मराठी बातम्या  /  क्रीडा  /  बर्थडे स्पेशल:आर्चरचा चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर आदळला, अन् लॅबुशेनला संधी मिळाली

बर्थडे स्पेशल:आर्चरचा चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर आदळला, अन् लॅबुशेनला संधी मिळाली

Jun 22, 2022, 04:44 PM IST

    • जोफ्रा आर्रचरचा (jofra archer) चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर एवढ्या जोरात आदळला की, तो त्या सामन्यात फलंदाजी करु शकला नाही. त्यानंतर स्मिथचा (steve smith) बदली फलंदाज म्हणून मार्नस लॅबुशेनला (Marnus Labuschagne) फलंदाजीस पाठवण्यात आले. हा लॅबुशेनच्या करिरमधला टर्निंग पॉइंट ठरला.
marnus labuschagne

जोफ्रा आर्रचरचा (jofra archer) चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर एवढ्या जोरात आदळला की, तो त्या सामन्यात फलंदाजी करु शकला नाही. त्यानंतर स्मिथचा (steve smith) बदली फलंदाज म्हणून मार्नस लॅबुशेनला (Marnus Labuschagne) फलंदाजीस पाठवण्यात आले. हा लॅबुशेनच्या करिरमधला टर्निंग पॉइंट ठरला.

    • जोफ्रा आर्रचरचा (jofra archer) चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर एवढ्या जोरात आदळला की, तो त्या सामन्यात फलंदाजी करु शकला नाही. त्यानंतर स्मिथचा (steve smith) बदली फलंदाज म्हणून मार्नस लॅबुशेनला (Marnus Labuschagne) फलंदाजीस पाठवण्यात आले. हा लॅबुशेनच्या करिरमधला टर्निंग पॉइंट ठरला.

आजपासून ३-४ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये फक्त विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि जो रूट यांच्या टॅलेंटची आणि कामगिरीची चर्चा व्हायची. पण या दिग्गजांना टक्कर देण्यासाठी एक फलंदाज पुढे आला. त्या गुणी फलंदाजाचं नाव आहे मार्नस लॅबुशेन. (Marnus Labuschagne)

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

गेल्या ३ वर्षातील दमदार कामगिरीच्या जोरावर लॅबुशेनने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ११० व्या स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आज २८ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या लबुशेनचा क्रिकेटमधला आतापर्यंतचा प्रवास हा नक्कीच सोपा नव्हता.

मार्नस लॅबुशेन हा २२ जून १९९४ रोजी दक्षिण आफ्रिकेत जन्माला आला. तर २००४ मध्ये त्याच्या कुटुंबासह तो ऑस्ट्रेलियाला आला. त्यानंतर १० वर्षांनी म्हणजेच २०१४ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात लॅबुशेनने ८३ धावांची खेळी खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

मात्र, त्याला ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळण्यासाठी आणखी ४ वर्षे वाट पाहावी लागली. लबुशेनने ऑक्टोबर २०१८ मध्ये दुबई येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले. पहिल्या डावात तो दुसऱ्या चेंडूवर खाते न उघडताच बाद झाला, तर दुसऱ्या डावात तो १३ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्याने त्या सामन्यात एक विकेट घेतली होती. सोबतच बाबर आझमला धावबादही केले होते. त्याने दुसऱ्या कसोटीत २५ आणि ४३ धावांची समाधानकारक खेळी करून स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.

२०१९ अॅशेज सीरीज ठरली टर्निंग पॉइंट-

ऑस्ट्रेलियाचे सर्वात विश्वासू फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे बॉल टेम्परिंगनंतर क्रिकेटपासून दूर होते. त्यावेळी स्मिथच्या जागी मार्नस लॅबुशेनला कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. पण त्या दोघांच्या पुनरागमनानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते.

दरम्यान, दुसऱ्या अॅशेज कसोटीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर जखमी झाला होता. जोफ्रा आर्रचरचा चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर एवढ्या जोरात आदळला होता की, तो त्या सामन्यात फलंदाजी करु शकला नाही. त्यानंतर स्मिथचा बदली फलंदाज म्हणून मार्नस लॅबुशेनला फलंदाजीस पाठवण्यात आले. हा लॅबुशेनच्या करिरमधला टर्निंग पॉइंट ठरला. त्या सामन्यात लॅबुशेनने अतिशय निर्णयक वेळी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतक ठोकले. तो दिवसभर लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर टिकून राहिला. यामुळे ऑस्ट्रेलियाला तो सामना ऐतिहासिक रीतीने ड्रॉ करता आला. त्या सामन्यात त्याने ५९ धावा केल्या होत्या.

कसोटी करिअर-

लाबुशेनने आतापर्यंत २६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये ५४.३२ च्या सरासरीने २ हजार ३९० धावा केल्या आहेत. यात ६ शतके एक द्विशतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे.

पुढील बातम्या