मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Lionel Messi Bisht: कतारच्या राजानं मेस्सीला दिलेला गाऊन खासदारानं मागितला, १ मिलियन डॉलर्सची ऑफर

Lionel Messi Bisht: कतारच्या राजानं मेस्सीला दिलेला गाऊन खासदारानं मागितला, १ मिलियन डॉलर्सची ऑफर

Dec 24, 2022, 01:20 PM IST

    • Lionel Messi offered $1m for Arabic Bisht: कतारचे राजे शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी मेस्सीला ट्रॉफी प्रदान करण्यापूर्वी हा पारंपारिक बिश्त प्रदान केला. हा गाऊन बिश्त या नावाने ओळखला जातो. मेस्सीने परिधान केलेला काळा गाऊन (बिश्त) अरब देशांमध्ये खूप महत्त्वाचा आहे.
Lionel Messi Arabic Bisht

Lionel Messi offered $1m for Arabic Bisht: कतारचे राजे शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी मेस्सीला ट्रॉफी प्रदान करण्यापूर्वी हा पारंपारिक बिश्त प्रदान केला. हा गाऊन बिश्त या नावाने ओळखला जातो. मेस्सीने परिधान केलेला काळा गाऊन (बिश्त) अरब देशांमध्ये खूप महत्त्वाचा आहे.

    • Lionel Messi offered $1m for Arabic Bisht: कतारचे राजे शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी मेस्सीला ट्रॉफी प्रदान करण्यापूर्वी हा पारंपारिक बिश्त प्रदान केला. हा गाऊन बिश्त या नावाने ओळखला जातो. मेस्सीने परिधान केलेला काळा गाऊन (बिश्त) अरब देशांमध्ये खूप महत्त्वाचा आहे.

फिफा विश्वचषक २०२२ च्या फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले आणि ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला. लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक होता. हा वर्ल्डकप जिंकल्यामुळे त्याच्या सोनेरी करिअरला चार चांद लागले आहेत. या ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार लिओनेल मेस्सी जेव्हा ट्रॉफी उचलण्यासाठी मंचावर गेला तेव्हा एक दृश्य पाहायला मिळाले. ट्रॉफी प्रदान करण्यापूर्वी मेस्सीला काळ्या रंगाचा गाऊन घालण्यात आला होता. हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. विश्वचषकात प्रथमच असे घडत होते.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

कतारचे राजे शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी मेस्सीला ट्रॉफी प्रदान करण्यापूर्वी हा पारंपारिक बिश्त प्रदान केला. हा गाऊन बिश्त या नावाने ओळखला जातो. मेस्सीने परिधान केलेला काळा गाऊन (बिश्त) अरब देशांमध्ये खूप महत्त्वाचा आहे. अरब देशांमध्ये हा बिश्त खास प्रसंगीच परिधान केला जातो. सामान्य माणूस तो घालू शकत नाही.

मात्र, आता ओमानमधील एका खासदाराने या पारंपारिक बिश्तबाबत लियोनेल मेस्सीला एक ऑफर दिली आहे. अहमद अल बरवानी असे या ओमानच्या संसद सदस्याचे नाव आहे. मेस्सीला कतारने दिलेली पारंपारिक बिश्त आपल्याला द्यावी, त्याबदल्यात आपण मेस्सीला १ मिलियन डॉलर्स देऊ इच्छित आहोत, असे ट्विट खासदारांनी केले आहे. मेस्सीने परिधान केलेली बिश्त ओमानमधील एका संग्राहलयात ठेवण्यात येईल. जेणेकरून जगभरातील लोक हा बिश्त पाहू शकतील, असे खासदार अहमद अल बरवानी यांनी म्हटले आहे.

अल बरवानी यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ओमानच्या सल्तनतकडून मी कतार २०२२ विश्वचषक जिंकल्याबद्दल तुमचे अभिनंदन करतो … अरबी बिश्त शौर्याचे प्रतीक आहे. त्या बिश्तच्या बदल्यात मी तुम्हाला $१ मिलियन डॉलर्स ऑफर करत आहे.”

उंटाचे केस आणि बकरीच्या लोकरीपासून बनवले जाते बिश्त

दरम्यान, हा बिश्त बनवण्यासाठी उंटाचे केस आणि बकरीचे लोकर वापरतात. धार्मिक नेत्यांव्यतिरिक्त, फक्त राजघराण्यातील लोकच हा बिश्त घालतात. कतारचे राजे अमीर तमीम बिन हमाद अल थानी यांनी मेस्सीला सन्मान म्हणून हा बिश्त प्रदान केला होता. यावेळी फिफा प्रमुख जिया इन्फँटिनोही तेथे उपस्थित होते.

 

पुढील बातम्या