मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरवर आयसीसीची मोठी कारवाई, दंडासह झाली ही कठोर शिक्षा

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरवर आयसीसीची मोठी कारवाई, दंडासह झाली ही कठोर शिक्षा

Jul 23, 2023, 07:33 PM IST

    • Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरला ५० टक्के सामन्यांमध्ये अनुचित वर्तनासाठी आणि २५ टक्के सामन्यांनंतरच्या वक्तव्यासाठी शिक्षा झाली आहे. याशिवाय हरमनप्रीत कौरला डिमेरिट गुणांचीही शिक्षा झाली आहे.
Harmanpreet Kaur

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरला ५० टक्के सामन्यांमध्ये अनुचित वर्तनासाठी आणि २५ टक्के सामन्यांनंतरच्या वक्तव्यासाठी शिक्षा झाली आहे. याशिवाय हरमनप्रीत कौरला डिमेरिट गुणांचीही शिक्षा झाली आहे.

    • Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरला ५० टक्के सामन्यांमध्ये अनुचित वर्तनासाठी आणि २५ टक्के सामन्यांनंतरच्या वक्तव्यासाठी शिक्षा झाली आहे. याशिवाय हरमनप्रीत कौरला डिमेरिट गुणांचीही शिक्षा झाली आहे.

icc takes Big Action On Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पंचांसोबत झालेल्या वादामुळे दंड ठोठावण्यात आला आहे. हरमनप्रीत कौरने रागाने तिची बॅट स्टंपवर आपटली होती. मैदानावरील अयोग्य वर्तनामुळे हरमनप्रीत कौरला आता तिच्या मॅच फीच्या ७५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, हरमनप्रीत कौरला ५० टक्के सामन्यांमध्ये अनुचित वर्तनासाठी आणि २५ टक्के सामन्यांनंतरच्या वक्तव्यासाठी शिक्षा झाली आहे. याशिवाय हरमनप्रीत कौरला डिमेरिट गुणांचीही शिक्षा झाली आहे.

हरमनप्रीत कौरने बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या वनडेदरम्यान खराब अंपायरिंगवर नाराजी दर्शवली होती. हरमनप्रीत कौरला ज्या प्रकारे एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले, त्यावर ती पूर्णपणे नाराज होती. पॅव्हेलियनमध्ये परत जाताना तिने अंपायरशीही वाद घातला.

दरम्यान, दोन्ही संघांमधील हा निर्णयाक सामना बरोबरीत सुटला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २२५ धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात टीम इंडिया देखील२२५ धावांवर गारद झाली. अशा स्थितीत तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. 

सामना संपल्यानंतरही हरमनप्रीत कौरचा राग शांत झाला नाही आणि प्रझेंटेशनदम्यान तिने बांगलादेश क्रिकेटवर टीका केली. याचा फटका हरमनप्रीत कौरला बसला. मॅच फी व्यतिरिक्त तिला ३ डिमेरिट पॉइंट देण्यात आले आहेत.

डिमेरिट पॉइंट्स हे मैदानावर अयोग्य वर्तनासाठी शिक्षा म्हणून दिले जातात. या अंतर्गत जर एखाद्या खेळाडूला २४ महिन्यांत ४ डिमेरिट पॉइंट मिळाले तर त्याच्यावर एक कसोटी आणि दोन मर्यादित षटकांच्या सामने खेळण्यावर बंदी घातली जाऊ शकते.

पुढील बातम्या