मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind vs Ban ODI : बांगलादेश क्रिकेटचा रडीचा डाव! अत्यंत खराब अंपायरिंग, पत्रकार परिषदेत हरमनप्रीतनं सुनावलं

Ind vs Ban ODI : बांगलादेश क्रिकेटचा रडीचा डाव! अत्यंत खराब अंपायरिंग, पत्रकार परिषदेत हरमनप्रीतनं सुनावलं

Jul 22, 2023, 07:21 PM IST

    • Harmanpreet Kaur IND W vs BAN W : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बांगलादेशी अंपायर्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मालिकेतील अनेक निर्णय वादग्रस्त असल्याचे तिचे म्हणणे आहे.
Harmanpreet Kaur

Harmanpreet Kaur IND W vs BAN W : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बांगलादेशी अंपायर्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मालिकेतील अनेक निर्णय वादग्रस्त असल्याचे तिचे म्हणणे आहे.

    • Harmanpreet Kaur IND W vs BAN W : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बांगलादेशी अंपायर्सवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. मालिकेतील अनेक निर्णय वादग्रस्त असल्याचे तिचे म्हणणे आहे.

Harmanpreet Kaur IND W vs BAN W 3rd ODI : भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेटमध्ये ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. मालिकेतील शेवटचा सामना (२२ जुलै) बरोबरीत सुटला. शेवटच्या सामन्यानंतर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रतिक्रिया दिली. खराब अंपायरिंगवर तिने नाराजी व्यक्त केली आहे. काही निर्णयांवर ती खूश नसल्याचे हरमनप्रीतने सांगितले.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सोबतचअंपायरिंग अत्यंत वाईट झाल्याचे, हरमनप्रीतने म्हटले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना ढाका येथे खेळला गेला.

हरमनप्रीत कौर काय म्हणाली?

या सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, "मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथे अंपायरिंगचा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अंपायरिंगसाठी आधीच तयार असू. मी याआधीही सांगितले होते की येथे अत्यंत खराब अंपायरिंग आहे. काही निर्णयांवर मी नाखूश आहे'.

हरमनप्रीत बांगलादेश क्रिकेटवरही नाराज दिसत होती. ती सामना संपल्यानंतर म्हणाली की, "आमच्या देशाचे हाय कमीशनदेखील येथे आहे, मला वाटले की तुम्ही त्यांना आमंत्रित कराल." पण हरकत नाही." हरमनप्रीतने बीसीसीआय टीमचे आभार मानले.

सामन्यात काय घडलं?

विशेष म्हणजे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२५ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ ४९.३ षटकात २२५ धावांवर गारद झाला. हरलीन देओलने टीम इंडियासाठी शानदार फलंदाजी केली. तिने १०८ चेंडूंचा सामना करत ७७ धावा केल्या. हरलीनच्या खेळीत ९ चौकारांचा समावेश होता. जेमिमा रॉड्रिग्जने ३३ धावांची नाबाद खेळी खेळली. हरमनप्रीतने १४ धावांचे योगदान दिले.

शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी अवघ्या ३ धावा हव्या होत्या. मैदानात जेमिमा आणि मेघना सिंग होत्या. पहिल्या दोन चेंडूवर दोघींनी एक-एक सिंगल घेतला. पण तिसऱ्या चेंडूवर मेघना सिंग झेलबाद झाली आणि भारताने हातातला सामना गमावला. टीम इंडिया ३ चेंडूआधीच सर्वबाद झाली.

पुढील बातम्या