मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Video: भीषण आगीत स्टुअर्ट ब्रॉडचा पब जळून खाक! घटनेनंतर ब्रॉडचं ट्वीट…

Video: भीषण आगीत स्टुअर्ट ब्रॉडचा पब जळून खाक! घटनेनंतर ब्रॉडचं ट्वीट…

Jun 12, 2022, 03:20 PM IST

    • स्टुअर्ट ब्रॉड आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी हे दोघे या पबचे मालक आहेत.
stuart braod pub (stuart braod, twitter)

स्टुअर्ट ब्रॉड आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी हे दोघे या पबचे मालक आहेत.

    • स्टुअर्ट ब्रॉड आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी हे दोघे या पबचे मालक आहेत.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नॉटिंगहॅम (england vs newzeland nottingham test) येथे मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (stuart broad) नॉटिंगहॅममध्ये )(nottingham) आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यात व्यस्त आहे. मात्र, दुसरीकडे त्याच्या द टॅप अँड रन (the tap and run) या पबला भीषण आग लागली. यामुळे ब्रॉडचा पब पूर्णपणे जळून खाक झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

ब्रॉडने या घटनेबद्दल ट्विट केले आहे. तो म्हणाला की, “मला आज सकाळच्या बातमीवर विश्वास बसत नाही. यात कोणाला काही दुखापत झाली नाही, हे बरे झाले. तसेच, नॉटिंगहॅमशायर अग्निशमन दल आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. या कामात तेथील ग्रामस्थांनीही मदत केली यासाठी आभार, रोजच्या जीवनात व्यत्यय आल्याबद्दल क्षमस्व".

दरम्यान, स्टुअर्ट ब्रॉड आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी हे दोघे या पबचे मालक आहेत. या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आग आटोक्यात आली.

इंग्लंड-न्युझीलंड यांच्या कसोटी मालिकेतील सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव ५५३ धावांवर आटोपला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने १ गडी गमावून ९० धावा केल्या होत्या. न्यूझीलंड सध्या इंग्लंडपेक्षा ४६३ धावांनी पुढे आहे.

पुढील बातम्या