मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Umran Malik: ‘ही’ चूक कधीच करू नकोस, मॅकग्राचा उमरानला लाखमोलाचा सल्ला

Umran Malik: ‘ही’ चूक कधीच करू नकोस, मॅकग्राचा उमरानला लाखमोलाचा सल्ला

Aug 16, 2022, 04:16 PM IST

    • Glenn Mcgrath Advises Umran Malik: उमरान मलिकने आपल्या लाईन आणि लेन्थवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाशी तडजोड करू नये, असे ग्लेन मॅकग्राने म्हटले आहे. १५० च्या वेगाने गोलंदाजी करणारे खेळाडू फार दुर्मिळ असल्याचेही मॅकग्राने म्हटले आहे.
Umran Malik

Glenn Mcgrath Advises Umran Malik: उमरान मलिकने आपल्या लाईन आणि लेन्थवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाशी तडजोड करू नये, असे ग्लेन मॅकग्राने म्हटले आहे. १५० च्या वेगाने गोलंदाजी करणारे खेळाडू फार दुर्मिळ असल्याचेही मॅकग्राने म्हटले आहे.

    • Glenn Mcgrath Advises Umran Malik: उमरान मलिकने आपल्या लाईन आणि लेन्थवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगाशी तडजोड करू नये, असे ग्लेन मॅकग्राने म्हटले आहे. १५० च्या वेगाने गोलंदाजी करणारे खेळाडू फार दुर्मिळ असल्याचेही मॅकग्राने म्हटले आहे.

जगातील महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने टीम इंडियाचा युवा गोलंदाज उमरान मलिकला लाखमोलाचा सल्ला दिला आहे. मॅकग्राने उमरानच्या गोलंदाजीने चांगलाच प्रभावित झाला आहे. त्यामुळे मॅकग्राने भविष्यातील कामगिरी अधिक चांगली व्हावी, यासाठी उमरानला काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मॅकग्राने एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलत होता. तो म्हणाला की, “जेव्हा वेगवान गोलंदाज त्यांच्या गोलंदाजीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांच्या वेगाशी तडजोड करतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. 

यासोबतच त्याने भारताच्या उमरान मलिकचे कौतुक करत तो खूप प्रतिभावान गोलंदाज असल्याचे म्हटले आहे. गोलंदाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याने वेगाशी तडजोड करू नये, असा सल्ला ग्लेन मॅकग्राने उमरानला दिला आहे. तसेच, तुम्ही कोणत्याही गोलंदाजाला १५० च्या स्पीडने गोलंदाजी करायला शिकवू शकत नाही. ही प्रतिभा नैसर्गिक असते.

सोबतच, “लाईन लेन्थवर नियंत्रण मिळवण्यासाठी गोलंदाज जेव्हा त्यांच्या वेगाशी तडजोड करतात तेव्हा मला त्यांची चीड येते. तुम्हाला जर तुमच्या गोलंदाजीवर नियंत्रण मिळवायचे असेल तर तुम्ही नेटमध्ये जास्त वेळ घालवला पाहिजे. तसेच, कठोर परिश्रम केले पाहिजेत. तुमची गती ही नैसर्गिक आहे. अशी शक्ती फार कमी गोलंदाजांकडे असते”, असेही ग्लेन मॅकग्रा म्हणाला.

मॅकग्रा हा एमआरएफ पेस फाऊंडेशनचा संचालक आहे. तो दरवर्षी तीन वेळा या फाऊंडेशनला भेट देतो. त्याच्या अकादमीत गोलंदाजांची निवड करताना तीन गोष्टी लक्षात घेतल्या जातात. गोलंदाजांची उंची, त्यांची शारीरिक ताकद आणि वेग यांच्या आधारावर युवा खेळाडूंची निवड केली जाते.

पुढील बातम्या