मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Asghar Afghan : 'विरोट, रोहितला बाद केलं की भारताची अर्धी टीम तिथंच संपते'

Asghar Afghan : 'विरोट, रोहितला बाद केलं की भारताची अर्धी टीम तिथंच संपते'

Sep 16, 2022, 07:25 PM IST

    • Asghar Afghan on Indian Cricket team : अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानने अजब तर्क लढवत भारतीय क्रिकेट संघाबाबत मुक्ताफळ उधळली आहे. असगर अफगानने दावा केला आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाद केल्यास निम्मा संघ बाद होतो. अनेक संघ हीच रणनीती ठेऊन मैदानात उतरत असल्याचेही त्यानं म्हटलं आहे.
विराट कोहली-रोहित शर्मा

Asghar Afghan on Indian Cricket team : अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानने अजब तर्क लढवत भारतीय क्रिकेट संघाबाबत मुक्ताफळ उधळली आहे. असगर अफगानने दावा केला आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाद केल्यास निम्मा संघ बाद होतो. अनेक संघ हीच रणनीती ठेऊन मैदानात उतरत असल्याचेही त्यानं म्हटलं आहे.

    • Asghar Afghan on Indian Cricket team : अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगानने अजब तर्क लढवत भारतीय क्रिकेट संघाबाबत मुक्ताफळ उधळली आहे. असगर अफगानने दावा केला आहे की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना बाद केल्यास निम्मा संघ बाद होतो. अनेक संघ हीच रणनीती ठेऊन मैदानात उतरत असल्याचेही त्यानं म्हटलं आहे.

दिल्ली: अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असगर अफगान हा लीजेंड्स लीगच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा पुनरागमन करणार आहे. गौतम गंभीर कर्णधार असलेल्या संघात असगर खेळणार आहे. लीजेंड्स लीगचे सामने सुरू होण्यापूर्वी असगरने भारतीय संघाबाबत एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. हिन्दुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत असगर म्हणाला, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना जर बाद केले तर निम्मा भारतीय संघ बाद केल्यासारखे आहे. अनेक संघ हीच रणनीती ठेऊन मैदानात उतरतात असेही तो म्हणला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

पत्रकारांनी असगरला विचारले की त्याने रोहित आणि विराट विरुद्ध अनेक सामने खेळले आहेत. टी २० इंटरनेशनल सामन्याबद्दल त्याला काय वाटतं यावर उत्तर देताना असगर म्हणाला, जेव्हा एखादा खेळाडू हा धावा काढत नाही, तेव्हा त्याच्या बद्दल अनेक तर्क वितर्क लढविले जातात. ही बाब प्रत्येक क्रिकेटरच्या जीवनाचा भाग आहे. पण आम्ही जेव्हा केव्हा भारतीय संघाविरोधात खेळलो तेव्हा आमची रणनीती ही विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अवतीभोवती असायची.

असगर पुढे म्हणाला, 'आम्ही तेव्हा म्हणायचो की रोहित आणि विराट यांना आधी बाद करा; अर्धी भारतीय टीम ही तिथेच संपून जाईन. हे दोन खेळाडू असे आहेत की स्वत:च्या तकदीवर सामना जिंकून देऊ शकतात. त्यामुळे आम्ही नेहमी सुरुवातीला या दोघांवर हल्ला करायचो आणि त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करायचो. जर सुरुवातीला हे दोघे बाद झाले नाहीत तर हे दोघेही धोकादायक ठरतात. खासकरकरून विराट कोहली जेव्हा मैदानात टिकून राहतो तेव्हा सेट झाल्यावर त्याला बाद करणे हे फार कठीण जातं.

विभाग

पुढील बातम्या