मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Harmanpreet Kaur : हरमनप्रीतने बांगलादेशी कर्णधार आणि खेळाडूंचा अपमान केला, व्हिडीओ आला समोर

Harmanpreet Kaur : हरमनप्रीतने बांगलादेशी कर्णधार आणि खेळाडूंचा अपमान केला, व्हिडीओ आला समोर

Jul 24, 2023, 07:20 PM IST

    • Harmanpreet Kaur vs bangladesh : बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी हरमनप्रीत कौरवर त्यांच्या खेळाडूंचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरचे गैरवर्तन पाहून बांगलादेशी खेळाडू फोटोशूटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.
Harmanpreet Kaur

Harmanpreet Kaur vs bangladesh : बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी हरमनप्रीत कौरवर त्यांच्या खेळाडूंचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरचे गैरवर्तन पाहून बांगलादेशी खेळाडू फोटोशूटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

    • Harmanpreet Kaur vs bangladesh : बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी हरमनप्रीत कौरवर त्यांच्या खेळाडूंचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरचे गैरवर्तन पाहून बांगलादेशी खेळाडू फोटोशूटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

Harmanpreet Kaur IND W vs BAN W : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. या मालिकेतील तिसर्‍या सामन्यात हरमनप्रीत कौरला पायचीत बाद देण्यात आले. या निर्णयवार हरमनप्रीत चांगलीच संतापली होती. तिने आपली बॅट संतापाच्या भरात स्टंपवर मारली. त्यानंतर पॅव्हेलियनकडे जात असतानाही ती पंचांना काहीतरी बोलताना दिसली.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

तसेच, प्रेझेंटेशन सेरेमनीमध्येही तिने बांगलादेशी महिला संघाची कर्णधार निगार सुलतानाला टोमणा मारला. निगार सुलताना हरमनप्रीतला फोटो सेशनसाठी बोलवत होती, पण हरमनप्रीतने 'अंपायरला बोलव, असा टोमणा मारला.

हरमनप्रीत कौरची बांगलादेशी खेळाडूंसोबत वाईट वागणूक

यानंतर बांगलादेशी प्रसारमाध्यमांनी हरमनप्रीत कौरवर त्यांच्या खेळाडूंचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरमनप्रीत कौरचे गैरवर्तन पाहून बांगलादेशी खेळाडू फोटोशूटमधून बाहेर पडताना दिसत आहेत.

सामना संपल्यानंतरही हरमनप्रीत कौरचा राग शांत झाला नाही आणि प्रझेंटेशनदम्यान तिने बांगलादेश क्रिकेटवर टीका केली. सामन्यानंतर हरमनप्रीत म्हणाली, "मला वाटते की या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. क्रिकेटशिवाय इथे अंपायरिंगचा प्रकार पाहून मी थक्क झाले. जेव्हा आम्ही पुढच्या वेळी येऊ तेव्हा आम्ही अशा प्रकारच्या अंपायरिंगसाठी आधीच तयार असू. मी याआधीही सांगितले होते की येथे अत्यंत खराब अंपायरिंग आहे. काही निर्णयांवर मी नाखूश आहे'.

यासोबतच जेव्हा दोन्ही कर्णधारांना ट्रॉफी शेअरिंगसाठी आणि फोटो सेशेसनसाठी बोलावण्यात आले तेव्हा कर्णधार हरमनप्रीत कौरने बांगलादेशची कर्णधार निगार सुलतानला उलट उत्तर दिले.

पुढील बातम्या