मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Cricket Fights : मियाँदाद, पाँटिंग ते धोनी! या ५ कर्णधारांनी घातला अंपायरसोबत राडा, जाणून घ्या

Cricket Fights : मियाँदाद, पाँटिंग ते धोनी! या ५ कर्णधारांनी घातला अंपायरसोबत राडा, जाणून घ्या

Jul 24, 2023, 03:02 PM IST

    • cricketers fight with umpires : रिकी पाँटिंग, धोनीसह दिग्गद कर्णधारांनी मैदानावार अंपायरसोबत वाद घातला आहे. सध्या हरमनप्रीत कौर आणि बांगलादेशी अंपायर यांच्यातील वादाने बरीच चर्चा मिळवली आहे.
cricketers fight with umpires

cricketers fight with umpires : रिकी पाँटिंग, धोनीसह दिग्गद कर्णधारांनी मैदानावार अंपायरसोबत वाद घातला आहे. सध्या हरमनप्रीत कौर आणि बांगलादेशी अंपायर यांच्यातील वादाने बरीच चर्चा मिळवली आहे.

    • cricketers fight with umpires : रिकी पाँटिंग, धोनीसह दिग्गद कर्णधारांनी मैदानावार अंपायरसोबत वाद घातला आहे. सध्या हरमनप्रीत कौर आणि बांगलादेशी अंपायर यांच्यातील वादाने बरीच चर्चा मिळवली आहे.

क्रिकेटच्या नियमांनुसार पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे काही अपराधापेक्षा कमी नाही. बरं, पंच सुद्धा माणूसच असतात आणि त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात. अशा स्थितीत अनेकवेळा खेळाडू त्यांच्याशी जोरदार वाद घालतात. जेव्हा अशी वादाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा संघाच्या कर्णधाराने त्यात हस्तक्षेप करून वाद मिटवणे गरजेचे असते.

ट्रेंडिंग न्यूज

RamSetu Campaign : ‘रामसेतू’ मोहिमेसाठी १२ भारतीय जलतरणपटू सज्ज, जाणून घ्या

Google Doodle Hamida Banu : भारतातील पहिली महिला कुस्तीपटू जिला पुरुष पैलवानही हरवू शकला नाही, जाणून घ्या

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

मात्र, कित्येकदा कर्णधारानेच आपला संयम गमावल्याचे दिसून आले आहे. क्रिकेटमधील ५ सर्वात प्रसिद्ध कॅप्टन-अम्पायरच्या भांडणांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जावेद मियांदाद

१९८५ मध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका सुरू होती. मालिका १-१ अशी बरोबरीत होती आणि तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानला सामना आणि मालिका जिंकण्यासाठी फक्त दोन विकेट्सची गरज होती. दरम्यान, युवा वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने लंच सत्रापूर्वी शेवटचा चेंडू बाऊन्सर टाकला यानंर अंपायरने अक्रमला वॉर्निंग दिली. अशा स्थितीत कर्णधार जावेद मियांदादचा मैदानावरील पंचांशी जोरदार वाद झाला. संतापलेल्या जावेद मियांदादने अक्रमला पुन्हा बाउन्सर फेकण्यास सांगितले.

रिकी पाँटिंग

मेलबर्न येथील ऑस्ट्रेलिय- इंग्लंड कसोटी सामन्यात रिकी पॉन्टिंगचा पाकिस्तानी पंच अलीम दार यांच्याशी बराच वेळ वाद झाला. रिकी पाँटिंगचा ऑस्ट्रेलियन संघ अॅशेस मालिका गमावण्याच्या मार्गावर होता. यादरम्यान इंग्लिश फलंदाज केविन पीटरसनविरुद्ध विकेटच्या मागे झेलचे अपील पंचांनी फेटाळले. पाँटिंगने रेफरल घेतला, पण तोही व्यर्थ गेला. रेफरल वाया गेल्यानंतर पाँटिंग स्क्वेअर-लेग अंपायर अलीम दार यांच्याकडे गेला आणि त्याने वाद सुरू केला. नंतर त्याचा पीटरसनशी वादही झाला.

एमएस धोनी

आपल्या खिलाडूवृत्तीसाठी ओळखला जाणारा धोनी २०१२ मध्ये अंपायरवर चिडलेला दिसला. भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यात धोनी सुरेश रैनाच्या चेंडूवर मायकेल हसीच्या विरुद्ध स्टंपिंगचे अपील केले. पण स्क्वेअर-लेग अंपायरने थर्ड अंपायर ब्रूस ऑक्सनफोर्डकडे निर्णय पाठवला. थर्ड अंपायरने प्रथम हसीला आऊट दिले, पण मैदानी पंच बिली बाउडेन यांनी डगआउटकडे जाणाऱ्या हसीला परत बोलावले. वास्तविक, तिसऱ्या पंचांनी चुकून नॉट आऊटऐवजी आऊटचे बटण दाबले होते. मग काय? भारतीय कर्णधारा धोनीने मैदानावरील पंचांशी हुज्जत घातली.

विराट कोहली

विराट कोहली फलंदाजीसोबत मैदानावर खेळाडू आणि पंचांशी भांडण्यासाठी ओळखला जातो. आयपीएल २०१५ मध्ये श्रीलंकेचे पंच कुमार धर्मसेना यांच्याशी कोहलीचा जोरदार वाद झाला होता. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजीदरम्यान षटके कमी केल्यामुळे विराटचा संयम सुटला. मैदानावरील दुसरे पंच अनिल चौधरी यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तरीही तो कुमार धर्मसेनावर भडकलेला दिसला.

हरमनप्रीत कौर

हे प्रकरण ताजे आहे. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हरमनप्रीत कौर पायचीत बाद देण्यात आले. या निर्णयवार हरमनप्रीत चांगलीच संतापली. तिने आपली बॅट संतापाच्या भरात स्टंपवर मारली. त्यानंतर पॅव्हेलियनकडे जात असताना तिने पंचांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रेझेंटेशन सेरेमनीमध्येही तिने बांगलादेशी महिला संघाची कर्णधार नगमा सुलतानाला टोमणा मारला. नगमा हरमनप्रीतला फोटो सेशनसाठी बोलवत होती, पण हरमनप्रीतने 'अंपायरला बोलव, असे म्हणत टोमणा मारला.

पुढील बातम्या