मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Hardik Pandya: उपकर्णधार हार्दिकची वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ, स्टम्प माईकवाला व्हिडीओ व्हायरल

Hardik Pandya: उपकर्णधार हार्दिकची वॉशिंग्टन सुंदरला शिवीगाळ, स्टम्प माईकवाला व्हिडीओ व्हायरल

Jan 12, 2023, 05:12 PM IST

    • hardik pandya abusing Washington Sundar: टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने पाणी घेऊन मैदानावर आलेल्या सहकारी खेळाडूला शिविगाळ केली आहे. त्याने वॉशिंग्टन सुंदरले शिवी दिली, हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Hardik Pandya Abusing

hardik pandya abusing Washington Sundar: टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने पाणी घेऊन मैदानावर आलेल्या सहकारी खेळाडूला शिविगाळ केली आहे. त्याने वॉशिंग्टन सुंदरले शिवी दिली, हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    • hardik pandya abusing Washington Sundar: टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने पाणी घेऊन मैदानावर आलेल्या सहकारी खेळाडूला शिविगाळ केली आहे. त्याने वॉशिंग्टन सुंदरले शिवी दिली, हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

श्रीलंकेचा संघ २१५ धावांवर ऑलआऊट झाला आहे. श्रीलंकेचा संघ केवळ ३९.४ षटकेच खेळू शकला. भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केला. या दोघांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांचे काहीच चालले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, तत्पूर्वी या सामन्यात हार्दिक पांड्याने आपला संयम गमावला आणि त्याने आपल्याच संघातील खेळाडूला शिवीगाळ केली. श्रीलंकेच्या डावाच्या ११व्या षटकाच्या अखेरीस हार्दिकने पाणी घेऊन मैदानावर आलेल्या १२व्या खेळाडूला शिवीगाळ केली. हार्दिक घाणेरडी शिवी देत असल्याचा आवाज स्टम्पमाईकमध्ये रेकॉर्ड झाला आहे. त्यानंतर या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हार्दिकने चहलला शिवी दिली

व्हायरल झालेला व्हिडिओतील आवाज हार्दिक पांड्याचा आहे जो युजवेंद्र चहलला शिवीगाळ करत आहे. तो चहलला म्हणाला, "लास्ट ओव्हर मे पानी मांग रहा था, उधर क्या गं* मार रहा था."

हा व्हिडिओ एका चाहत्याने पोस्ट केला असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते हार्दिक पांड्यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

श्रीलंकेच्या २१५ धावा

दरम्यान, सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांची सुरुवातही चांगली झाली. श्रीलंकेच्या टॉपऑर्डरने १६ षटकात १ बाद १०२ धावा केल्या होत्या. मात्र, वन डाऊनला आलेला कुसल मेंडीस बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. त्यानंतर त्यांचा डाव सावरू शकला नाही.

श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या नुवानिंदू फर्नांडोने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याच्याशिवाय कुशल मेंडिसने ३४ आणि दुनिथ वेलाल्गेने ३२ धावांचे योगदान दिले.

तर भारताकडून कुलदीप आणि सिराजने प्रत्येकी ३ विकेट घेतले तर उमरान मलिकने दोन बळी घेतले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाला. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास त्यांची मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी होईल.

 

पुढील बातम्या