मराठी बातम्या  /  क्रीडा  /  ENG vs NZ T20: इंग्लंडच्या विजयानं ऑस्ट्रेलिया अडचणीत, सेमी फायनलची चुरस आणखी वाढली

ENG vs NZ T20: इंग्लंडच्या विजयानं ऑस्ट्रेलिया अडचणीत, सेमी फायनलची चुरस आणखी वाढली

Nov 01, 2022, 05:03 PM IST

    • T20 World Cup England Vs New Zealand highlights: T20 विश्वचषकात आजचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावाच करू शकला.
England Vs New Zealand highlights

T20 World Cup England Vs New Zealand highlights: T20 विश्वचषकात आजचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावाच करू शकला.

    • T20 World Cup England Vs New Zealand highlights: T20 विश्वचषकात आजचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावाच करू शकला.

T20 World Cup England Vs New Zealand Scorecard: T20 विश्वचषकात आजचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावाच करू शकला. हा सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर खेळला गेला.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरने ४७ चेंडूत ७३ धावा आणि अॅलेक्स हेल्सने ४० चेंडूत ५२ धावा केल्या. तर न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ३६ चेंडूत ६२ धावांची खेळी खेळली. त्याचवेळी कर्णधार केन विल्यमसनने ४० चेंडूत ४० धावा केल्या.

इंग्लंडसाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. कारण या सामन्यापूर्वी या इंग्लंडचे ३ सामन्यांतून केवळ ३ गुण होते. तर ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका गट १ च्या गुणतालिकेत इंग्लंडपेक्षा वर होते. या दोन संघांचे अनुक्रमे ५ आणि ४ गुण आहेत. तसेच, न्यूझीलंडने हा सामना जिंकला असता तर उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ बनू शकला असता.

दरम्यान, इंग्लंडच्या या विजयनांतर ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. कारण आता ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा तर आहेच, पण मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

गुणतालिकेत आता इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे प्रत्येकी ५-५ गुण आहेत. नेट रनरेटच्या आधारे न्युझीलंड पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहेत.

पुढील बातम्या