मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hardik Pandya: हार्दिक पांड्या अमित शहा यांच्या भेटीला, ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Hardik Pandya: हार्दिक पांड्या अमित शहा यांच्या भेटीला, ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Dec 31, 2022, 02:43 PM IST

    • Hardik Pandya Meets Amit Shah: हार्दिक पांड्याने शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. हार्दिकसोबत त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याही अमित शहांना भेटायला आला होता. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच नेटकरी या फोटांवरून विविध अंदाज बांधत आहेत.
Hardik Pandya

Hardik Pandya Meets Amit Shah: हार्दिक पांड्याने शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. हार्दिकसोबत त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याही अमित शहांना भेटायला आला होता. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच नेटकरी या फोटांवरून विविध अंदाज बांधत आहेत.

    • Hardik Pandya Meets Amit Shah: हार्दिक पांड्याने शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. हार्दिकसोबत त्याचा मोठा भाऊ कृणाल पंड्याही अमित शहांना भेटायला आला होता. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच नेटकरी या फोटांवरून विविध अंदाज बांधत आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बीसीसीआयने अलीकडेच पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवले आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ T20 सामन्यांची आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका ३ जानेवारी २०२३ पासून सुरू होणार आहे. याआधी हार्दिकने गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

हार्दिक पांड्याने शनिवारी (३१ डिसेंबर) त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर दोन फोटो शेअर केले आहे. या फोटोत तो मोठा भाऊ कृणाल पंड्यासोबत अमित शहा यांची भेट घेताना दिसत आहे. पांड्याने कॅप्शन लिहिले की, 'आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आणि आमच्यासाठी मौल्यवान वेळ काढल्याबद्दल मी गृहमंत्री अमित शाहजींचा आभारी आहे. तुम्हाला भेटणे हे एक सौभाग्य आहे".

२०२२ हे वर्ष हार्दिकसाठी गोल्डन इयर

२९ वर्षीय हार्दिक पांड्यासाठी हे वर्ष खूप चांगले गेले आहे. IPL २०२२ मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवे संघ या स्पर्धेत सामील झाले. यातील गुजरात टायटन्सची कमान हार्दिक पांड्याकडे होती. हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली पदार्पणातच गुजरात टायटन्सला आयपीएल २०२२ चे विजेतेपद मिळवून दिले.

यानंतर जूनमध्ये भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर पहिल्यांदा हार्दिककडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. या मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला. तर टी-२० वर्ल्डकपनंतर भारत न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील टी-२० मालिकेचा कर्णधार हार्दिक पांड्या होता. या मालिकेतही भारताने विजय मिळवला.

यानंतर आता श्रीलंकेविरुद्धच्या टी- २० मालिकेसाठीही हार्दिक पांड्या कर्णधार असेल. एवढेच नाही तर हार्दिक भारतीय टी-२० संघाचा कायमस्वरूपी कर्णधार बनू शकतो, असेही बोलले जात आहे. श्रीलंकेविरुद्धची मालिका ३ जानेवारीपासून सुरु होणार आहे.

पुढील बातम्या