मराठी बातम्या  /  क्रीडा  /  lga carmona : निर्णायक गोल करून वर्ल्डकप जिंकला, पण घरी वडिलांचं निधन झालं, स्पॅनिश कॅप्टनवरील प्रसंगानं सर्वांनाच रडवलं

lga carmona : निर्णायक गोल करून वर्ल्डकप जिंकला, पण घरी वडिलांचं निधन झालं, स्पॅनिश कॅप्टनवरील प्रसंगानं सर्वांनाच रडवलं

Aug 21, 2023, 04:46 PM IST

  • olga carmona, fifa women world cup 2023 : सामन्यानंतर निर्णयाक गोल करणाऱ्या कर्णधार ओल्गा कार्मोनावर दुखाचा डोंगर कोसळला. कारण हा सामना संपल्यानंतर तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी तिच्या कानावर येऊन धडकली.

olga carmona

olga carmona, fifa women world cup 2023 : सामन्यानंतर निर्णयाक गोल करणाऱ्या कर्णधार ओल्गा कार्मोनावर दुखाचा डोंगर कोसळला. कारण हा सामना संपल्यानंतर तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी तिच्या कानावर येऊन धडकली.

  • olga carmona, fifa women world cup 2023 : सामन्यानंतर निर्णयाक गोल करणाऱ्या कर्णधार ओल्गा कार्मोनावर दुखाचा डोंगर कोसळला. कारण हा सामना संपल्यानंतर तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी तिच्या कानावर येऊन धडकली.

स्पेनने महिला फिफा विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले. ऑस्ट्रेलियातील सिडनी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडचा १-० असा पराभव केला. स्पेनची कर्णधार ओल्गा कार्मोना हिने २९व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल करून आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. स्पॅनिश संघ प्रथमच महिला फिफा विश्वचषक चॅम्पियन बनला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मात्र, या सामन्यानंतर निर्णयाक गोल करणाऱ्या कर्णधार ओल्गा कार्मोनावर दुखाचा डोंगर कोसळला. कारण हा सामना संपल्यानंतर तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी तिच्या कानावर येऊन धडकली.

पण तत्पूर्वी, सामन्यातील अंतिम शिटी वाजल्यानंतर स्पॅनिश खेळाडूंनी मैदानात आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. यानंतर कार्मोनानेही पुरस्कार सोहळ्याला सामान्य पद्धतीने हजेरी लावली. कारण तोपर्यंत तिला वडिलांच्या निधनाची माहिती नव्हती. याूबाबत स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने ट्विटरवर लिहिले, 'आम्ही तुझ्यावर प्रेम करतो ओल्गा. तु स्पॅनिश फुटबॉलच्या सोनेरी इतिहासाचा एक भाग आहेस".

लक्ष विचलित होऊ नये, यासाठी बातमी लपवली

ओल्गा कार्मोनाचे वडील प्रदीर्घ आजारामुळे शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मरण पावले होते. पण स्पॅनिश माध्यमांमधील वृत्तांनुसार, ओल्गाचे फायनल सामन्यावरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून तिच्या कुटुंबीयांनी आणि स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने तिच्यापासून ही गोष्ट लपवली होती.

अखेर रविवारी फायनल जिंकल्यानंतर स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने ओल्गाला तिच्या वडिलांच्या निधनाबद्दल सांंगितले. यानंतर आपल्या वडिलांच्या आठवणीत ओल्गाने एक पोस्ट लिहित म्हटले की, “मला माहिती आहे की तुम्ही माझा खेळ आज पाहत होतात, आणि तुम्हाला माझा अभिमान आहे. रेस्ट इन पीस, डॅड!”.

 

पुढील बातम्या