मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ind Vs Eng Hockey : भारत-इंग्लंड थरारक लढत ड्रॉ, १२ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण एकही गोल झाला नाही

Ind Vs Eng Hockey : भारत-इंग्लंड थरारक लढत ड्रॉ, १२ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण एकही गोल झाला नाही

Jan 15, 2023, 09:02 PM IST

    • England Vs India Hockey world cup Highlights: हॉकी विश्वचषक २०२३ मधील भारतीय संघाचा दुसरा सामना इंग्लंडविरुद्ध ड्रॉ झाला. पहिल्या सामन्यात स्पेनविरुद्ध विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाने इंग्लंडला हरवून सलग दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली होती, मात्र तसे झाले नाही. या सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि सामना ०-० असा बरोबरीत सुटला.
England Vs India Hockey world cup 2023

England Vs India Hockey world cup Highlights: हॉकी विश्वचषक २०२३ मधील भारतीय संघाचा दुसरा सामना इंग्लंडविरुद्ध ड्रॉ झाला. पहिल्या सामन्यात स्पेनविरुद्ध विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाने इंग्लंडला हरवून सलग दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली होती, मात्र तसे झाले नाही. या सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि सामना ०-० असा बरोबरीत सुटला.

    • England Vs India Hockey world cup Highlights: हॉकी विश्वचषक २०२३ मधील भारतीय संघाचा दुसरा सामना इंग्लंडविरुद्ध ड्रॉ झाला. पहिल्या सामन्यात स्पेनविरुद्ध विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाने इंग्लंडला हरवून सलग दुसरा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरली होती, मात्र तसे झाले नाही. या सामन्यात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि सामना ०-० असा बरोबरीत सुटला.

England Vs India Hockey world cup 2023 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील हॉकी विश्वचषक स्पर्धेतील डी गटातील सामना ०-० असा ड्रॉ झाला. हा सामना अतिशय रोमांचक होता आणि चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही आणि १-१ गुणांवर समाधान मानावे लागले. 

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात भारताने स्पेनचा तर इंग्लंडने वेल्सचा पराभव केला होता. आता हा सामना ड्रॉ झाल्यानंतर दोन्ही संघांचे ४-४ गुण झाले आहेत. मात्र, चांगल्या गोल फरकामुळे इंग्लंडचा संघ गुणतालिकेत अव्वल आहे. आता भारताचा शेवटचा सामना वेल्स विरुद्ध आणि इंग्लंडचा शेवटचा गट सामना स्पेन विरुद्ध आहे.

या सामन्यात इंग्लंडने पहिल्या क्वार्टरमध्ये ५ पेनल्टी कॉर्नर मिळवत चांगली सुरुवात केली. भारताला केवळ एक पेनल्टी कॉर्नर मिळवता आला, मात्र दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला ३ पेनल्टी कॉर्नर आणि इंग्लंडने २ पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण या क्वार्टरमध्येही एकही गोल झाला नाही. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने शानदार खेळ केला आणि सातत्याने आक्रमणे केली, मात्र या क्वार्टरमध्येदेखील एकही गोल झाला नाही.

सामन्याच्या चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये अमीत रोहिदास आणि जर्मनप्रीत सिंग या दोन भारतीय खेळाडूंना ग्रीन कार्ड मिळाले. यामुळे भारताला बॅकफूटवर यावे लागले आणि टीम इंडियाला शेवटच्या क्षणी गोल करण्याचा प्रयत्न करता आला नाही. त्याचवेळी सामन्याच्या ५९व्या मिनिटाला इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र पुन्हा एकदा भारतीय बचावफळीने गोल होऊ दिला नाही आणि सामना अनिर्णित राहिला.

या सामन्यात भारताला ४ आणि इंग्लंडला ८ पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण एकाही संघाला गोल करता आला नाही. सामना गोलशून्य संपला. मात्र, तरीही १२ पेनल्टी कॉर्नरमुळे सामना खूपच रोमांचक झाला. 

दरम्यान, या गटातील आजच्या आणखी एका सामन्यात स्पेनने वेल्सचा ५-१ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, ड गटातून भारत आणि इंग्लंडचा पुढील फेरी गाठण्याचा मार्ग अतिशय सोपा झाला आहे.

 

पुढील बातम्या