मराठी बातम्या  /  क्रीडा  /  David Warner: मॅच सुरु होण्याआधी वॉर्नरकडून मोठी चूक, भारतीयांची माफी मागावी लागली

David Warner: मॅच सुरु होण्याआधी वॉर्नरकडून मोठी चूक, भारतीयांची माफी मागावी लागली

Sep 20, 2022, 07:25 PM IST

    • ind vs aus 1st t20 david warner said sorry to indian fan: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना सुरु आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट करताना वॉर्नरने टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माऐवजी माजी कर्णधार विराट कोहलीचा फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे भारतीय चाहते थोडेसे नाराज झाले होते. 
David Warner

ind vs aus 1st t20 david warner said sorry to indian fan: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना सुरु आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट करताना वॉर्नरने टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माऐवजी माजी कर्णधार विराट कोहलीचा फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे भारतीय चाहते थोडेसे नाराज झाले होते.

    • ind vs aus 1st t20 david warner said sorry to indian fan: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-२० सामना सुरु आहे. यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट करताना वॉर्नरने टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माऐवजी माजी कर्णधार विराट कोहलीचा फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे भारतीय चाहते थोडेसे नाराज झाले होते. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन T20I सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मंगळवारी मोहालीच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आपल्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. वॉर्नरला या मालिकेतून विश्रांती देण्यात आल्याने तो भारत दौऱ्यावर आला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

वॉर्नरने आपल्या संघाला शुभेच्छा देताना मोठी चूक केली आहे. मात्र, चुक लक्षात आल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. वॉर्नरने आपल्या इंस्टाग्रामवर ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅरोन फिंच आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांचा फोटो पोस्ट केला होता. त्यासोबत त्याने कॅप्शनमध्ये “आज कोण जिंकत आहे? वेल डन ऑस्ट्रेलिया. असा प्रश्न विचारला होता.

मात्र, ही पोस्ट करताना वॉर्नरने टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माऐवजी माजी कर्णधार विराट कोहलीचा फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे भारतीय चाहते थोडेसे नाराज झाले होते.

दरम्यान, वॉर्नरच्या या पोस्टवर कमेंट करताना एका चाहत्याने याची आठवणही त्याला करुन दिली. युजरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, भाऊ रोहित कर्णधार आहे, विराट नाही. चाहत्याच्या या कमेंटनंतर वॉर्नरने त्याची माफीही मागितली. चाहत्यांच्या कमेंटला उत्तर देताना ऑस्ट्रेलियन फलंदाजाने लिहिले की, मला माहीत आहे. सॉरी.''

दोन्ही संघ खालीलप्रमाणे

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमेश यादव, युझवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया : अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमरुन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, नॅथन एलिस, अॅडम झॅम्पा, जोश हेझलवूड.

पुढील बातम्या