मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Dale Steyn Stunt: ‘स्वॅग अगदी तसाच!' स्टेनचा स्केटबोर्ड थरारक स्टंट, व्हिडीओ पाहा

Dale Steyn Stunt: ‘स्वॅग अगदी तसाच!' स्टेनचा स्केटबोर्ड थरारक स्टंट, व्हिडीओ पाहा

Aug 12, 2022, 02:39 PM IST

    • Dale Steyn Stunt video: डेल स्टेनने वयाच्या ३९ व्या वर्षी स्केट बोर्डवर शानदार स्टंट केले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dale Steyn

Dale Steyn Stunt video: डेल स्टेनने वयाच्या ३९ व्या वर्षी स्केट बोर्डवर शानदार स्टंट केले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    • Dale Steyn Stunt video: डेल स्टेनने वयाच्या ३९ व्या वर्षी स्केट बोर्डवर शानदार स्टंट केले आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपल्या धारदार गोलंदाजीने क्रिकेट जग गाजवणाऱ्या डेल स्टेनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ३९ वर्षीय या वेगवान गोलंदाजाने स्केट बोर्डवर एक शानदार स्टंट केला आहे. या अप्रतिम स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकजण त्याच्या या स्टंटचे कौतुक करत आहेत. स्टेन सध्या आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

सनरायझर्स हैदराबादनेच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर डेल स्टेनच्या स्केटबोर्ड स्टंटचा व्हिडिओ शेअर केला आहे. हे ट्विट शेअर करत सनरायझर्सने लिहिले की, 'स्वॅग कधीही कमी होत नाही.'

डेल स्टेनचे करिअर-

डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधित विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. आपल्या कारकिर्दीत त्याने ९३ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ४३९ विकेट्स घेतल्या आहेत.तर त्याची सर्वोत्तम कामगिरी त्याने २०१३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध नोंदवली होती. त्या कसोटी सामन्या त्याने अवघ्या ८ धावा देत ८ विकेट्स घेतले होते.

तसेच, स्टेनने १२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १९६ आणि ४७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६४ विकेट्स घेतल्या आहेत.

डेल स्टेन आयपीएलमध्ये-

सोबतच स्टेन आयपीएलमध्येही अनेक संघांकडून खेळला आहे. स्टेनने ९५ सामन्यांमध्ये ९७ बळी घेतले आहेत.

दरम्यान डेल स्टेन आता सनरायझर्स हैदराबादच्या कोचिंग स्टाफचा भाग आहे. भारताचा युवा स्पीडमास्टर उमरान मलिक हा देखील डेल स्टेनच्या मार्गदर्शनाखालीच ट्रेन झाला आहे. डेल स्टेनच्या टीप्स त्याला यंदाच्या आयपीएलमध्ये खूप कामी आल्या. त्या बळावरच उमरानने आयपीएल २०२२ मध्ये २२ विकेट्स घेतल्या होत्या.

पुढील बातम्या