मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Ben Stokes: ‘दिप्ती शर्मा मांकडिंग’प्रकरण थांबता थांबेना, आता हर्षा आणि स्टोक्स यांच्यात जुंपली

Ben Stokes: ‘दिप्ती शर्मा मांकडिंग’प्रकरण थांबता थांबेना, आता हर्षा आणि स्टोक्स यांच्यात जुंपली

Oct 01, 2022, 04:55 PM IST

    • Harsha Bhogle vs Ben Stokes twitter fight on Deepti Sharma Mankading: इंग्लंडच्या अनेक आजी माजी खेळाडूंनी दिप्ती शर्मा तसेच, भारतीय महिला संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचा निषेध म्हणून हर्षा भोगले यांनी ८ ट्विट करत टीकाकारांचा समाचार घेतला होता.
Ben Stokes

Harsha Bhogle vs Ben Stokes twitter fight on Deepti Sharma Mankading: इंग्लंडच्या अनेक आजी माजी खेळाडूंनी दिप्ती शर्मा तसेच, भारतीय महिला संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचा निषेध म्हणून हर्षा भोगले यांनी ८ ट्विट करत टीकाकारांचा समाचार घेतला होता.

    • Harsha Bhogle vs Ben Stokes twitter fight on Deepti Sharma Mankading: इंग्लंडच्या अनेक आजी माजी खेळाडूंनी दिप्ती शर्मा तसेच, भारतीय महिला संघाच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याचा निषेध म्हणून हर्षा भोगले यांनी ८ ट्विट करत टीकाकारांचा समाचार घेतला होता.

भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात नुकतीच तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने इंग्लंडचा ३-० असा पराभव केला. मालिकेतील तिसरा वनडे खूपच चर्चेत राहिला. या सामन्यात भारताची दिग्गज ऑलराऊंडर दीप्ती शर्माने इंग्लिश फलंदाज चार्ली डीन हिला मांकडिंगद्वारे धावबाद केले होते. यानंतर यावरुन मोठ्या प्रमाणात वाद सुरु आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

या प्रकरणी भारतीय कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी शुक्रवारी ८ ट्वीट करत एक दीर्घ टिप्पणी लिहिली. आता हर्षा भोगले यांच्या ट्विटचीही बरीच चर्चा रंगली आहे. या ट्विटला इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने प्रत्युत्तर दिले आहे. हर्षा  यांनी मांकडिंगबाबत केलेल्या टिप्पणीत इंग्लंडच्या खेळाडूंची विचारसरणी आणि संगोपनाविषयी भाष्य केले होते.

बेन स्टोक्सने काय म्हटले आहे

बेन स्टोक्सने हर्षा यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर देत लिहिले की, “हर्षा, मांकडिंगच्या विषयावर लोकांनी मते दिली आहेत. यामध्ये तू संस्कृती आणत आहेस?,” तसेच, स्टोक्सने दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिले की, “२०१९ विश्वचषक स्पर्धेच्या फायनलला २ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, आजपर्यंत मला त्या फायनलबद्दल अनेक प्रकारचे मेसेज आले आहेत, ज्यात भारतीय चाहत्यांचेही मेसेज आहेत. हे तुम्हाला त्रासदायक ठरत नाही का?”

सोबतच, अन्य एका ट्विटमध्ये बेन स्टोक्सने लिहिले की, “ही गोष्ट संस्कृतीशी संबंधित आहे का? अजिबात नाही, मला जगभरातून ओव्हर थ्रो बद्दलचे मेसेज मिळतात, त्याचप्रमाणे जगभरातून अनेक लोक मांकडींगबद्दलही मेसेज पाठवत आहेत, यामध्ये केवळ इंग्लिश लोकांचा सहभाग नाही”.

हर्षा यांच्या ट्वीटमध्ये काय होते

दीप्ती शर्माच्या त्या रनआउटवर बराच गदारोळ झाला होता. आजी माजी इंग्लिश क्रिकेटपटूंनी दिप्ती शर्मा आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. याचा निषेध म्हणून हर्षा यांनी ८ ट्विट करत टीकाकारांचा समाचार घेतला होता.

या ट्वीटमध्ये  हर्षा यांनी लिहिले होते की, “जगाने त्यांच्याप्रमाणे (इंग्लंडच्या क्रिकेटपटूंप्रमाणे) विचार करावा अशी त्यांची इच्छा असते, हे इंग्लंडच्या संस्कृती आणि विचारसरणीत आहे”.

पुढील बातम्या