मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Harmanpreet Kaur : एवढा राग बरा नव्हे! आऊट दिल्यानंतर हरमनप्रीत कौर भडकली, नेमकं काय घडलं? पाहा

Harmanpreet Kaur : एवढा राग बरा नव्हे! आऊट दिल्यानंतर हरमनप्रीत कौर भडकली, नेमकं काय घडलं? पाहा

Jul 22, 2023, 07:01 PM IST

    • Harmanpreet Kaur angry : बांगलादेशच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची फलंदाजी चांगलीच निराशाजनक राहिली. कर्णधार हरमनप्रीत कौर १४ धावा करून बाद झाली. मात्र, पंचांनी तिला ज्या पद्धतीने आऊट दिले ते वादग्रस्त ठरले.
Harmanpreet Kaur

Harmanpreet Kaur angry : बांगलादेशच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची फलंदाजी चांगलीच निराशाजनक राहिली. कर्णधार हरमनप्रीत कौर १४ धावा करून बाद झाली. मात्र, पंचांनी तिला ज्या पद्धतीने आऊट दिले ते वादग्रस्त ठरले.

    • Harmanpreet Kaur angry : बांगलादेशच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची फलंदाजी चांगलीच निराशाजनक राहिली. कर्णधार हरमनप्रीत कौर १४ धावा करून बाद झाली. मात्र, पंचांनी तिला ज्या पद्धतीने आऊट दिले ते वादग्रस्त ठरले.

ind vs ban womens match highlights : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना टाय झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने २२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया देखील २२५ धावा करून सर्वबाद झाली. अशा स्थितीत सामना बरोबरीत सुटला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची फलंदाजी चांगलीच निराशाजनक राहिली. कर्णधार हरमनप्रीत कौर १४ धावा करून बाद झाली. मात्र, पंचांनी तिला ज्या पद्धतीने आऊट दिले ते वादग्रस्त ठरले.

नेमकं काय घडलं?

खरं तर, भारतीय डावाच्या ३४व्या षटकात हरमनप्रीत कौरने नाहिदा अख्तरविरुद्ध स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण ती बीट झाली. नाहिदाचा चेंडू मधल्या आणि लेग स्टंपवर जात होता. गोलंदाजाने एलबीडब्ल्यूसाठी अपील केले आणि पंच तनवीर हसन यांनी हरमनप्रीत कौरला बाद घोषित केले. या दरम्यान, चेंडूदेखील हवेत गेला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने झेल घेतला.

एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर हरमनप्रीत चांगलीच चिडली. रागाच्या भरात तिने आपली बॅट स्टंपवर मारली. इतकंच नाही तर हरमनप्रीत कौर पॅव्हेलियनमध्ये परतताना अंपायरला रागाने काहीतरी बोलताना दिसली.

त्याचवेळी या घटनेनंतर चाहत्यांना बांगलादेशचा पुरुष क्रिकेटपटू शकीब अल हसनची आठवण झाली. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये शाकिब अल हसनने अंपायरच्या निर्णयावर नाखूष होऊन स्टंपला लाथ मारली होती.

शेवटच्या षटकात ३ धावा करता आल्या नाहीत

दरम्यान, शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी अवघ्या ३ धावा हव्या होत्या. मैदानात जेमिमा आणि मेघना सिंग होत्या. पहिल्या दोन चेंडूवर दोघींनी एक-एक सिंगल घेतला. पण तिसऱ्या चेंडूवर मेघना सिंग झेलबाद झाली आणि भारताने हातातला सामना गमावला. टीम इंडिया ३ चेंडूआधीच सर्वबाद झाली.

भारताकडून हरलीन देओलने ७७ धावांची शानदार खेळी केली. तर स्नेह राणाने २ बळी घेतले. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता.

पुढील बातम्या