मराठी बातम्या  /  क्रीडा  /  FIFA WC: लाईव्ह सामने दाखवणारी सेवा ठप्प! 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिला जपान-क्रोएशिया सामना

FIFA WC: लाईव्ह सामने दाखवणारी सेवा ठप्प! 'इतक्या' कोटी लोकांनी पाहिला जपान-क्रोएशिया सामना

Dec 06, 2022, 12:08 PM IST

    • Japan Vs Croatia, Abema streaming site crash during match: फिफा वर्ल्डकपमधील जपान आणि क्रोएशिया यांच्यातला सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला होता. हा सामना जपानमध्ये एकाचवेळी तब्बल २.३ कोटी लोकांनी पाहिला. याचा परिणाम जपानमध्ये सामने प्रसारित करणाऱ्या साइटवर झाला. मर्यादेपेक्षा जास्त प्रेक्षक संख्या एकाचवेळी लाईव्ह पाहत असल्याचे अबेमा टीव्हीचे सर्व्हर क्रॅश झाले. 
FIFA WC

Japan Vs Croatia, Abema streaming site crash during match: फिफा वर्ल्डकपमधील जपान आणि क्रोएशिया यांच्यातला सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला होता. हा सामना जपानमध्ये एकाचवेळी तब्बल २.३ कोटी लोकांनी पाहिला. याचा परिणाम जपानमध्ये सामने प्रसारित करणाऱ्या साइटवर झाला. मर्यादेपेक्षा जास्त प्रेक्षक संख्या एकाचवेळी लाईव्ह पाहत असल्याचे अबेमा टीव्हीचे सर्व्हर क्रॅश झाले.

    • Japan Vs Croatia, Abema streaming site crash during match: फिफा वर्ल्डकपमधील जपान आणि क्रोएशिया यांच्यातला सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये पोहोचला होता. हा सामना जपानमध्ये एकाचवेळी तब्बल २.३ कोटी लोकांनी पाहिला. याचा परिणाम जपानमध्ये सामने प्रसारित करणाऱ्या साइटवर झाला. मर्यादेपेक्षा जास्त प्रेक्षक संख्या एकाचवेळी लाईव्ह पाहत असल्याचे अबेमा टीव्हीचे सर्व्हर क्रॅश झाले. 

कतारमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्डकप सध्या रोमहर्षक वळणावर पोहोचला आहे. स्पर्धेत सध्या राऊंड ऑफ १६ थरार सुरू आहे. या फेरीत सोमवारी (५ डिसेंबर) जपानचा सामना क्रोएशियाशी झाला. हा सामना अल जनुब स्टेडियमवर खेळला गेला. ९० मिनिटात एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यानंतर या सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लावावा लागला. पेनल्टी शूटआऊटमध्ये क्रोएशियाने जपानचा ३-१ असा पराभव केला. या पराभवामुळे जपानला फिफा वर्ल्डकपमधून बाहेर पडावे लागले आहे. तर क्रोएशिा क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, या सामन्याची उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती की, जपानमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवणारी सेवाच ठप्प झाली. जपान - क्रोएशिया सामना जपानमध्ये २.३ कोटी लोक एकाच वेळी लाईव्ह पाहत होते. मर्यादेपेक्षा जास्त प्रेक्षक संख्या एकाचवेळी लाईव्ह पाहत असल्याने अबेमा टीव्हीवरील लाईव्ह स्ट्रिमिंग (अॅप) क्रॅश झाली. जपानमधील स्थानिक वेळेनुसार हा सामना पहाटे ४ वाजता सुरू झाला होता.

अबेमा मीडिया कंपनीकडे जपानमध्ये फिफा वर्ल्डकपचे सामने प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. ही कंपनी देशात फ्रीमध्ये सामने प्रसारित करते. जपानने या स्पर्धेत आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. त्यांनी ग्रुप स्टेजमध्ये बलाढ्य स्पेनला हरवून अनपेक्षितरित्या राऊंड ऑफ १६ फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे जपानमध्ये या स्पर्धेबद्दल आणि आपल्या संघाबद्दल उत्सुकता वाढली होती.

पुढील बातम्या