मराठी बातम्या  /  क्रीडा  /  CSK vs LSG Dream 11 : फॅन्टसी क्रिकेटमध्ये धोनी, राहुल नाही तर या खेळाडूला बनवा तुमचा कर्णधार, पाहा

CSK vs LSG Dream 11 : फॅन्टसी क्रिकेटमध्ये धोनी, राहुल नाही तर या खेळाडूला बनवा तुमचा कर्णधार, पाहा

Apr 03, 2023, 04:49 PM IST

    • CSK vs LSG Dream 11 IPL 2023 : आयपीएलचा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आज (३ एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजता एमएम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. 
CSK vs LSG Dream 11

CSK vs LSG Dream 11 IPL 2023 : आयपीएलचा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आज (३ एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजता एमएम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.

    • CSK vs LSG Dream 11 IPL 2023 : आयपीएलचा सहावा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात आज (३ एप्रिल) संध्याकाळी साडेसात वाजता एमएम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. 

CSK vs LSG Best Dream 11 IPL 2023 : आयपीएल 2023 चा सहावा सामना आज (३ एप्रिल) रोजी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची नजर पहिल्या विजयावर असेल. दोन्ही संघात महान खेळाडू आहेत. सामन्यात निकराची लढत होईल.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

दरम्यान, फॅन्टसी क्रिकेट खेळणाऱ्या चाहत्यांच्या मनात या सामन्याबाबत प्रश्न असेल की त्यांच्या संघात कोणत्या ११ खेळाडूंचा समावेश करावा. याचेच उत्तर तुम्हाला येथे मिळणार आहे.

या खेळाडूला बनवा तुमच्या ड्रीम इलेव्हनचा कर्णधार 

या सामन्यात तुम्ही काइल मेयर्सला तुमच्या संघाचा कर्णधार बनवू शकता, जो लखनऊ सुपर जायंट्सकडून  केएल राहुलसोबत सलामीला खेळतो. गेल्या सामन्यात मेयर्सने १९२ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ७३ धावांची धडाकेबाज खेळी केली. अशा परिस्थितीत काइल मेयर्स आपल्या फॅन्टसी संघासाठी एक चांगला कर्णधार ठरू शकतो.

उपकर्णधारपदासाठी हे खेळाडू उत्तम पर्याय 

चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला तुमच्या फॅन्टसी टीमचा उपकर्णधार बनवू शकता. गुजरातविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला असेल, पण जड्डू सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. अशा परिस्थितीत तो तुमचा परिपूर्ण उपकर्णधार होऊ शकतो.

त्याच वेळी, संघातील फलंदाज म्हणून तुम्ही लखनऊचा कर्णधार केएल राहुल, चेन्नईचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांची निवड करू शकता. महेंद्रसिंग धोनी हा यष्टिरक्षणात चांगला पर्याय ठरू शकतो. उत्कृष्ट विकेटकीपिंगमुळे धोनी सामन्याला फिनिशिंग टच देऊ शकतो. जडेजासोबत अष्टपैलू खेळाडूंमध्ये मार्क स्टोइनिस आणि बेन स्टोक्सचीही निवड करू शकता. गोलंदाजीत मार्क वुड, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांचा संघात समावेश करू शकता.

बेस्ट ड्रीम इलेव्हन अशी असू शकते

केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, काईल मेयर्स (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), मार्कस स्टोइनिस, बेन स्टोक्स, मार्क वुड, रवी बिश्नोई आणि जयदेव उनाडकट.

पुढील बातम्या