मराठी बातम्या  /  क्रीडा  /  शेतात बनवलं मैदान, बनावट IPL द्वारे सट्टेबाजी; गुजरातमध्ये चौघांना अटक

शेतात बनवलं मैदान, बनावट IPL द्वारे सट्टेबाजी; गुजरातमध्ये चौघांना अटक

Jul 11, 2022, 06:47 PM IST

    • आयपीएलसारखी क्रिकेट लीग असल्याचं भासवण्यासाठी शेतात मैदान, लाइट, कॅमेरा, बनावट खेळाडू भाड्याने आणले होते. इतकंच काय तर कमेंट्रीसुद्धा दिग्गज कमेंटेटर्सच्या आवाजात होत होती.
गुजरातमध्ये बनावट लीगद्वारे सट्टेबाजी करणाऱ्या चौघांना अटक

आयपीएलसारखी क्रिकेट लीग असल्याचं भासवण्यासाठी शेतात मैदान, लाइट, कॅमेरा, बनावट खेळाडू भाड्याने आणले होते. इतकंच काय तर कमेंट्रीसुद्धा दिग्गज कमेंटेटर्सच्या आवाजात होत होती.

    • आयपीएलसारखी क्रिकेट लीग असल्याचं भासवण्यासाठी शेतात मैदान, लाइट, कॅमेरा, बनावट खेळाडू भाड्याने आणले होते. इतकंच काय तर कमेंट्रीसुद्धा दिग्गज कमेंटेटर्सच्या आवाजात होत होती.

गुजरातच्या (Gujrat) वडनगरमध्ये एका गावात काही लोकांना बनावट इंडियन प्रीमियर लीग (IPL) सुरू करून त्यावर सट्टा रॅकेट चालवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यासाठी चक्क एक बनावट क्रिकेट लीग, बनावट मैदान, बनावट क्रिकेटर आणि कमेंटेटरसुद्धा होते. एखाद्या चित्रपटाचं कथानक वाटावं अशा पद्धतीने क्रिकेट लीग सुरु असल्याचं भासवून त्यावर सट्टा लावण्यात येत होता. या प्रकरणी मेहसाना पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मेहसाणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अटकेची कारवाई केली आहे. चौघांवर फसवणुकीचा आणि सट्टेबाजी केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. रशियात राहणाऱ्या आणि तिथून सट्टेबाजीचं हे रॅकेट चालवणाऱ्या आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडनगरच्या मॉलीपूर गावात काही लोकांनी एक शेत खरेदी केलं. त्या शेतात क्रिकेटचं मैदान उभारलं. फ्लड लाइट लावण्यात आलं. तिथे खेळपट्टी तयार केली. याशिवाय मल्टिकॅमेरा सेटअप, कमेंट्री बॉक्सही लावले. मोठ्या क्रिकेट लीगसाठी ज्या काही गोष्टी लागतात ते सगळं तिथे उभारलं. सगळं काही आयपीएलसारखं वाटावं अशी तयारी करण्यात आली. तसंच एक मोबइल अॅप करून त्यावर हे सर्व लाइव्ह दाखवण्यात येत होतं.

बनावट क्रिकेट लीगमध्ये खेळण्यासाठी गावातील मुलांना प्रत्येक सामन्यासाठी ४०० रुपये मिळत होते आणि संपूर्ण सामना खेळला जात होता. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियात बसलेल्या व्यक्तीने ही सर्व व्यवस्था केली होती. तोच या सगळ्या रॅकेटची सूत्रे सांभाळत होता.

सट्ट्याच्या रेटनुसार जे नकली क्रिकेटर्स खेळत होते त्यांना सांगितलं होतं की, "कधी चौकार मारायचा, कधी आऊट व्हायचं." पोलिसांनी आरोपींकडून क्रिकेट कीट, स्पीकर, लाइट, मल्टी कॅमेरा सेटअप यासह अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. एवढंच काय तर यामध्ये नकली कमेंटेटर दिग्गज कमेंटेटर्सच्या आवाजात कमेंट्रीही करायचा. स्वत: हर्षा भोगले यांनीही याबाबत एक ट्विट केलं आहे.

विभाग

पुढील बातम्या