मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cristiano Ronaldo: नवीन वर्षांत रोनाल्डो मालामाल! जॉईन केला नवा क्लब, कराराची रक्कम ऐकून होश उडतील

Cristiano Ronaldo: नवीन वर्षांत रोनाल्डो मालामाल! जॉईन केला नवा क्लब, कराराची रक्कम ऐकून होश उडतील

Dec 31, 2022, 01:47 PM IST

    • Cristiano Ronaldo join Saudi club Al-Nassr: रोनाल्डो यापूर्वी इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळत होता. मात्र दोघांमधील वादामुळे हा करार मोडला गेला. फिफा विश्वचषकापूर्वी रोनाल्डोने हा करार मोडला होता.
Cristiano Ronaldo join Saudi club Al-Nassr

Cristiano Ronaldo join Saudi club Al-Nassr: रोनाल्डो यापूर्वी इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळत होता. मात्र दोघांमधील वादामुळे हा करार मोडला गेला. फिफा विश्वचषकापूर्वी रोनाल्डोने हा करार मोडला होता.

    • Cristiano Ronaldo join Saudi club Al-Nassr: रोनाल्डो यापूर्वी इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळत होता. मात्र दोघांमधील वादामुळे हा करार मोडला गेला. फिफा विश्वचषकापूर्वी रोनाल्डोने हा करार मोडला होता.

Cristiano Ronaldo signs Saudi club Al-Nassr: जगातील दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी नवीन वर्ष २०२३ खास असणार आहे. तो सौदी अरेबियाचा क्लब अल-नासर एफसीमध्ये सामील झाला आहे. रोनाल्डोने २०२५ पर्यंत या क्लबशी करार केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

३७ वर्षीय रोनाल्डोने २०२५ पर्यंत अल नासरसोबत करार केला आहे. क्लब आणि रोनाल्डो यांच्यात किती पैशांचा करार झाला आहे, हे दोन्ही साईडकडून उघड करण्यात आलेले नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोनाल्डोने सौदी क्लबसोबत ३ वर्षांसाठी २०० मिलियन युरोंहून अधिकचा (१७५० कोटी रु.) करार केला आहे. वर्षाला ७५ मिलियन डॉलर्सचा (सुमारे ६२१ कोटी रुपये) करार केला आहे.

रोनाल्डो यापूर्वी इंग्लंडचा प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडकडून खेळत होता. मात्र दोघांमधील वादामुळे हा करार मोडला गेला. फिफा विश्वचषकापूर्वी रोनाल्डोने हा करार मोडला होता.

फिफा विश्वचषक २०२२ रोनाल्डोसाठी दुःखद स्वप्न

नुकताच कतारने आयोजित केलेला फिफा विश्वचषक २०२२ हा रोनाल्डो आणि त्याचा संघ पोर्तुगालसाठी दुःखद स्वप्नापेक्षा कमी नव्हता. पोर्तुगालला उपांत्यपूर्व फेरीत मोरोक्कोने १-० ने पराभूत केले. या स्पर्धेत रोनाल्डोला केवळ एकच गोल करता आला. बाद फेरीत त्याला स्टार्टिंग ११ मध्येही स्थान मिळाले नव्हते.

रोनाल्डो हा व्यावसायिक फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. रोनाल्डोने यावर्षी जोसेफ बीकनला (८०५ गोल) मागे टाकले होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही रोनाल्डोच्या नावावर आहे. रोनाल्डोने पोर्तुगालसाठी आतापर्यंत १९६ सामन्यांत ११८ गोल केले आहेत.

पुढील बातम्या