मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Babar Azam: पाकच्या पराभवानंतर अक्रम संतापला! बाबरवर साधला निशाणा; म्हणाला, गधे को बाप बनाना...

Babar Azam: पाकच्या पराभवानंतर अक्रम संतापला! बाबरवर साधला निशाणा; म्हणाला, गधे को बाप बनाना...

Oct 28, 2022, 05:58 PM IST

    • Wasim Akram on Shoaib Malik Babar Azam t20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला सलग दोन पराभव पत्करावे लागले. त्यामुळे पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अशात आता पाकिस्तानचे माजी खेळाडूंनी बाबर आझमवर निशाणा साधला आहे. 
Wasim Akram on Babar Azam

Wasim Akram on Shoaib Malik Babar Azam t20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला सलग दोन पराभव पत्करावे लागले. त्यामुळे पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अशात आता पाकिस्तानचे माजी खेळाडूंनी बाबर आझमवर निशाणा साधला आहे.

    • Wasim Akram on Shoaib Malik Babar Azam t20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात पाकिस्तानला सलग दोन पराभव पत्करावे लागले. त्यामुळे पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. अशात आता पाकिस्तानचे माजी खेळाडूंनी बाबर आझमवर निशाणा साधला आहे. 

T20 विश्वचषकात गुरुवारी झिम्बाब्वेने पाकिस्तानचा एका धावेने पराभव केला. हा सामना सुरुवातीपासून शेवटच्या चेंडूपर्यंत अतिशय रंजक ठरला. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी ३ धावांची गरज होती. पण शाहीन आफ्रिदी केवळ एकच धाव घेऊ शकला आणि धावबाद झाला. सामन्यातील शेवटच्या चेंडूवर थरार हा श्वास रोखणारा होता. या T20 विश्वचषकात पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव ठरला. याआधी भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला होता.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या सर्व माजी क्रिकेटपटूंनी बाबर आझम अँड कंपनीला घेरले आहे. वसीम अक्रमने लाईव्ह शोमध्ये बाबर आझमवर निशाणा साधला आहे.

ध्येय गाठण्यासाठी काहीही करायला तयार असले पाहिजे

ए स्पोर्ट्स चॅनलच्या लाइव्ह चर्चेत वसीम अक्रम अतिशय संतप्त होऊन बोलत होता. तो म्हणाला की, ' पाकिस्तान संघाकडे मजबूत प्लॅन कधीही नव्हता. वर्षभरापासून आमच्यासह पाकिस्तानातील प्रत्येकजण सांगतोय की, संघाची मिडल ऑर्डर डळमळीत आहे. आता इथे बसलेला हा मुलगा शोएब मलिक आपल्याकडे उपलब्ध आहे. कोणत्याही कर्णधाराचे अंतिम ध्येय हे संघाला चॅम्पियन बनवणे हेच असले पाहीजे.

वर्ल्डकप जिंकण्यासाठी कर्णधार म्हणून संघासाठी काहीही करायला तयार असले पाहीजे. त्यासाठी तुम्हाला गाढवाला बाप बनवावे लागले तरी चालेल. कारण आपले एक ध्येय आहे, आपल्याला विश्वचषक जिंकायचा आहे. जर तुम्हाला शोएब मलिक संघात हवा असेल तर निवडकर्त्यांशी लढावे लागेल की शोएब मलिक संघात हवा आहे, अन्यथा मी संघाचे कर्णधारपद सांभाळणार नाही".

बाबरने त्याच्या मर्जीतला संघ निवडला?

टीव्ही अँकरने वसीम अक्रमला विचारले की, 'बाबर आझला त्याला हवे असणारे खेळाडू मिळाले नव्हते का? की बाबरने फक्त त्याच्या मर्जीतलेच खेळाडू निवडले होते? तुला काय वाटते?

यावर अक्रमने उत्तर दिले, 'त्याला (बाबर) अधिक बुद्धिमान व्हावे लागेल. आता ही काही आपल्या गल्लीतली टीम नाही, जे की तुमच्या जवळचे खेळाडूच फक्त संघात असतील. किंवा हा माझा मित्र आहे म्हणून संघात हवा आहे. जर मी कर्णधार असतो तर मी शोएब मलिकला मधल्या फळीत प्रथम स्थान दिले असते. हे सामने ऑस्ट्रेलियात होत आहेत, ते शारजाह, दुबई किंवा पाकिस्तानच्या मृत खेळपट्ट्या नाहीत".

पुढील बातम्या