मराठी बातम्या  /  क्रीडा  /  French Open : इगा स्विटेकने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकले, चुरशीच्या लढतीत कॅरोलिना मुचोव्हाचा पराभव

French Open : इगा स्विटेकने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन जिंकले, चुरशीच्या लढतीत कॅरोलिना मुचोव्हाचा पराभव

Jun 11, 2023, 11:35 AM IST

    • Iga Swiatek Win French Open 2023 : इगा स्विटेकने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. २०२० आणि २०२२ मध्येही ती फ्रेंचओपन जिंकण्यात यशस्वी ठरली होती. याशिवाय गेल्या वर्षी स्विटेकने यूएस ओपन जिंकली होती.
Iga Swiatek Win French Open 2023

Iga Swiatek Win French Open 2023 : इगा स्विटेकने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. २०२० आणि २०२२ मध्येही ती फ्रेंचओपन जिंकण्यात यशस्वी ठरली होती. याशिवाय गेल्या वर्षी स्विटेकने यूएस ओपन जिंकली होती.

    • Iga Swiatek Win French Open 2023 : इगा स्विटेकने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. २०२० आणि २०२२ मध्येही ती फ्रेंचओपन जिंकण्यात यशस्वी ठरली होती. याशिवाय गेल्या वर्षी स्विटेकने यूएस ओपन जिंकली होती.

French Open match result : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली पोलंडची महिला टेनिसपटू इगा स्विटेक (Iga Swiatek) हिने फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. इगाचे हे ग्रँडस्लॅम जेतपद आहे. स्वितेकने अंतिम फेरीत चेक रिपब्लिकच्या कॅरोलिना मुचोव्हा हिचा तीन सेटच्या चुरशीच्या लढतीत पराभव केला. स्विटेकने अंतिम सामना ६-२, ५-७, ६-४ असा जिंकला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

स्वितटेकने या सामन्यात शानदार सुरुवात केली. तिने पहिला सेट ६-२ असा सहज जिंकला. तर यानंतर कॅरोलिनाने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत ती अंतिम फेरीत का पोहोचली आहे, हे दाखवून दिले. बिगरमानांकित असूनही तिने नंबर-वन खेळाडूसमोर हार मानली नाही आणि दुसरा सेट ७-५ असा जिंकला.

यानंतर सामना निर्णायक सेटपर्यंत पोहोचला. यातही कॅरोलिनाने एका क्षणी आघाडी घेतली होती, पण तिला फायनलचे दडपण पेलता आले नाही. स्विटेकने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत हा सेट ६-४ असा जिंकला.

स्विटेकचे चौथे ग्रँडस्लॅम

स्विटेकने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. २०२० आणि २०२२ मध्येही ती फ्रेंचओपन जिंकण्यात यशस्वी ठरली होती. याशिवाय गेल्या वर्षी स्विटेकने यूएस ओपन जिंकली होती. आता त्याची नजर जुलैमध्ये पहिले विम्बल्डन ओपन जिंकण्यावर असेल.

स्विटेकने बदला घेतला

स्विटेक आणि कॅरोलिना दुसऱ्यांदा आमनेसामने होत्या. तत्पूर्वी, चार वर्षांपूर्वी प्राग ओपन क्लेकोर्ट स्पर्धेत कॅरोलिनाने स्वितेकचा ४-६, ६-१, ६-४ अशा तीन सेटमध्ये पराभव केला होता. त्यावेळी स्विटेक ९५व्या तर कॅरोलिना १०६व्या क्रमांकावर होती. आता स्विटेकने त्या पराभवाचा बदला घेतला आहे.

कॅरोलिना मुचोवा बिगरमानांकित खेळाडू म्हणून खेळली

दुखापतींमुळे कॅरोलिना मुचोवाच्या कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला आहे. स्विटेक अव्वल मानांकित असताना कॅरोलिनाने बिगरमानांकित खेळाडू म्हणून या स्पर्धेत सामील झाली होती. असे असूनही चेक रिपब्लिकच्या कॅरोलिनाने स्पर्धेत शानदार कामगिरी केली. तिने उपांत्य फेरीत बेलारूसच्या आर्याना सबालेन्का हिचा पराभव केला. मात्र, कॅरोलिनाचे पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले.

विभाग

पुढील बातम्या