफेंडर अमित रोहिदासही खूप अनुभवी असून तो पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्टही आहे. तसेच, सर्वांच्या नजरा फॉरवर्ड आकाशदीप सिंग याच्यावरही असतील.

या विश्वचषकात, प्रत्येक गटातील अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये क्रॉसओव्हर सामने होतील. क्रॉसओव्हरद्वारे अंतिम आठमध्ये पोहोचल्यावर त्यांना गतविजेत्या बेल्जियमसारख्या कठीण संघांचा सामना करावा लागेल. 

भारताविरुद्ध स्पेनचं पारडं जड

दरम्यान, जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेला स्पेन भारतासाठी कधीच सोपा प्रतिस्पर्धी ठरला नाही. भारताने १९४८ पासून स्पेनविरुद्ध ३० सामने खेळले आहेत. यापैकी १३ सामने भारताने जिंकले आहेत, तर स्पेनने ११ सामने जिंकले आहेत. तर ६ सामने अनिर्णित राहिले.

आजचे (१३ जानेवारी) सामने-

अर्जेंटिना विरुद्ध दक्षिण आफ्रिका (दुपारी १:३० वा.) 

ऑस्ट्रेलिया विरुद्ध फ्रान्स (दुपारी ३ वाजता) 

इंग्लंड विरुद्ध वेल्स (सायंकाळी ५ वाजता) 

भारत विरुद्ध स्पेन ( सायंकाळी ७ वाजता)

भारतीय संघ-

गोलरक्षक: क्रिशन बी पाठक आणि पीआर श्रीजेश

डिफेंडर्स: हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जर्मनप्रीत सिंग आणि नीलम संजीव

मिडफिल्डर: विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, नीलकांत शर्मा, शमशेर सिंग आणि आकाशदीप सिंग

फॉरवर्ड्स: मनदीप सिंग, ललित उपाध्याय, अभिषेक आणि सुखजित सिंग

पर्यायी खेळाडू: राजकुमार पाल आणि जुगराज सिंग.

 

पुढील बातम्या