मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स कधीपासून? लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहायचे? जाणून घ्या

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स कधीपासून? लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहायचे? जाणून घ्या

Jul 22, 2022, 12:24 PM IST

    • कॉमनवेल्थ गेम्स चार वर्षातून एकदा होतात. यावेळी यामध्ये ७२ देश सहभागी होणार आहेत. ११ दिवसात ८ पॅरा स्पोर्ट्ससह १९ क्रीडा प्रकारातील स्पर्धा होणार आहेत.
कॉमनवेल्थ गेम्स (फोटो - CWG Facebook)

कॉमनवेल्थ गेम्स चार वर्षातून एकदा होतात. यावेळी यामध्ये ७२ देश सहभागी होणार आहेत. ११ दिवसात ८ पॅरा स्पोर्ट्ससह १९ क्रीडा प्रकारातील स्पर्धा होणार आहेत.

    • कॉमनवेल्थ गेम्स चार वर्षातून एकदा होतात. यावेळी यामध्ये ७२ देश सहभागी होणार आहेत. ११ दिवसात ८ पॅरा स्पोर्ट्ससह १९ क्रीडा प्रकारातील स्पर्धा होणार आहेत.

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ ला २८ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या बर्मिंगहममध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या थेट प्रसारणाचे टीव्ही आणि डिजिटलचे अधिकार सोनी पिक्चर्स नेटवर्क्स (SPN) इंडियाने मिळवले आहेत. ही २२ वी कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धा असून ८ ऑगस्ट पर्यंत पार पडणार आहे. SPNला भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतान आणि मालदीवमध्ये एक्सक्लुसिव्ह प्रसारणाचे अधिकार मिळाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Para Championship 2024 : मजुराच्या लेकीनं जपानमध्ये रचला इतिहास, आई-वडिलांना टोमणे मारणाऱ्यांना लगावली सणसणीत चपराक

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या SonyLIV वरसुद्धा गेम्सचे लाइव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल. कॉमनवेल्थ गेम्स चार वर्षातून एकदा होतात. यावेळी यामध्ये ७२ देश सहभागी होणार आहेत. ११ दिवसात ८ पॅरा स्पोर्ट्ससह १९ क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे.

अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, जलतरण, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कुस्ती, हॉकी, ज्युदो आणि इतर खेळांचा यामध्ये समावेश असणार आहे. याशिवाय महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसी आणि बर्मिंगहम आयोजन समितीने महिला क्रिकेटच्या टी २० फॉरमॅटचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. आयसीसीने बर्मिंगहम २०२२ स्पर्धेला मंजुरी दिली आहे.

भारतीय पथकाने २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सर्वाधिक १०१ पदके जिंकली होती. गेल्या दोन दशकात कॉमनवेल्थ गेम्सच्या यादीत भारताचे स्थान वरती दिसत आहे. भारताने २०१८ मध्ये पॉइंट टेबलमध्ये तिसरं स्थान पटकावलं होतं. तिथे ६६ पदकांसह पाहुणा देश म्हणून जबरदस्त कामगिरी केली होती. बर्मिंगहम २०२२ कॉमनवेल्थ गेम्सचे लाइव्ह कव्हरेज सोनी सिक्स, सोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३ आणि सोनी टेन ४ चॅनेलवर पाहता येईल.

विभाग

पुढील बातम्या