मराठी बातम्या  /  क्रीडा  /  David Beckham : फुटबॉलपटू डेविड बेकहॅमच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीनं सोडलं मौन, म्हणाली...

David Beckham : फुटबॉलपटू डेविड बेकहॅमच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीनं सोडलं मौन, म्हणाली...

Oct 05, 2023, 03:46 PM IST

  • david beckham documentary : इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेविड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरियानं आयुष्यातील कठीण प्रसंगांवर भाष्य केलं आहे.

David beckham

david beckham documentary : इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेविड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरियानं आयुष्यातील कठीण प्रसंगांवर भाष्य केलं आहे.

  • david beckham documentary : इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू डेविड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरियानं आयुष्यातील कठीण प्रसंगांवर भाष्य केलं आहे.

david beckham documentary : जगातील स्टार फुटबॉलपटूंपैकी एक असलेला इंग्लंडचा डेव्हिड बेकहॅम याच्या जीवनावर लवकरच एक माहितीपट प्रदर्शित होणार आहे. या माहितीपटात बेकहॅमचं वैवाहिक आयुष्य, व्हिक्टोरिया बेकहॅम सोबतचं त्याचं नातं आणि आर्थिक चढ-उतार यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात बेकहॅमची पत्नी व्हिक्टोरिया हिनं डेविडच्या विवाहबाह्य संंबंधांवर थेट भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

डेविड बेकहॅमनं पर्सनल असिस्टंट रिबेका लूस हिला नोकरीवरून काढल्यानंतर एका मुलाखतीत तिनं बेकहॅमवर खळबळजनक आरोप केले होते. डेविडचे आणि माझे चार महिने संबंध होते. डेविड विवाहित असताना आणि व्हिक्टोरिया त्याच्या आयुष्यात असताना तो माझ्या प्रेमात होता, असा दावा तिनं केला होता.

Live : हॅरी ब्रुक बाद, इंग्लंडचे तीन फलंदाज तंबूत, मोईन अली-रूट क्रीजवर

बेकहॅमवरील माहितीपटात डेव्हिड बेकहॅम आणि पत्नी व्हिक्टोरिया या दोघांनीही रिबेका लूसच्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'केवळ जग त्यांच्या विरोधात नाही तर आम्ही दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत, असं आम्हाला तेव्हा वाटतं होतं. आमच्यासाठी ते एक दुःस्वप्न होतं. अत्यंत कठीण काळ होता. अवघं जग विरोधात गेल्यासारखं वाटत होतं. पण आम्ही एकमेकांच्या सोबत होतो. माझ्या मनावर या सगळ्या प्रकरणाचा काय परिणाम झाला याचं शब्दांत वर्णन करू शकत नाही, असं व्हिक्टोरियानं म्हटलं आहे.

डेव्हिड बेकहॅम यानंही या प्रकरणावर मौन सोडलं आहे. 'व्हिक्टोरिया माझं सर्वस्व आहे. तिला दु:खी पाहणं माझ्यासाठी कठीण होतं. पण आम्ही हार मानणाऱ्यातले नाही. त्यावेळी आम्ही एकमेकांसोबत उभे राहिलो. आलेल्या प्रसंगाला धैर्यानं तोंड दिलं. लूस सोबतच्या अफेअरच्या चर्चा जोरात असताना आम्ही एकमेकांना गमावू की काय अशी भीती वाटत होती, अशी कबुली बेकहॅमनं दिली आहे.

दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यात नक्कीच काहीतरी खास असतं. माझ्या आणि व्हिक्टोरियाच्या नात्याच्या बाबतीतही तसंच आहे. आम्ही २६ वर्षे, म्हणजे जवळजवळ तीन दशकं एकत्र आहोत. आम्हाला मुलं आहेत. त्यांनी आपापले मार्ग शोधून काढलेत. आमचेही वेगवेगळे व्यवसाय आहेत, तरीही आम्ही एकमेकांना वेळ देतो, असं तो म्हणाला.

विभाग

पुढील बातम्या